Home > M marathi blog > दिन विशेष ९ जुलै (अरबी दिनांक ९ जिलहज् ) अंतीम पैग़म्बरांचे अंतीम प्रवचन!

दिन विशेष ९ जुलै (अरबी दिनांक ९ जिलहज् ) अंतीम पैग़म्बरांचे अंतीम प्रवचन!

Special day जुलै 9th July (Arabic date 9th Jilhaj) अं Final discourse of the last prophet!

दिन विशेष    ९ जुलै    (अरबी दिनांक ९ जिलहज् )    अंतीम पैग़म्बरांचे अंतीम प्रवचन!
X

दिन विशेष

९ जुलै

(अरबी दिनांक ९ जिलहज् )

अंतीम पैग़म्बरांचे अंतीम प्रवचन!


संकलन

प्रा.सय्यद सलमान, पुसद


अरबस्थानातील 'आरफ़ात' नावाच्या मैदानात ९ जिल्हज् हिजरी सन १० (7 मार्च 632) रोजी पैग़म्बरांनी आपले अंतीम प्रवचन दिले.

आज ९ जिल्हज् आहे. चला, या निमित्तानं त्या प्रवचननाचे महत्त्वाचे अंश पाहू या!

🔹 प्रवचन🔹

👉 हे , लोकांनो ऐका! मला नाही वाटत कि मी पुढीलवर्षी तुमच्या दरम्यान राहिल, म्हणून माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आणि त्या लोकांपर्यंत पोचाव्यात जे येथे हजर नाहीत.

👉 लोकांनो! ज्याप्रमाणे आजचा दिवस, महिना आदरणीय व पवित्र आहे, अगदी याचप्रमाणे दुसऱ्या मुस्लिमांचे जीवन, अब्रू आणि संपत्ती पवित्र आहेत.

👉 लोकांचे माल आणि ठेवी त्यांना परत करा.

👉 कोणाला त्रास देऊ नका, कोणाचे नुक्सान करू नका, जेणेकरून तुम्ही सुद्धा सुरक्षित राहाल.

👉 याद राखा! तुम्हाला अल्लाह (ईश्वर) समोर हजर राहायचे आहे. तेथे तुमच्या कर्माबद्दल विचारना होईल.

👉 अल्लाह ने व्याजाला निष्द्ध (अवैध) ठरविले आहे. म्हणून आजपासून व्याज देणे- घेणे बंद करा. (माफ़ करा)

👉 तुमच्या स्त्रियांवर तुमचा हक्क आहे तसाच त्यांचा तुमच्यावर हक्क आहे. जेव्हां स्त्रिया तुमचे हक्क अदा करतात तुम्ही सुद्धा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा.

👉 व्यभिचाराच्या कदापि जवळसुद्धा जाऊ नका.

👉 हे लोकांनो, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका! फक्त् एकमेव अल्लाह (ईश्वर) ची भक्ती करा, पाच वेळा नमाज अदा करा, रमजान चे उपवास पूर्ण करा, आणि जकात (उत्पन्नातून 2.5% दान करणे) देत रहा, ऐपत असेल तर हज करा.

👉 स्त्रियांशी नम्रतेने वागा कारण ती तुमची अर्धांगिनी आहे, आणि निस्वार्थ सेवा करणारी.

👉 आज मी तुमच्या मधील सर्व भेदभाव नष्ट करित आहे. कोण्या गोऱ्याला काळ्यावर व कोण्या काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही, कोण्या अरबाला अरबेतरावर व अरबेतराला अरबावर श्रेष्ठत्व नाही. अल्लाहच्या नजरेत तुम्ही सर्वजन समान आहात. श्रेष्ठत्वाचा आधार फक्त ईशपारायणता (ईशभय) आहे.

👉याद राखा! एक दिवस तुम्हाला अल्लाह समोर जाब देण्यासाठी हजर व्हायचे आहे. सावधान! माझ्यानंतर मार्गभ्रष्ट होऊ नका.

👉 याद राखा! माझ्यानंतर कोणीही पैग़म्बर (संदेश देणारा) येनार नाही आणि कोणताही नवीन दीन (जीवनप्रणाली) येणार नाही.

👉 मी तुमच्यासाठी दोन गोष्टी सोडून जात आहे. एक क़ुरआन आणि दूसरे माझे जीवन (सुन्नत) जर तुम्ही याचे पालन केले तर कधिही मार्गभ्रष्ट होणार नाही.

प्रवचना नंतर पैग़म्बरांनी तीन वेळा आकाशाकडे बोट दाखवून म्ह्टले, " हे अल्लाह तु साक्षी राहा, आज मी तुझा संदेश तुझ्या दासांपर्यंत पोहोचवला.

संकलन

प्रा.सय्यद सलमान, पुसद

Updated : 2022-07-09T12:08:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top