Home > M marathi blog > काय झाडी काय! काय डोंगार! काय हाटील ! सारे काही "ओके" आहे!

काय झाडी काय! काय डोंगार! काय हाटील ! सारे काही "ओके" आहे!

What a bush! What a mountain! What a hit! Everything is "OK"!

काय झाडी काय! काय डोंगार! काय हाटील ! सारे काही ओके आहे!
X


--------------------------------------------------

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

मंगळवार दिनांक 28 जून 2022.

--------------------------------------------------

पश्चिम महाराष्ट्र हा साखरेचा हिरवागार उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो.ग्रामीण भागात असलेल्या सह्याद्रीच्या कडे कपारी मध्ये दडलेला पट्टा,सर्वाधिक ऊसाची साखर कारखानदारी,सहकारी बँका,पतसंस्था यांचे सर्वाधिक मोठे वर्तुळ,राजेशाहीतील छत्रपतींची दोन संस्थाने,

इथल्या लाल मातीत खेळली जाणारी कुस्ती,ग्रामीण भाषेतील रांगडा बाज,ओठावरील पिळदार मिशा

वरती सतत हात फिरवणारी येथील 99 कुळातील

"पाटीलकी" इथल्या पिढ्यानपिढ्या

यांची चालणारी राजकीय घराणे यांच्याकरवी

" सत्ता" विशेष करून,या पश्चिम महाराष्ट्राला ओळख करून देणारी ठरली आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा,पुणे याच पश्चिम महाराष्ट्राला जोडलेला,सोलापूर हा जिल्हा आहे.सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा कर्दनकाळ ठरलेल्या सोलापुर दक्षिन च्या तत्कालीन तहसीलदार शिल्पा ठोकडे,यांनी वाळू माफियांच्या वरती केलेल्या धडक कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील माफिया गिरी उजेडात आली होती.या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी संपूर्ण मराठी,हिंदी चित्रपटसृष्टीला "याड" लावणाऱ्या "सैराट" या चित्रपटाचे पूर्णतः शूटिंग झाले होते.सोलापुरातील मोहिते पाटील घराणे, सुशीलकुमार शिंदे,निंबाळकर,गणपतराव देशमुख शेकाप,सुभाष देशमुख आदी राजकारणातील व

सहकारी क्षेत्रातील बड्या प्रस्ताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.वंचित आघाडीचे प्रमुख तथा एडवोकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

कधी काळी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होती.विधिमंडळामध्ये सर्वाधिक काळ,

आमदारकीचा घालवणारे,शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा दिवंगत,गणपतराव देशमुख यांचा सांगोला हा विधानसभा मतदारसंघ आहे.आज घडीला सांगोला विधानसभा मतदारसंघ,पूर्ण महाराष्ट्र सोशल मीडिया वरती चर्चेला आला आहे.खास करून या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना आमदार श्री.शहाजीबापू पाटील यांच्या एका विधानाने.

राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर,अनपेक्षितपणे शिवसेनेचे विधीमंडळाचे गटनेते श्री.एकनाथ शिंदे नगर विकास

मंत्री मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाचे 41 सदस्य यांचा एक गट,बंडखोरी करत सुरुवातीला गुजरातला सुरत येथे गेला.प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्याने त्याची चर्चा देशाच्या राजकारणात उलथापालथ करणारी ठरली.

राज्याच्या गृह विभागाला कोणत्याही प्रकारचा

थांगपत्ता देखील लागणार नाही अशा पद्धतीचे

नियोजन मंत्री एकनाथ शिंदे यांनी करून गुजराथ

येथील "सुरते" मध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर तह करून बंडखोर आमदारा सहित आपला बोजा बीस्तारा आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेल वरती हलवला.सुरुवातीला नॉटरिचेबल असणारे सर्व विधीमंडळाचे बंडखोर

41 आमदार, हळूहळू "रिचेबल" होऊ लागले.

यापैकी एक सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याने फोन करून चौकशी केली असता,

काय झाडी काय!

