Home > M marathi blog > जातीयतेचे भोंगे पुढे करून राजकारण करण्यात युवकांच्या भवितव्यासाठी काय केले ?

जातीयतेचे भोंगे पुढे करून राजकारण करण्यात युवकांच्या भवितव्यासाठी काय केले ?

What has been done for the future of the youth in politics by spreading the horns of caste?

जातीयतेचे भोंगे पुढे करून राजकारण करण्यात युवकांच्या भवितव्यासाठी काय केले ?
X

जातियतेचा भोंगा...?

जाकीर हुसेन - 9421302699


मुस्लिम , मदरसे, अजा़न चा नाम उल्लेख केल्या शिवाय राजकारण व राजकीय नेता होत नाही हेच दुर्दैव..?

स्वातंत्र लढ्यात मुस्लिम समाज हा खाद्याला खांदा लावून लढला हा इतिहास आहे पण इतिहास कारांनी खरा इतिहास हा मांडलाच नाही नव्हे तो तसा युवकांना माहिती होऊच दिला नाही हिच खंत आहे पण आज भाजप शासनाने केद्रांत स्थापन झाल्या पासून केवळ मुस्लिम द्वेष हा सामान्य माणसाला हि दिसत आहे हे नाकारता येणार नाही हेच स्पष्ट दिसून येत आहे त्यात महाराष्ट्र राज्यातील भाजप विरोधी पक्ष असल्याने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकीय अस्तित्व नसल्याचे येथे जातीयतेचे भोंगे हे प्रसिद्धी माध्यमातून वाजताहेत ? पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात हिरव्या आणी भगव्या मध्ये जातीय तेढवाढवण्याचा प्रयत्न होत आहे व स्वताचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गोरखधंदा चालू आहे ख-या अर्थाने आजच्या तरुणाईला २१ व्या शतकात माहिती व तंत्रज्ञाना बरोबर अविष्काराबरोबर चालण्याची उपकरणे व साधने देण्याची गरज आहे पण अप्पल पोटी राजकारणी कोणी भगव्या च्या नावाने तर कोणी हिरव्या च्या नावाने नवतरुण यांचे डोके भडकवण्याचा गोरखधंदा करताहेत हे नवतरुण यांनी लक्षात घेण्याची गरज आहे ईश्वर हा कोणालाही उच्च किंवा निच मानत नाही हे नक्की पण युवकांच्या भवितव्याचा राजकीय पक्ष व नेते कधीच विचार करत नाहीत त्यांना त्यांच्या हिताचे जातीयतेचे राजकारण करावयाचे असते जातीयतेचे भोंगे पुढे करून राजकारण करण्यात युवकांच्या भवितव्यासाठी काय केले ? हा खरा प्रश्न आज युवका समोर आहे पण जातीयतेचे भोंगा हा निवडणूक आली वाजतो जसे मदरसे भोंगे मुस्लिम वोटबँक हे काय चाललय ? मुस्लिम समाज हा मशिदीवरुन भोंग्यातुन दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत असतो अजा़न हि केवळ अडीच मिनीटाची असते त्या आवाजाने म्हणें लोकांना त्रास होतो मान्य आहे ज्या मशिदीवरील भोंग्यातुन अपेक्षेपेक्षा मोठा आहे कर्णकर्कश आहे तो आवाज मानु शकतो पण मशिदीवरील भोंगे आहेत आणी ते काढलेच पाहिजेत ? हा जो अट्टहास आहे जात्यांधपणा जेवढा दाखवणारा आहे तेवढाच महाराष्ट्र राज्यात जातीयवाद तेढ निर्माण करणारा नव्हे का.? हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंविधानावर चालणारा देश आहे येथे कायदा हा सर्वीसाठी समान आहे मशिदीवरील भोंगे काढणे अथवा मंदिरावरील भोंगे काढणे अथवा लावणे हे कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या अट्टाहासावरुन होणार नाही त्यासाठी कायदा आहे अशा जातीयवादी शक्तीला ओळखण्याची गरज आहे ? यावर भारतीय सर्वेच्च न्यायालयाने २०१६ साली निर्णय दिलेला आहे तसा तो निर्णय आलेला आहे कुठल्याही जात - पात - धर्म - पंथाच्या कार्यक्रमामध्ये मंदिर, मज्जीद , गुरूद्वार , चर्च कोठेही परवानगीने लाऊडस्पीकर लावता येवु शकतो लाऊडस्पीकर चा आवाज हा ७५ डेसीबयलच्या आत असायला हवा मग कायदा हा पुर्वपरवानगीने सर्वकाही इथल्या नागरीकांना देत असेल तर उगीच भोंग्याच्या नावावर जातीय द्वेष पसरविण्याचे कारण काय ? महाराष्ट्रात जातीयतेच्या नावाने द्वेष होणार नाही या महाराष्ट्र शाहू महाराजांनी अखंड बहुजन समाजाला एकत्रित आणलं आहे सर्वांना सुविधा दिल्या जात - पात - धर्म या पलीकडे माणुसकीच्या पलीकडे माणुसकी जपली यात दूमत नाही ताजे उदाहरण घ्या कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप ने जातीयतेचे बिजे रोवण्याचे काम २० दिवसात प्रचारात माध्यमातून केले पण या ठिकाणी निकालानंतर भाजप अक्षरशः पराभव पत्कारावा लागला तिथे पुन्हा एकदा माणसाला माणूस म्हणून पाहिले गेले हा माणुसकीचा विजय होय महाराष्ट्र राज्यात ना भोंग्यावरुन , ना हनुमान चालीस्यावरुन , ना जय भवानी जय शिवाजी , ना अल्लाह हु अकबर वरून वाद होतील महाराष्ट्र राज्य हे साधु, संत , समाजसुधारक , छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे आजच्या नवतरुण युवकांनी लक्षात हे घ्यावे व प्रसिद्धी माध्यमाने हि अखंड महाराष्ट्राची रयत संघटीत ठेवावी हिच सामान्य माणसाची उपेक्षा दिसून भोंग्यातुन दिसून येत आहे

Updated : 19 April 2022 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top