Home > M marathi blog > राजकारणातील उलटा प्रवाह

राजकारणातील उलटा प्रवाह

The reverse trend in politics

संपादक झाकीर हुसैन- 9421302699

राजकारण्यांना कायदा कधीच पचनी पडला नाही कारण, कायद्याने राजकारणी व्यक्ती चुकीचे असतांना सुध्दा त्याला बरोबर आहे असे कधीच मान्य केले नाही.बंडखोर आमदार महोदयांना कोणत्या राजकीय वैदूचा आसरा होता हे माजी मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या घोषणे आधी सुध्दा ओपन सिक्रेट होते.राजकारण हे राजकीय पक्षांच्या परिघाबाहेर जाऊन स्वतः च्याच पक्षांच्या मुख्यमंत्र्यांवर बंडखोर आमदार महोदयांनी शिंतोडे उडविले ज्यातून शिवसेनेची अपरिमित हानी झाली.त्यातून पॉलिटिकल गॉसिपिंग होऊन राजकारणाचा फड रंगला राजकीय भाकीत तर्काला न पटणारे होते,अनेक गोष्टीला मुठमाती देण्यात आली त्यातून मंत्रीमंडळात खांदेपालट झाले पुढे सत्तेच्या अध्यायाचे पान टरटर फाटत गेले.महाराष्ट्र हा बंडानंतर राजकीय अस्थिर विपदेच्या तोंडाशी उभा होता विरोधी पक्षापुढे सत्ताधाऱ्यांचे फासे उलटे पडत गेल्यावर, सत्ताधाऱ्यांकडून व शिवसेनेकडून बंडखोर आमदार महोदयांना सोलपटून काढणारे भाषण झाले,निदर्शने झाली तथा बंडखोर आमदार महोदयांच्या समर्थनार्थ सुध्दा निदर्शने करण्यात येऊन विजयी गुलाल उधळण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली.थोडक्यात राजकारणामध्ये उलटा प्रवाह वाहून स्वतः च्याच पक्षा विरूद्ध बंडाचा झेंडा फडकविण्यात आला.परंतु, या सर्व घडामोडी मधून आपण सुजान नागरिक असल्यामुळे लक्षात घ्यावे की,मुख्यमंत्री हे पद घटनात्मक आहे त्याचे अवमुल्यन होता कामा नये.कोणतीही व्यक्ती वेगळी असते व पद वेगळे असते हे आपण प्रथम समजून घेणे गरजेचे.सत्तेची राजकीय कसोटीच्या वेळी कोणीही कुणाचे नसते हे पुन्हा एकदा बंडाच्या माध्यमातून सिध्द झाले.आमदार महोदयांनी बंडाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांच्या सत्तेला पॉलिटिकल क्रायसिस वरून ठकठक वाजवायला सुरुवात केली.पब्लिक डोमेन मध्ये आल्यावर सर्वांनाच त्या संकटांना तोंड द्यावे लागते.यात तरूण तर्क पासून तर ज्याच्या मुलांचे केस पांढरे झाले असे सर्व एक्स्पर्ट राजकीय अंदाज बांधण्यासाठी सरसावले.परंतु सर्वांचे अंदाज चुकले.सत्तेच्या लालसेपोटी विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष एकमेकांना कोंडीत पकडण्याचे काम इमानेइतबारे करत होते, त्यातून ते एकमेकांवर संकटे गडद करत आहेत सामान्य माणूस मात्र त्यापासून पळ काढून काहीही धडा न घेता आपापल्या दिनचर्या मध्ये व्यस्त आहे कारण या सत्तेच्या लालसेपोटी केलेल्या राजकारणात सामान्य माणूस आणि त्याचे रखडलेले प्रश्नच जीवंत नाही.जनादेश, कायदा हे कचराकुंडीत फेकून दिले जात होता व दिला जात आहे.या राजकीय कोंडीचा अंधार भारतीय संविधाने व पक्षांतर बंदी कायद्याच्या जादूच्या कांडीने दूर केला आहे.भारतीय संविधानाच्या कलम १०१,१०२,१०३,१०४ मध्ये संसद सदस्य ( खासदार ) यांची अपात्रता सांगितली आहे तथा भारतीय संविधानाच्या कलम १९१ मध्ये घटक राज्य विधीमंडळाच्या सदस्य ( आमदार ) यांची अपात्रता सांगितली आहे.त्यानुसार आमदार/खासदार सभागृहाच्या परवानगी शिवाय साठ दिवस सभांना गैरहजर राहिल्यास त्याचे पद रिक्त होते, व्यक्ती संसदेच्या किंवा घटक राज्य विधीमंडळाच्या दोन्ही गृहाचा सदस्य असल्यास एका गृहातील जागा रिक्त होते, आमदार किंवा खासदार यांनी लाभाचे पद धारण केल्यास , ते मनोविकल झाल्यास,नादार असल्यास तथा भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्यास ते अपात्र ठरू शकतात.हाच धागा पकडून पक्षांतर बंदी कायद्याला जोडण्यात आला.

