Home > M marathi blog > प्रेम प्रकरणातून टिपला गेलेला, पळसंबे येथील शाळा मास्तर!

प्रेम प्रकरणातून टिपला गेलेला, पळसंबे येथील शाळा मास्तर!

Taken from a love affair, School Master at Palsambe!

प्रेम प्रकरणातून टिपला गेलेला,    पळसंबे येथील शाळा मास्तर!
X


----------------------------------------------------

लेखक.श्री तानाजी सखाराम कांबळे.

----------------------------------------------------

कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगा ची खरी ओळख,गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा या शेवटच्या नागमोडी वळणे घेणार्‍या,कोकण किनारपट्टी च्या, तळकोकणात च्या शेवटच्या,असलेल्या गावाचे अवतीभोवती दर्या डोंगर खोर्‍याने पर्वतरांगाच्या छायेत नटलेल्या हिरव्यागार,गर्द अशा दाट छायेत,गगनबावडा पासून,

गगनबावडा ची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून,आहे.साळवन तालुका गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या गावापासून ते थेट पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वेशीत,असंळज,कॅन्टीन पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरती गावाच्या आतील वस्तीत वसलेले पळसंबे हे गाव.

हिरव्यागार गर्द दाट झाडी मध्ये लपून बसलेले अस,विविध वाड्या वस्ती असलेलं,टूमदार छोटसं गाव.

या पळसंबे गावाच्या उशाला असणारे रामलिंग मंदिर पळसंबे,तर पळसंबे च्या डाव्या बाजूला असणाऱ्या,श्रीमंत पंत अमात्य बावडेकर सरकार यांच्या,

शेतमळ्यालाला लागून असलेला जुनाट, देखना लोकप्रिय,भुताचा वाडा या दोन गोष्टींमुळे पळसंबे हे

छोटसं टुमदार देखणं असं गाव,अनेकांच्या नजरेत भरणारे ठरत.आहे.

पर्यटनासाठी अतिशय देखन असलेले या गावात,जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत एक छोटेखानी प्राथमिक शाळा आहे.सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी,इथल्या एका दूर गावच्या शाळा शिकवणी करणाऱ्या,मास्तरला सावज म्हणून, त्याच्याच नात्यातील एका,एका,तरुणीने टिपला.तशी ती त्याच्या नातलग पैकीच येक होती.पण अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी वाईटच होत असतो.

पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या प्राथमिक विद्यामंदिर पळसंबे या शाळेत,या शाळा मास्तरने शाळेच्या,

लहान विद्यार्थ्यांना शिकवली जाणारी विद्या,ताकतीने देण्याऐवजी,प्रेमाच्या शंकर शाळेत विद्यार्थी झाल्याने,

शाळेच्या उशाशी असणाऱ्या ओसाड माळावरती,रामलिंग मंदिराचेशेजारी,

त्याने प्रेमाचे अनेक दिवे पेटवले होते.कधीकधी भुताच्या वाड्या शेजारी,दिवसाकाठी एकाद,दुसरी फेरी त्यांची नक्की ठरलेली असायची.

शाळामास्तर च्या प्रेमाचे तास दिवसा गणिक वाढू लागल्याने,त्याच्या,भावी शाळा मास्तरनीच्या,घरच्यांची अस्वस्थता,खूपच टोकाची वाढतच चालली होती.

शाळांचा केंद्रप्रमुख वगळता,वा शिक्षणाधिकाऱ्यांची मनात घेतलेली धडकी वगळता,कोणताच मास्तर तडजोडीला शक्यतो तयार होत नाहीत.बाल मनाला शिक्षण देता-देता, त्यांच्या विचाराचं "मन" देखील,बालमनाने ठाई ठाई भरलेले असते.अपवाद वगळता या,सावज टिपला गेलेल्या शाळा मास्तर चा,आठवड्याच्या शेवटी असणाऱ्या सकाळी,शनिवारी भरदिवसा,सावज म्हणून टिपला गेलेल्या त्या मुलीच्या नातेवाईक यांचेकडून,तलवार कोयता चाकू सारख्या धारदार शस्त्रांनीशी,मास्तरला ताणून ताणून त्याच्या भाड्याने राहत असलेल्या घराच्या दारासमोर,सपासप वार करत,त्याचा खून केला.सावज म्हणून टिपला गेलेल्या त्या,तरुणीचे नातेवाईकांनी,अखेरला त्या शाळा मास्तर ची प्राणज्योत मालवली का याची खात्री करून त्या ठिकानाहुंन पोबारा केला.

तळकोकणचा घाट माथ्यावरती रामलिंग आश्रम व भुताचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या "पळसंबे" गावात घडलेल्या रुद्रावक,घडलेल्या खून प्रकरणाच्या घटनेच्या खुनाची चर्चा जोरात रंगू लागली.पोलिसांनी,या खून प्रकरणाची गंभीर व तातडीने दखल घेऊनआरोपींना तात्काळ अटक केली व न्यायालयांमध्ये या शाळेतील अनेक बाल विद्यार्थ्यांच्या साक्षी देखील झालेले,आहेत आहेत.

शाळा हे पवित्र विद्येचे मंदिर आहे.

मात्र या शाळेच्या दारात,धारदार शस्त्र आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाळा मास्तरला त्यावेळी वाचवायला स्थानिक कुठल्याही माणसाकडून मदत झाली नाही.

कारण शस्त्राला लागलेली रक्ताची चटक ही,मन हेलावणारी आणि काळीज हादरून टाकणारी असते.

नागमोडी वळणे घेणार्‍या एका शहराच्या,उपनगरातील,एका तरुणीने टिपलेल्या या शाळामास्तर ला,

अखेरीस आपला जीव द्यावा लागला.

ज्या शाळेत विद्या शिकवायची त्या ऐवजी,सावज म्हणून टिपला गेलेल्या बाईच्या "शंकर शाळेत"

शाळा मास्तरला शंकर शाळेत" विद्यार्थी" व्हावे लागल्याने,रक्ताच्या थारोळ्यात मास्तरला आपला जीव गमवावा लागला.

क्षणिक सुखाच्या मागे धावणाऱ्या

अशा अनेक सावज टिपणारे नजरा रस्त्यावरच्या थांब्या वरती,एसटी महामंडळाच्या बस स्टॉप वरती,रेल्वे स्टेशनच्या फलाटावरती,श्रीमंताच्या लग्न वराडत,अध्यात्मिक प्रवचन देणाऱ्या साधू महाराजांच्या डेरेदाखल आश्रमात,सावज टिपण्यासाठी,नेहमी तयार असतात,

टिपून घेणाऱ्या सावजाच्या प्रतीक्षेत!

----------------------------------------------------

Updated : 6 Jun 2022 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top