Home > M marathi blog > क्रांतिसूर्य, थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार‼️

क्रांतिसूर्य, थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार‼️

Thoughts of Krantisurya, great social reformer Mahatma Jotiba Phule‼

क्रांतिसूर्य, थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार‼️
X

जाकीर हुसेन - 9421302699

MMarathi ❗ Special

आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्यांना समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, असे थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती.

साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांचे हे महान विचार...

जोतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे, शेतकऱ्याचा असूड, ब्राम्हणांचे कसब, अश्या अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते,

"प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते." असे म्हणणाऱ्या महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना

केली.

समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले.

सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचवली.

👉 जाणून घेऊ, महात्मा जोतिबा फुले यांचे विचार‼️ :

🔹 "ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात."

🔸 "जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका."

🔹 "जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे."

🔸 "भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे."

🔹 "नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे."

🔸''समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.''

"विद्येविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.''

Updated : 11 April 2022 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top