Home > M marathi blog > सरकारचे प्रतिनिधित्व करून सरकारला लुटणाऱ्या बैमान पुढाऱ्यांनो,तुमचं राजकारण चुलीत जाऊ द्या!

सरकारचे प्रतिनिधित्व करून सरकारला लुटणाऱ्या बैमान पुढाऱ्यांनो,तुमचं राजकारण चुलीत जाऊ द्या!

Robbing the government by representing the government Dishonest leaders, let your politics go to the stove!

तुमचं राजकारण चुलीत जाऊ दे!

----------------------------------------

तानाजी सखाराम कांबळे.

रविवार विशेष 10 एप्रिल 2022

----------------------------------------

ते,ही चोरच आहेत.

आम्ही तुम्ही चोरच आहात.

सत्ताधाऱ्यां नो आणि विरोधी बाकावर च्या नो!

एकाच माळेतले मणी तुम्ही!

राजकारण्यांनो तुमचं राजकारण चुलीत जाऊ दे!

पिढ्यान पिढ्या राजकारणात,पोर तुमची!

धुनी भांडी करायसाठी कार्यकर्त्यांची फौज हवी,

पिढ्यान् पिढ्या तुम्हाला बारा बलुतेदारांची,

अन अठरापगड जातींची!

जातीसाठी माती खाणारे,जातीजातीतील पुढारी.

तुमच्या हवेलीच्या दरवाजावरती गळ्यात

पट्टा बांधून उभी असतात,

इंच बर तुकडा मिळेल या आशेने!

ज्याच्या-त्याच्या जातीची एक गट्टा मतांची

झोळी शबनम बॅगेमध्ये काखेला अडकवून पुरोगामी आणि प्रतिगामीअसणाऱ्या सोंगाड्या राजाच्या दरबारात!

छातीला ज्याच्या-त्याच्या बिल्ले आणि फेटे बांधून डोक्यावरती.भगवा,पिवळा,निळा,आणि हिरवा.

देशालाच मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर,अशी लाचार पिलावळ तयार केली तुम्ही राजकारणात,

कोण बिरोबा ची शपथ घेऊन,तर कोण,

निळा रंगाची भीम प्रतिज्ञा घेऊन,

एकाने अल्लाह के बंदे है हम म्हणायचे,

तर दुसऱ्याने हिंदुत्वाचा भगवा खांद्यावरती घेऊन,

जय श्रीराम म्हणायचे!

लबाडांची आवलाद तुमची,

तुमचं राजकारण चुलीत जाऊ दे!

72 हजार कोटींचा सिंचनाचा घोटाळा करून,

धरणात मुतणारानो!

चोपन्न सहकारी साखर कारखान्याची

खाजगीमालकांना विक्री करणाऱ्यांनो!

बेकायदेशीर कर्जाचे,करोडो रुपये मध्ये वाटप करणाऱ्यांनो,तुमची पोरं सापडतात जेव्हा पब आणि डान्स बार मध्ये,पिक्चर मधल्या हिरोइन सोबत डेटिंग करताना,आणि उजेडात येतात,चोरून केलेले तुमची अनेक लग्न,आणि त्यांच्यासाठी घेऊन ठेवलेले कोट्यावधी रुपये चे फ्लॅट,त्यांच्या नाव वरती केलेले तुम्ही अगणित अशी संपत्ती,निवडणूक आयोगा पासून दडवून ठेवलेली अन कधीतरी उजेडात येते!

तुमच्या पोराबाळांची लग्न लावताना केलेला करोडो रुपयांचा खर्च,अब्जावधी रुपये चा बांधलेला आलिशान बंगला,कोट्यावधीची स्थावर मालमत्ता,

सोने हिरे जडजवाहीर,याचा हिशेब जेव्हा तुमच्यावर धाडी पडते तेव्हा बाहेर येतो!

सरकारचे प्रतिनिधित्व करून सरकारला लुटणाऱ्या

बैमान पुढाऱ्यांनो,तुमचं राजकारण चुलीत जाऊ द्या!

देवस्थान,मुलकी पड,सहकारी संस्था तोट्यात दाखवून तिची स्वमालकीची जागा,शिक्षण संस्थेच्या नावाखाली शेकडो एकर जमिनी सरकारी कवडीमोल दरात ढापणाऱ्या नो,गाईच्या थानाला हात लावून दुधाची

धार न पिळणाऱ्या दूध संघाच्या संचालका नो,

शेताच्या बांधावरच्या सरीत उभ्या-आडव्या उसाच्या पाटक्याला पाणी न पाजणाऱ्या,

नकली शेतकऱ्यांनो,लाखो रुपये च्या किमती च्या गाडीतून सरकारी खर्चात फिरताना लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला,जेव्हा हजारो शेतकऱ्यांच्या त्या शेताच्या बांधावर ती आत्महत्या होतात,त्याने घेतलेल्या लेकरा बाळा च्या लग्ना पायी शिक्षणा पायी,आणि शेती उत्पादित मालाला हमी भाव न मिळाल्यास पायी,

खाजगी सावकारी कडे पसरलेले चारी बाजूने त्याचे हात,सहकारी बँकांनी लावलेल्या वसुली व जप्तीचा त्याच्यावरती धपाटा,त्याच्या शेतातील तोडले जाणारे नेहमीचे थकबाकीचे कारण दाखवून विजेचे कनेक्शन,घरातल्या खुंटीवरती त्याच्या पोरग्याच्या,

पदवीचे नोकरी अभावी लटकत राहणारी

कागदपत्रे,कधी गेलाय का बघायला राजकारण्यांनो!

पांढरे धोतर खादीची कपडे घालून

मोठी मोठी भाषणे करणाऱ्यांनो,जरा तरी

लाज बाळगा जनाची नाही मनाची!

तुमचं राजकारण चुलीत जाऊ दे!

आम्हाला तुम्ही नको आणि तुमचं राजकारण नको!

आमचा शेताचा बांध आणि शेताची उसाची सरी,रात्रपाळीला,सरीच्या पाटक्याला

पाजलं जाणार आमच्याकडून मेहनतीचं पाणी,

आमच्या बापजाद्यांना आमच्या नशिबाला बांधून

ठेवलंय!आता आम्हाला ऐकायचे नाही तुमच्या गप्पा,

अन तात्पुरत्या काळासाठी विरोधकाच्या

बरोबर तुम्ही करत असलेली भांडणे,

सारं काही लबाड!

सारं काही सत्तेसाठी!

सारं काही खुर्चीसाठी!

तुमचं राजकारण चुलीत जाऊ दे!

तुमचं राजकारण चुलीत जाऊ दे!

Updated : 10 April 2022 5:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top