काय डोंगार!

काय हाटील !

सारे काही "ओके" आहे !

वरील पद्धतीने रांगड्या भाषेत हसत असत उत्तर दिल्याने,शहाजी बापू पाटील यांची बोलण्याच्या

रांगड्या भाषेतील मोबाईल वरच्या संभाषणाच्या आवाजातील क्लिप प्रचंड प्रमाणात वायरल झाली.

इतक्या मोठ्या प्रमाणात वायरल झाली की,यु ट्यूब फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम प्रसार माध्यम,

टी व्ही माध्यमे यांना त्याची दखल घ्यावी लागली.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे या मुळे,

रातोरात प्रसिद्ध झाले.आणि पावसाळ्यातील हिरवळीचे पर्यटन याचे केंद्रबिंदू शहाजीबापू पाटील आमदार शिवसेना ठरले.

शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे

आमदार यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

विद्यार्थी चळवळीतून राजकारणात

सध्या शिवसेनेतून आमदार असलेल्या शहाजी पाटील यांचा राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली. या काळात ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते.

एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.

1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत

सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते.

1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले.

काँग्रेस ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी

आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधूला करणारे शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला पण विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा अपक्ष म्हणून लढवली. याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली

1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव

त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला

1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले

त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला

त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला

2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले.

अशी आमदार शहाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या बोलण्यात ग्राणीण ढंग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची सातत्यानं चर्चा देखील होत असते. अनेकवेळा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, 2019 मध्ये शहाजी पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतून निवडून आणलं. त्यामुळंच फडणवीस यांच्यासोबत शहाजी पाटील यांची चांगलीच गट्टी आहे. त्यामुळं ते त्यांच्या संभाषणात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे होणार असल्याचे म्हणत आहेत.

दृष्टिक्षेपात सोलापुर जिल्हा.

--------------------------------------------------------

भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमधे समावेश मिळवलेला सोलापुर जिल्हा !

पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा सोलापुर प्राचीन काळी सोन्नलागी आणि सोन्नलापुर या नावाने देखील ओळखला जायचा.

औद्योगिक केंद्र म्हणुन ओळख मिळवलेल्या या जिल्हयात सुती वस्त्र, सोलापुरी चादरी, प्रसिध्द असुन या शहराला कापड गिरण्यांचे शहर देखील बोलल्या जाते. विडी आणि सिगारेट उदयोगात या जिल्हयाचा प्रथम क्रमांक लागतो.

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर येथील लोक कर्नाटकात जाण्यास ईच्छुक होते, महादेवी लिंगाडे नामक कन्नड लिंगायत साहित्यिक महिलेने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्याकरता आंदोलन देखील केले पण या विवादामुळे सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली, या आयोगाने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्यासंदर्भातला अहवाल शासनासमोर मांडला परंतु शासनाने तो धुडकावत न्यायालयाची मदत घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मराठी भाषेपेक्षा देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी तेलगु आणि कन्नड भाषा बोलली जाते.

सिध्देश्वर मंदिरामुळे देखील या जिल्हयाला एक आगळ वेगळं वलय प्राप्त झालं असुन दुरदुरून भाविक येथे दर्शनाकरता येत असतात.

सोलापुरात आज देखील एका मुस्लिम किल्ल्याचे भग्नावशेष पहायला मिळतात.

सोलापुर जिल्हा सध्या सर्व त.हेच्या गणवेशांकरता ओळखला जातो, महाराष्ट्राव्यतीरीक्त हे गणवेश उपयोगात आणले जातात.

सोलापुर जिल्हयातील तालुके –

सोलापुर जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत

उत्तर सोलापुर

दक्षिण सोलापुर

अक्कलकोट

बार्शी

मंगळवेढा

पंढरपुर

सांगोला

माळशिरस

मोहोळ

माढा

करमाळा

सोलापुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती

लोकसंख्या 43,17,756

एकुण क्षेत्रफळ 14895 वर्ग कि.मी.

