Home > M marathi blog > नरेन्द्र व देवेन्द्रचं खरं रूप... काय आहे भाजपच धोरण !

नरेन्द्र व देवेन्द्रचं खरं रूप... काय आहे भाजपच धोरण !

The real form of Narendra and Devendra ... what is the BJP's policy!


➖〰➖〰➖〰➖〰➖〰➖

भाजपला राज्यात अजिबात स्थान नव्हते त्या काळात मा बाळासाहेब ठाकरे आणि खा शरद पवार ही दोन नक्षत्र एकमेका समोर दंड थोपटून लढत होते. दोघंही प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यावेळी भाजप पाळण्यात खेळत होता. पण हे पाळण्यातील बाळ खूप हुशार होत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं बोट घट्ट धरून स्वतःची वाढ करून घेतली आणि तो हळूहळू राज्यात चवथ्या क्रमांकावर पोहचला. त्यांनी शिवसेनेशी दोस्ती करून एक करार करून घेतला. आम्हाला राज्य पातळीवर रस नाही देश पातळीवर रस आहे, तुम्हाला देश पातळीवर रस नाही राज्य पातळीवर रस आहे. केंद्रात आम्ही मोठे भाऊ राज्यात तुम्ही मोठे भाऊ. याचा अर्थ स्पष्ट होता. दिल्लीत पंतप्रधान भाजपचा आणि मुंबईत मुख्यमंत्री शिव सेनेचा. हा त्यांच्या युतीचा फॉर्म्युला.

त्यासाठी राज्यात जास्त लोकसभा भाजप लढविणार आणि विधानभेच्या जास्त जागा शिव सेना लढणार. त्यासाठी त्यांनी 9 चा आकडा लकी ठरवून जागा वाटप केल्या. विधान सभेत

शिवसेना 171

भाजप 117

1+7+1=9

1+1+7=9

असा जागा वाटप फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला स्व बाळासाहेब ठाकरे आणि स्व प्रमोद महाजन व स्व गोपीनाथ मुंढे यांनी ठरविला. आता या तिघांही नेत्यांच निधन झालं आहे आणि हा फॉर्म्युलाही मृत झाला.

2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजपची युती झाली होती आणि तेंव्हा गोपीनाथ मुंढे हयात होते. नंतर त्यांचं लगेच निधन झालं आणि विधानसभा निवडणुका लागल्या. यावेळी भाजपने 117 पेक्षा जास्त जागांची मागणी करत युती तोडली. याच कारण अस होत, धनगर सारखा खूप मोठा जाती समूह भाजप सोबत होता आणि मोदीं साहेबांची हवा होती. त्यांचा अंदाज खरा ठरला 122 जागा जिंकत भाजप विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. मग भाजप+सेना यांची युती होऊन नवं सरकार स्थापन झाले. पण भाजप अधून मधून शत प्रतिशत भाजपच्या घोषणा देतच होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजपने पक्ष वाढीसाठी काँग्रेस ncp मधून अनेक बड्या नेत्यांची आवक केली तरी स्वबळावर भाजप उमेदवार निवडून येतील याची त्यांना खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांनी पुन्हा शिव सेने सोबत युती केली आणि त्याच वेळी करारही केला. विधान सभेत 18 जागा मित्र पक्षांना देऊन दोन्ही पक्ष 135/135 जागांवर लढतील असा करार झाला.

पण आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी 135/135 जागांचा करारही भाजपने तोडाला. मोदींची हवा असल्यामुळे खुद्द उद्धवजी हवाल दिलं झाले आहेत त्यांनी भाजपच्या दांडगाईला मान्यता दिली. पुन्हा नवा करार झाला.

भाजपने मित्र पक्षासाठी 18 जागा मागून घेतल्या आणि उरलेल्या जागेतून 124 जागा शिवसेनेला देत स्वतःकडे 146 जागा घेतल्या. ही शुद्ध लबाडी आहे. पण इथेही लबाडी पूर्ण संपलेली नाही. खरी लबाडी पुढे आहे. मित्र पक्षासाठी 18 जागा मागून घेतल्या असताना त्यातल्या पुन्हा 6 जागा भाजपने काढून घेतल्या आता या जागा अशा झाल्या,

भाजप 152

शिव-सेना 124

मित्र पक्ष 12

पण इथेही भाजपची लबाडी संपत नाही. त्यांनी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ🍁 चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट घातली. ही अट, रामदास आठवले, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनी मान्य केली पण महादेव जानकर यांनी विरोध करत रासपच्या चिन्हावर लढण्याचा हट्ट धरला. भाजप तयार झाला त्यांनी दोन जागा रासपला सोडून ईतर मित्र पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह दिलं. आता पुन्हा या 10 जागा भाजपच्या खात्यात गेल्या आता भाजपच्या जागा झाल्या 162. पण इथेही भाजपची लबाडी संपत नाही.

भाजपने रासपला अट घातली. चिन्ह तुम्ही ठरवाल ते आणि उमेदवार आम्ही ठरवू ते. त्या प्रमाणे भाजपने दौंड आणि जिंतूरची जागा रासपला देऊन दौंड साठी राहुल कुल आणि जिंतूरसाठी रामप्रसाद बोर्डीकर हे उमेदवार दिले. या दोघांना रासप बद्दल कोणतीही आपुलकी नाही आत्मीयता नाही हे दोघेही भाजपसी एकनिष्ठ आहेत. ही भाजपची लबाडी आहे. पण ही लबाडी इथे संपत नाही.

