Home > M marathi blog > पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर

पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर

The idol of Pandharpur is actually a Buddha idol - Dr. Babasaheb Ambedkar

पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर
X

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

----------------------------------------------------

लेखन संग्रह तानाजी कांबळे.

----------------------------------------------------


----------------------------------------------------

ग्रीक देशातील बौद्ध भिक्षु महास्थवीर महाधम्मरक्षित यांनी पौंडलीक हे नगर वसवले होते. महास्थवीर महाधम्मरक्षित हे तिसऱ्या धम्म संगीतिमध्ये सहभागी होण्यासाठी पाटलीपुत्र इथे आलेले होते. धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी संघाने महास्थवीर महाधम्मरक्षित यांना महाराष्ट्र देशात पाठवलेले होते हे ऐतिहासिक सत्य आहे. ते असे, तिसऱ्या धम्म संगितीचे मुख्य संयोजक आणि सम्राट अशोकाचे धम्मगुरु महास्थविर मोगलीपुत्र तिस्स हे होते. त्यांनी महावंश हा ग्रंथ लिहिला. त्यात स्पष्टपणे म्हटलेले आहे की,

"महारठ्ठ महाधम्मराक्रवित थेर नामकं !

महाधम्मराक्रवित थेर तु योन लोकमपेसयी !"

यवन देशाच्या ( ग्रीक देश ) महास्थवीर महाधम्मरक्षित यांनी बौद्ध धम्माचे प्रचार प्रसार केंद्र म्हणून पौंडलीक नगर वसवले. पौंडलीक चा अर्थ कमळ असा होतो. बौद्ध धर्मात बोधिवृक्ष, पिंपळाचे पान, हत्ती, स्तूप, कमळ, धम्मचक्र इत्यादी प्रतीकांचा वापर होतो. बुद्धपुजेत कमळाचा वापर केला जातो. हर प्रतीक वापरून महास्थवीर महाधम्मरक्षित यांनी ग्रीक देशात बमवलेली एक मूर्ती पौंडलीक ( पंढरपूर ) नगरीतील विहार बसवली. तिलाच आज विठ्ठल मूर्ती समजतात.

तुर्की टोपी किंवा फेज कॅप – मूर्तीचे नीट निरीक्षण केले असता ती मूर्ती भारतीय बनावटीची नसून ग्रीक कलेचा नमुना दिसते. मूर्तीची टोपी ही ग्रीक टोपी आहे. तिला तुर्की टोपी किंवा फेज कॅप असे म्हणतात. या टोपीची प्रतिकृती शोधलात तर इराणमध्ये जावावे लागेल. ( इराक, इराण त्याकाळी ग्रीक देशातच समाविष्ट होते ) इराणच्या म्युझियममध्ये अशा टोप्या असलेल्या मुर्त्या आजही पहायला मिळतात. मूर्तीची उभारणी कमळाच्या फुलावर केलेली होती. मूर्तीला त्याकाळचे तुर्की वस्त्र परिधान केलेले दिसते. डोक्यावर गोल उंच टोपी आहे. त्या टोपिवरचा भाग गोल आहे व तुरह्याचे अवशेष आहेत. अशी टोपी विठ्ठलमूर्ती सोडली तर कुठेच पहायला मिळत नाही.

मूर्ती कमळावर उभी असल्यामुळे तथागताच्या शिल्पाकृतीला त्याकाळी पौंडलीक संबोधित करण्याचा प्रघात पडलेला होता.

"पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती आहे. यावर मी एक प्रबंध लिहित आहे. जो कि पुण्याच्या संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. पांढऱ्या कमळास पाली भाषेत पांडुरंग म्हणतात, याचा अर्थ पांडुरंग दूसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे" हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या "Who is Pandurang" हा शोध निबंध मार्च १९५५ मध्ये लोणावळा येथे लिहावयास घेतला होता. विठ्ठल मंदिरात खांबावर बुद्धाच्या ध्यानस्थ मुर्त्या आढळतात . पंढरपूर ची यात्रा आषाड एकादशी ला भरविण्याच कारण कि बुद्धाने आपला प्रथम धम्मोपदेश पंचवर्गीय भिक्खू ला दिला होता .पाली भाषेत पांडुरंग या शब्दाचा अर्थ 'पांढरे कमळ' असा होतो. म्हणजे ज्याने पांढरे कमळ धारण केले आहे असा तो. बौद्ध वांगमयत पांढर्या कमळाला अनन्य साधारण महत्व आहे हे बौद्ध अभ्यासकांना ठाऊकच आहे. आणि याला सबळ पुरावा म्हणजे अजंठा येथील बुद्ध लेणी. या लेणीत एक चित्र पद्मपाणी बुद्धाचे आहे, ज्याने पांढरे कमळ हाती घेतले आहे. वर दिलेला एक फोटो अजिंठा लेणीमधील आणि दुसरा विठ्ठलमंदिरातील मूर्तीचा आहे बुद्धाच्या ह्या मूर्तीवर थोडाबदल करून आला जरी असला तरी पूर्ण मूर्ती ते बदलू शकले नाहीत.

"महाराष्ट्रातील पांडुरंग हा शब्द पुंडरीक शब्दापासून आला आहे.त्याचा अर्थ पाली भाषेत कमळ असा होतो.विठ्ठला वरची सर्व कापडे व दागिने काढा ती वस्तुतः बुद्धाचीच मुर्ती आहे हे लक्षात येईल."

– Babasaheb Ambedkar writing and speeches ,Volume 18 Part 2 Page no. 424

अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या काव्यातून सिद्ध केले आहे.

गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू ।

आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥

व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।

झाला दिगंबर अवनिये ।

ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी

– संत नामदेव

बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली ||

मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ||

– संत तुकाराम

कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।।

– संत बहिणीबाई

लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |

न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||

नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |

संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||

– संत एकनाथ

Updated : 10 July 2022 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top