एकुण गावं 1144

एकुण तालुके 11

साक्षरतेचे प्रमाण 2%

1000 पुरूषांमागे स्त्रियांची संख्या 935

राष्ट्रीय महामार्ग क्र. 65, 52, 204, 361,

465, 150 या जिल्हयातुन गेले आहेत.

सोलापुर जिल्हयाच्या उत्तरेला अहमदनगर पुर्वेला उस्मानाबाद दक्षिणेला सांगली विजापुर तर पश्चिमेला सातारा आणि पुणे हे जिल्हे आहेत.

स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच या शहराने तिन दिवसाचे स्वातंत्र्य उपभोगले आहे ते 1930 साली 9,10 आणि 11 मे ला मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा या स्वातंत्र्यविरांना इंग्रजांनी सोलापुरात फाशी दिली होती त्यामुळे या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणुन देखील ओळख आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत 'पंढरपुर' याच जिल्हयात असुन या जिल्हयाला संतांची भुमी देखील म्हंटले आहे.

पंढरपुरला फक्त महाराष्ट्रातीलच नव्हें तर दक्षिणेकडच्या राज्यातील भाविकही दर्शनाकरता येत असतात.

तेलगु, कन्नड आणि मराठी अश्या तिनही भाषा बोलणारे नागरिक गुण्या गोविंदाने याच जिल्हयात नांदतांना आपल्याला पहायला मिळते.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाकरता भाविक लांबुन या ठिकाणी येतात शिवाय येथील शिवगंगा मातेचे मंदिर त्याच्या कळसामुळे फार प्रसीध्द आहे या मंदिराचा कळस 100 तोळे सोन्यापासुन बनला असुन दरवाजा 80 किलो चांदिपासुन बनल्याचे सांगितल्या जाते.

सोलापुर जिल्हयात दरवर्षी साजरी होणारी सिध्देश्वराची यात्रा खुप प्रसिध्द आहे.

या जिल्हयातील 'सोलापुरी चादरी' प्रसिध्द आहेत.

पर्यटन आणि तिर्थस्थळं –

पंढरपुर – Pandharpur

पंढरीचा विठोबा आणि त्याचे वारकरी यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हें तर अवघ्या त्रिभुवनात पंढरपुर सुपरिचीत आहे. जाती भेदाच्या पलिकडच्या या भगवंताला भेटण्याकरता लांबलांबुन वारकरी पायी पायी विठुरायाच्या भेटीला आषाढी वारीला येत असतात.

अलौकीक असा हा वारीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता देखील लाखो भाविक पंढरीला येत असतात. विÐल आणि रूक्मीणीच्या दर्शनाकरता वारकरी तासनतास् रांगेत उभे असतात.

आषाढी आणि कार्तिकी अश्या दोन उत्सवादरम्यान पंढरपुरात प्रचंड संख्येने भाविक दाखल होतात.

चंद्रभागेच्या तिरावर वसलेले हे मंदीर फारच प्राचीन असुन अगदी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत या ठिकाणी एकसमान होतात.

या पंढरपुरात शेगावच्या गजानन महाराजांचे देखील मंदिर असुन तो परिसर देखील दर्शनाकरता आणि निवासाकरता अतिशय योग्य आहे त्यामुळे विठोबाच्या मंदिरात दर्शनाला आलेले भाविक या ठिकाणी देखील दर्शनाकरता येतात.

सोलापुर जिल्हयातील पंढरपुर हे ठिकाण रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांने देखील जोडले असुन सोलापुर पासुन अवघ्या दिड तासाच्या अंतरावर आहे.

गाणगापुर – Gangapur

दत्तात्रयाचे नृसिंह सरस्वती अवतारातील हे गाणगापुर ठिकाण अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थळ म्हणुन प्रसिध्द आहे.

सोलापुर पासुन साधारण तीन तासाच्या अंतरावर 110 कि.मी. वर असलेल्या या ठिकाणी दत्तभक्त दर्शनाकरता येतातच.