रासपने आपल्या या दोन उमेदवारा साठी ए बी फॉर्म तयार केले. आणि स्वतः महादेव जानकर पक्षाचे ए बी फॉर्म घेऊन दौंडला गेले आणि बाळासाहेब दोलतोडे जिंतूरसाठी रवाना झाले. हे दोघे फार्म भरायच्या जागी पोहचण्या आधीच फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे जासुस तिथे पोहचले त्यांनी भाजपचे ए बी फॉर्म देऊन कुल आणि बोर्डीकर यांचे अर्ज दाखल केले. ही खूप मोठी बेईमान, विश्वासघात आहे. याला इतिहासाच्या भाषेत "मोगली मसलत"🔪 म्हणतात. भाजप मोगली मसलत वापरात आहे, हा त्यांचा प्रश्न पण मोगली मसलत करताना छ शिवाजी महाराजांचं नाव घेतात हे अनैतिक आहे. आता जागा वाटप अस झालं,

भाजप 164

शिवसेना 124

मित्र पक्ष 000

याला राजकारणात मुत्सद्दी पणा म्हणतात आणि आपल्या सामान्य लोकांच्या भाषेत लबाडी म्हणतात. भाजपने मित्र पक्षांची दिशाभूल करत, शिव सेनेची नजरबंदी केली आहे.

हे धोरण आहे भाजपच. पुढच्या निवडणुकीत महायुती नाही, कोणी मित्र नाही आणि शिवसेनाही नाही. शतप्रतिषत भाजप!

गरज सरो नी वैद्य मरो!

- राजकिय अभ्यासक : मोदींसाहेब ,शहा साहेब आपण देवेंद्र फडणवीस साहेबां कडून सगळे काही महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातच्या फायद्याचे करून घेतले आहे.... देवेंद्रजी विरोध का केला नाही?

◆ 1) अहमदाबाद ते कुर्ला BKC 'मुंबई' बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे. 508 किलोमीटर असणार्‍या मार्गापैकी फक्त 108 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. तर उरलेला 400 कि.मी. गुजरातेतून.

2) पण त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 20 हजार कोटी देण्याचे मंजूर केले. साठीचा एकूण खर्च 30 हजार कोटी.

3) थोडक्यात, महाराष्ट्राच्या चारपट मार्ग गुजरातेतून जाणार . एकूण 20 टक्क्यांसाठी महाराष्ट्र 70 टक्के खर्च करणार. तर गुजरातमधून जाणार्‍या 80 टक्के कामासाठी 30 टक्के (कमी अधिक) गुजरात देणार ...हे असलं गणित आपल्याला शाळेत नव्हतं कधी...

4) महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसे नाहीत म्हणणारे सरकार यासाठी कुठून पैसा आणतात.. गुजरात धार्जिणे झाले की काय महाराष्ट्र सरकार? कि हा मार्ग गुजरात सरकारला आंदण दिला आपण?

5) पालघर येथे होणारे कोस्ट गार्ड हब, पोरबंदर येथे हलवले.

(देवेंद्रजी विरोध का नाही केला)

6) मुंबईतील रिझर्व् बँकेचे मुख्यालय गुजरात हलविण्यात आले. मुंबई चे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

( देवेंद्रजी विरोध का नाही केला)

7) ऊरण येथील ३५०० एकर जमीन अदानी गृपला दिली.

8) न्हावा-शिवा येथे असलेला व्यवसाय ८०% पोरबंदर येथे नेला.

( देवेंद्रजी विरोध का नाही केला)

9) जे.एन.पि.टी. चे सुद्धा स्थलांतर चालू करायला घेतले आहे.

( देवेंद्रजी विरोध का नाही केला)

10) मुंबईतील हिरे व्यापार सुद्धा गुजरात ला हलवला.

(देवेंद्रजी विरोध का नाही केला)

11) कपडा मार्केट मुंबई तुन हद्दपार होणार, 60% झाला आहेच. गुजरातला शिफ्ट केला जात आहे.

( देवेंद्रजी विरोध का नाही केला)

12) काँग्रेस ने देशातील पहिले भव्य जागतिक वित्तीय केंद्र, मुंबईतच व्हावे असे ठरविले असताना तेही गुजरात ला घेउन गेलात.

( देवेंद्रजी विरोध का नाही केला)

13) वोडाफोन या परदेशी कंपनीचा ३२०० करोड रूपयांचा कर माफ केलात पण आमचा शेतकरी इथे आत्महत्या करतोय. त्यांचे कर्ज तुम्हाला माफ करावंस वाटत नाही.

14) नारपार खोऱ्यातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी अडवायचे सोडून आपण गुजरात ते देण्याचे करार करून महाराष्ट्राचे नुकसान झाले नाही काय?

( देवेंद्रजी विरोध का केला नाही)

हे सर्व महाराष्ट्राचे नुकसान, हानी, खच्चिकरण नाही तर काय आहे?

देवेंद्रसाहेब कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा?°

गुजरातला!........

महाराष्ट्र वाचवायचा असेल तर हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा, पुर्ण महाराष्ट्रभर कळु द्या.

नुसता वाचुन शांत बसू नका.....

.....अन्यथा बेरोजगारी भरमसाठ वाढेल

Updated : 17 May 2022 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top