Home > M marathi blog > रमजा़न विशेष लेख _रमजा़न मध्ये ननेमकं काय होते..?_

रमजा़न विशेष लेख _रमजा़न मध्ये ननेमकं काय होते..?_

_" तुमच्या पैकी ज्या कोण्हाला हा पवित्र रमजा़न महिना मिळाला तर त्याला पाहिजे की या महिन्याचे रोजे (उपवास)ठेवावे ."_ ~2:185

रमजा़न विशेष लेख    _रमजा़न मध्ये ननेमकं काय होते..?_
X

रमजा़न विशेष लेख

_रमजा़न मध्ये ननेमकं काय होते..?_

_" तुमच्या पैकी ज्या कोण्हाला हा पवित्र रमजा़न महिना मिळाला तर त्याला पाहिजे की या महिन्याचे रोजे (उपवास)ठेवावे ."_

~2:185

सर्व प्रथम तर सर्व भारतीय बांधवांना पवित्र रमजा़न महिन्याच्या शुभेच्छा कारण हा महिना सर्व मानवजाती करिता आहे. परंतु काहीच लोक आहे जे या महिन्या लाभ घेतात तर . काही लोकांना या महिन्या विषयी कुतुहल असते की काय असते रमजान? , रोजे कशे व का ठेवतात? या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात देण्याचा प्रयत्न करेन ...

रमजान कुरआन अवतरणाचा महिना. कुरआन इस्लामचा आधार आहे. इस्लामची तत्वे, नीतिमूल्ये, उपासना, इमान, आदेश आणि उपदेश तसेच अन्य शिकवणीचा स्रोत असणारा ग्रंथ आहे. इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद [स.] यांच्यावर या ग्रंथाचे अवतरण रमजान महिन्यात सुरू झाले. पुढील २३ वर्षे या ग्रंथाचे अवतरण होत राहिले. मात्र सुरुवात रमजान महिन्यात झाली म्हणून या महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. किंबहुना हे महत्व अल्लाहतर्फेच निर्धारित करण्यात आले.

रमजान महिन्यात कुरआनच्या अवतरणासंदर्भात कुरआनात आलेली आयत अशी आहे,

रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुरआन अवतरीत केले गेले; जे मार्गदर्शक आहे समस्त मानवजातीसाठी. ज्यात मार्गदर्शनाचे स्पष्ट प्रमाण आणि सत्य–असत्यादरम्यान फरक करणारे निकष आहेत. तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी या महिन्याला प्राप्त करेल, त्याने रोजांचे पालन करावे. [सुरह बकरा : आयत १८५]

वरील आयाती मध्ये स्पष्ट वर्णन आहे की हा कुरआन संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत करण्यात आला आहे .इथे हे नव्हे की फक्त मुस्लिम लोकांसाठी परंतु आमचे दुर्दैव हे की आम्ही कुरआन ला फक्त मुस्लिमांचा धर्मग्रँथ समजून बसलो त्यामुळे कुरआन कधीच आपण वाचले नाही.

मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी कुरआन ग्रंथ अवतरीत करण्यासाठी अल्लाहतर्फे या महिन्याची निवड करण्यात आली. अध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्वाचा ठरतो. उदा. दिवसाच्या ठराविक वेळेचे काही लाभ असतात. सकाळी केलेले व्यायाम शरीरासाठी अन्य वेळी केलेल्या व्यायामापेक्षा लाभदायक ठरते. रात्रीची झोपेचे लाभ दिवसाच्या कोणत्याही वेळची झोप घेऊन प्राप्त केले जाऊ शकत नाहीत. तसे अध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यातून प्राप्त होणारा अध्यात्मिक लाभ अन्य कोणत्याही महिन्यात प्राप्त केला जाऊ शकत नाही.

म्हणूनच अल्लाहतर्फे या महिन्याची निवड विशेष उपासनेसाठी करण्यात आली. 'रोजा' अल्लाहची विशेष उपासना आहे. अल्लाहप्रति कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी ही उपासना केली जाते. इस्लाम धर्मानुसार आणि कुरआनच्या मांडणीनुसार रमजान हा अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना आहे. एखादी व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनःपूर्वक या महिन्याच्या उपासनाविधी पार पाडते, तेव्हा अभूतपूर्व आत्मिक शुद्धी अनुभवते.

रोजा़:

रमजा़न महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी सहेरी म्हणजेच उपवासाचे जेवण जे आपण दररोज करतो ते केले जाते फजरच्या आजान पर्यत तिथं पासून तर पार संध्याकाळच्या मगरिबच्या आजनच्यव वेळेस रोजा संपवला जातो त्यावेळेस एक खजूर,पानी, कोव्ह फळ खाऊन प्रार्थना करून रोजा सोडला जातो या मधल्या14 तासाच्या काळात कोणत्याच प्रकारच खान,पिन जमत नाही पूर्णवेळ उपवास आणि अल्लाह स्मरण नमाज पठण, कुरआन वाचम , अल्लाहच नाम स्मरण हे सर्व सतकृत्य चालत असतात.

