Home > M marathi blog > कोरोनाच्या चौथ्या लाटेचा पूर्वार्ध. (covid-19),लॉक डाऊन वास्तव आणि विपर्यास !

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा पूर्वार्ध. (covid-19),लॉक डाऊन वास्तव आणि विपर्यास !

The first half of the fourth wave of the Corona. (covid-19), Lock Down Reality and Perversion!

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा पूर्वार्ध. (covid-19),लॉक डाऊन वास्तव आणि विपर्यास !
X

संपादक - 9421302699

-------------------------------------------------

लेखक:श्री.तानाजी सखाराम कांबळे.

(8080532937)

रविवार विशेष!

--------------------------------------------------

भीती आणि पोटाला ग्रासली ती,भुकेची

चिंता मानवी आयुष्यामध्ये मनुष्याला,

रोगापेक्षा इलाज भयंकर करणारी ठरते.

तदनंतर माणसाला,स्वतःच आयुष्य जगणे

देखील कठीण जाते.

माणूस माणसाकडे दूषित नजरेने पाहतो व त्यालाच मानवी जीवनातील लॉकडाऊन असा प्रकार म्हटला जातो.

जगभर पसरलेले कोरोना अर्थात covid-19

तिचे प्रमाण,श्रीमंत आणि अंगावर

घेऊन मायदेशी स्वभुमी कडे,रवाना केले.

त्यातल्या त्यात मायभूमीच्या, पुण्या-मुंबईसारख्या मायावी नगरीतून,खेडोपाडी वाड्या वस्ती वरती,

सणासुदीचे फराळ वाटल्या सारखे पसरले.

प्रसार आणि प्रचारात व्यस्त असलेले नेहमीचे सरकार उद्धवा दरबारी हाताश बसले आहे.

असली कोरोना नकली लॉकडाउनच्या अंथरूणखाली झोपून,एकेका सावजाला टिपायला लागलेला आहे.

एखाद्या मतिमंद मुलाला उन्हाळा पावसाळा हिवाळा सर्व ऋतू सारखेच वाटत असतात, अगदी तशाच पद्धतीने सर्वांची ती केविलवाणी अवस्था झाली आहे.

रस्ते सुरू आहेत पण, रस्त्यावरून चालावयास मन धजत नाही.मला इतरांशी बोलायचे आहे पण,त्यांना माझ्याशी बोलावयाचे नाही.

मला काही खरेदी करावयाचे आहे पण,

निर्मनुष्य झालेले रस्ते बरंच काही बोलून दाखवून

जात आहेत.चौकाचौकात उभ्या असणाऱ्या पांढर्‍या गणवेशातील ट्राफिक हवालदाराची ती शिट्टी,

आता कुणालातरी थांबवण्यासाठी

वाजवताना दचकत आहे.

नेहमी सिग्नल तुटण्याचे कारण सांगून काढल्या जाणार्‍या पावतीच हात होणाऱ्या संसर्ग पायी त्याच्या मनाची स्वतःची समजूत काढत आहे. ठाण्यातील अंमलदाराचा डायरीवर सतत लिहिणारा,हात केस लिहायची येऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहे.

तहसीलदार कचेरीच्या कार्यालयातील टेबल वरती छान शी असणारी पाटी" नमस्कार बसा" अशी,

कधीच धूळ खात पडून गेली आहे.

यातून पळवाट काढण्यासाठी, ई सेवा केंद्रांच्या माती अव्वल कारकुनाला अधिकार देऊन, तहसीलदार, प्रांत,कलेक्टरकचरी यांनी पळवाटा काढल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या बांधावरती महिन्याला पगार घेऊन देखील न जाणारा कृषी विभाग,प्रत्यक्ष पिकाच्या पेरणी फवारणी खत लागवडीविषयी एसएमएस'द्वारे, जलद माहिती देऊ लागला आहे. वनाचे रक्षण करता करता, मुख्य महामार्गावरून होणारी जंगलातील अनेक संपत्तीची अवैद्य लाकूडतोड, आता बिनबोभाट नाका पास करू लागले आहेत. हिरवाईने नटलेल्या पर्वताच्या रांगा, रानमळा तुन थरथरत येणारे पाणी, उंचच्या उंच कडेकपारीतून येणाऱ्या पाण्याचे वाहते झरे, असा हिरवाईने नटलेला शालू बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना, त्या त्या गावातील गावकर यांच्या कडून covid-19 चा महाप्रसाद मिळत आहे.