येथील भिमा अमरजा संगमावर सकाळी स्नान करून दुपारच्या वेळेस पाच घरी भिक्षा मागावी आणि सायंकाळी दत्तात्रयाच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे केल्याने प्रभु दत्तात्रयाची कृपादृष्टी प्राप्त होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

दत्तात्रय प्रभु या ठिकाणी नृसिंह स्वरूपात अस्तित्वात असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

भिमा अमरजा अश्या पवित्र नद्यांचा या ठिकाणी संगम आहे.

अक्कलकोट – Akkalkot

सोलापुर पासुन अगदी जवळ म्हणजे 40 कि.मी. अंतरावर असलेले अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थामुळे सर्वदुर परिचीत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अगदी लगत हे गाव दत्तपरंपरेतील भाविकांकरता अत्यंत पवित्र ठिकाण आहे.

एकदा एका भक्ताने समर्थांना त्यांच्या विषयी विचारले असता समर्थांनी सांगितले की ते औदंुबराच्या वृक्षातुन निघालेले आहेत आणि एकदा असे सांगितले की त्यांचे नाव नृसिंह भान असुन श्रीशैलम नजीक कर्दळीवनातुन ते आले आहेत.

आजही कर्दळीवनाची यात्रा करणा.या भाविकांना त्याठिकाणी स्वामी समर्थांचे स्थान पहावयास मिळते.

संपुर्ण भारतात पदभ्रमंती केल्यानंतर श्री स्वामी समर्थ शेवटी अक्क्लकोट या ठिकाणी आले त्यामुळे त्यांचे हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि जागृत असुन भाविक या ठिकाणी नेहमी दर्शनाकरता येत असतात.

सिध्देश्वर मंदिर – Siddheshwar Temple

सिध्देश्वर हे सोलापुर नगरीचे ग्रामदैवत असुन या मंदिराची निर्मीती योगी श्री सिध्दरामेश्वर यांनी केली आहे जवळजवळ 68 शिवलिंगांची त्यांनी स्थापना केली.

सोलापुरचे सिध्देश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर असुन अनेक शिवलिंगांचे दर्शन या ठिकाणी भाविकांना घेता येते.

श्री गणेशाची मुर्ती देखील या ठिकाणी असुन येथील मुर्तींवर आणि मंदिरावर कर्नाटकी स्थापत्य कलेचा प्रभाव आपल्याला दिसुन येतो.

श्री शिव सिध्दरामेश्वरांची समाधी या ठिकाणी असुन तेथील शिवपिंडीवर सदैव जलाभिषेक सुरू असतो.

या मंदिराच्या सभोवताली सिध्देश्वर तलाव असुन हे मंदिर सदैव पाण्याने वेढलेले असते मंदिर परिसरातुन सोलापुरचा किल्ला दृष्टीस पडतो.

येथील सिध्देश्वराची यात्रा फार प्रसिध्द असुन त्या दरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात.

या व्यतिरीक्त सोलापुर जिल्हयात अशी बरीच ठिकाणं आहेत ज्याला आपण आवर्जुन भेट द्यायला हवी.

त्यापैकी नान्नजचे माळढोक अभयारण्य, बार्शी चे हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील भगवान विष्णुचे मंदिर, दक्षिण सोलापुर तालुक्यातील हत्तरसंग कुडल या ठिकाणी भीमा आणि सीना नदीचा संगम झालेला आपल्याला पहायला मिळतो या संगमावर हरिहरेश्वर आणि संगमेश्वर अशी महादेवाची मंदिर आपल्याला आकर्षीत करतात.

करमाळा येथील प्रसिध्द भुईकोट किल्ला सुध्दा प्रेक्षणीय आहे.

त्याचप्रमाणे सोलापुरमधल्या कंबर तलावानजिक असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालया सारखी बरीच ठिकाणं आपल्याला सोलापुरात पहायला मिळतात.

महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्हयात असली तरी सोलापुर पासुन ती अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.

Updated : 28 Jun 2022 3:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top