या पक्षांतर बंदी कायदा ( Anti Defection Law ) नुसार आमदार किंवा खासदार यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांना अपात्र करण्याच्या तरतुदी केल्या आहेत.या करीता संविधानात ५२ वी घटनादुरुस्ती सन १९८५ साली करून संविधानात जोडण्यात आली.अपक्ष उमेदवार आमदार किंवा खासदार पदी निवडून आले पण त्यानंतर त्याने एखाद्या पक्षात प्रवेश केल्यावर तो अपात्र ठरू शकतो.तथा पक्षांच्या कमीत कमी २/३ सदस्यांपेक्षाही कमी खासदारांनी किंवा आमदारांनी पक्ष सोडला तर ते अपात्र ठरू शकते.

असे असले तरी प्रश्न असा उत्पन्न होतो की स्वतःच्याच पक्षा विरूद्ध विचार बंडखोर आमदार महोदयांना का करावा लागला ?

या प्रश्नांच्या उत्तराला वेगवेगळ्या छटा आहे.जसे की,

कुणी म्हणतो आमदारांना माजी मुख्यमंत्री वेळ द्यायचे नाही.

कुणी म्हणतो केंद्रिय तपास यंत्रणेला बंडखोर आमदार बळी पडले.

कुणी म्हणतो शिवसेनेला बाळासाहेबांच्या विच्यारांचा विसर पडला ईत्यादी.तथापी अशा घडलेल्या घटनांमुळे माझ्या मते पक्षांतर बंदी कायद्यात बदलत्या परिस्थिती नुसार सुसंगत असा बदल करणे गरजेचे आहे.या सर्व राजकीय कोंडीतून मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेण्याचे भाग्य लाभले ते बंडखोर आमदार महोदयांचे नेता श्री.एकनाथ शिंदे यांना.त्यासाठी त्यांना बंडांचा अंधार दूर करून बहूमतांचा प्रकाश मागावा लागला तो बी.जे.पी. कडे.राजकारणात कोणीही कुणाचे कायम मित्र किंवा कायम शत्रू नसते ते आता महाराष्ट्रामधील सत्तांतरानंतर साऱ्यांनाच समजून चुकले.नवे सरकार हे जुन्या सरकारने घेतलेल्या कोणकोणत्या निर्णयांना,योजनेला " खो " देणार हे येणारा काळच ठरवेल.तथापी,विजयाचा गुलाल उधळण्यासाठी व कायम ठेवण्यासाठी " वोट ऑफ कॉन्फिडन्स " ही एक लिटमस परिक्षाच असते त्या परिक्षेत पास होणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना गरजेचे आहे.आणि त्या परिक्षेत ते पास होणार असे दिसते.

©ॲड.संदिप गुजरकर

यवतमाळ

दि.०४-०७-२०२२

मो.नं.८१८००५२३०३

Updated : 9 July 2022 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top