तर काही महाभागांनी बांधलेल्या तलावा शेजारील फार्म हाऊस मधील देखील, अनपेक्षितपणे,थबकनारयांची उलट तपासणी पोलिसांमार्फत सुरू आहे. नेहमीच कङक इस्त्री मध्ये हाताचे दोन्ही बोटांमध्ये, सोन्याचे अंगठ्या घालून मिरवणारे व गळ्यामध्ये डबलबारी च्या सोन्याच्या चीना घालणारी,सध्या रिकाम्या गळ्या निशी, महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदा यांचे थकबाकीचे पेमेंट वसूल करणे करता कंत्राटदार तोंडाला रुमाल बांधून फिरताना दिसून येत आहेत.

टेबलावरती नमस्कार बसा अशी पाटी लावून टेबलाखालून घेणाऱ्या अनेकांची आता मोठी गैरसोय आणि गोची झाली आहे.

कधीकाळी अस्सल किक देणाऱ्या गावठी दारूला पाठ फिरवणारी मंडळी आता मांग वड्याच्या टेक वाडी वरती,गर्दी करू लागले आहेत.महामारी ने खिशाला चाट बसल्याने, इंग्रजी वरून देशी वरून गावठी दारू असा त्यांचा नित्यनेमाचे चा प्रवास बनला आहे.

लगीन सराई जत्रा यात्रा उत्सव काहीच नसल्याने,सोनाराचा चेहरा काळवंडलेला आहे.

देवाला कुलूप बंद केल्याने देवळातले वार्षिक नियुक्तीवर चे पुजारी, त्यातल्या त्यात चालू वर्षी चे मानकरी,

बंद देवळा आड जगाच्या भक्तांच्या विविध

विषयावरचा, कौल लावणारा गुरवाचा दामू अण्णा,

देवाला स्वतःचा कौल लावण्यासाठी

"पोटाचा" धडपडत आहे.

अधिक राशीने दरवर्षी भरलेले धान्याचे तट्टे,

यावर्षी कुंभाराचे घरात,रीकामे झाली आहेत.

केस कापाय साठी लागणारे साहित्य,थंडावल्याने अनेक जणांचे केस व दाढी साधू महाराजांच्या सारखे रोडावलेले व मळलेली आहेत.

नेहमीच शेजारच्या घरात भांडणे लावण्याकरता

जाणारी काकू,महामारी च्या भीतीपोटी फोनवरूनच आपला गुणधर्म वापरताना दिसून येत आहे.

तर अनेक माहेरवाशिन यांना,सणासुदीच्या निमित्ताने कुणीतरी इकडे येऊ नये यासाठी जोरदार दमदाटी करण्यात आलेली आहे.

पांडबा सावकाराची बुलेट गावभर हिंडून फिरून व्याज वसुलीच्या नादात,कांबळेच्या भाऊमाच परसदारातील जुनाट असलेल्या बरक्या फणसाच्या झाडाखाली

दररोज विसावा टाकत आहे.

दूध डेरीचा अंदु सेक्रेटरी,दूध घेताना टेस्ट च्या

नावाखाली माप भरून लवंडत आहे.

पोस्ट खात्याची जुनाट झालेली सायकल सध्या,

covid-19 योद्धा म्हणून मिरवत आहे.

गावाच्या वेशी वरती दगडे टाकून,गावातल्या फुटकळ कोरोना योध्याने आपल्याच बांधवांना यायचं नाही म्हणून दरडावाला सुरुवात केलेली आहे.

माईच्या अंगाखांद्यावर ती खेळणार नातवंड, कानाला अंगाई गीत मोबाईल वरती ऐकण्या, परीस"आपने हात,पाव की,स्वच्छता रखे,

फेस वॉश, साबण या सॅनिटायझर का इस्तेमाल करे, खांसी बुखार,तेज रफ्तार होने से कोई भी लक्षण दिखाई दे तो त्वरित,सरकारी अस्पताल से संपर्क करे

भारत सरकार द्वारा सूचित किया गया प्रमाण!

आशया ची रिंगटोन सतत कानी पडू लागल्याने,

ते लहानसं लेकरू कावरंबावरं झालेला आहे!

एकच वाक्य सतत कानी पडू लागल्याने त्याचा

रडण्याला आता एक नवीन कारण मिळालेले आहे.

मुलगा झाल्यामुळे गावभर पेढे वाटता येत नाहीत

याचे दुःख,अतिव असे शेजारील

बेकरी वाल्याला झाले आहे.

Updated : 5 Jun 2022 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top