तरावीह (रात्रीत थांबून नमाज़ पठण)

या महिन्यात जगभरात मुस्लिमांतर्फे महिनाभर रोजांचे पालन केले जाते. विशेष नमाज 'तरावीह' च्या माध्यमातून महिन्याभरातून संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते या मध्ये दररोज बांधव इशा नमाज नन्तर तरावी ची नमाज जी की कुरआन च्या 1 पाऱ्या(भागा) सोबत कुरआन ऐकून पठण करतात या नमाजला 2 तास लागतात . रोजा आणि तरावीहची विशेष नमाज या महिन्यातील उपासनेचे अत्यंत महत्वाचे अंग आहेत. या व्यतिरिक्त रमजानच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात दानकार्य केले जाते. प्रेषित मुहम्मद [स.] या महिन्यात वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यापेक्षा जास्त दानशूरता दाखवीत असत. म्हणून धर्माचरण करणारे मुस्लिम अनुयायी जगभरात मोठ्याप्रमाणात दानकार्य करतात. सदका, खैरात, फित्रा आणि जकात सारख्या अनेक स्वरूपात गरजूंना आणि वंचितांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

नातेवाईकां सोबत सदव्यव्हार

या महिन्यात नातेवाईकांवर विशेष लक्ष देण्यात येते.तसेच आपल्या शेजाऱ्यांना उपवासाच्या पूर्वी घरचे जेवण देवाण घेवाण करतात .तसेच लहान मुलांनी रोजा़ ठेवला तर त्याला "रोजा़ खुलाई" म्हणतात आणि त्याला सर्व परिसरातील बांधव पैसे आणि कपडे बनवितात त्यामुळे लहान मुलांना खूप मजा वाटते.

दया व करुणा

तसेच हा महिना प्रेम आणि वात्सलयाचा आहे. जर कोणत्या बांधवाला कोण्ही कर्ज दिले असेल आणि त्याला देण्याची इतपत नसेल तर त्याला सवलत देली जाते आणि कोण्ही तर माफ सुद्धा करून टाकतात. आणि सहानुभूतीने वागतात.

आत्मचिंतन

_"रमजान महिन्यात जर श्रद्धा आणि चिंतन मनन सोबत जर कोणी रोजे़ ठेवले तर त्याचे मागील पाप माफ़ करण्यात येते."_

त्यामुळे या महिन्यात सर्व इमानधारक मागील वर्षात कोणत्या चुका केल्या किती वाईट आणि चांगले कार्य केले याचे चिंतन म्हणन करीत असतात आणि आपल्या वाईट कृत्या वर अल्लाह समोर दया याचना करून पापाचे प्रायश्चित्त करून घेतात. म्हणूनच तुम्ही पहाल की जो 11 महिने काही वाईट कृत्य करीत असेल तर या महिन्यात ते करत नाही कारण त्याला रोजा असतो तर हेच उद्देश आहे.रोज्याचा की त्याला 11 महिन्यासाठी अश्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते की त्याने वर्षभर अश्या प्रकारचे आपले इमानदारीने अल्लाह चे भय बाळगून जीवन जगावे आणि एक समाजउपयोगी मनुष्य निर्माण व्हावा हा रमजान चा उद्देश आहे.

मागे झालेल्या पापाची/वाईटकृत्याची क्षमायाचना

माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे .कळत नकळत त्याच्याहताने चुका होत असतात आणि त्या स्वाभाविक आहे. परंतु चुकिला चुक समजणे हा सुद्धा एक नैतिकगुण आहे.म्हणूनच पवित्र रमजा़न महिन्यात प्रत्येक रोजा धरणारा इमानधारक बांधव आपल्या मागील कृत्यावर चिंतन करून त्याची अल्लाह समोर उभ राहून क्षमायाचना करतो रात्रीला उठून केलेल्या वाईट कृत्यावर पश्चताप करून समोर असं वाईट कृत्य नकरण्याच निर्धार करतो त्यामळे त्याला एक नैतिक सकारात्मक बल प्राप्त होतो आणि रोज्याचा उद्देश सुद्धा हेच आहे की मानवाला नैतिकता शिकवून आदर्शसमाज निर्माण करणे जो की कोणत्याही कृत्याचा जाब द्यायचा आहे या भीतीने पुढील 11 महिने त्याने आपले जीवन जगावेत.

माझ्या बंधूंनो अल्लाह कडून आपल्या सर्वांना हा महिना मिळाला आहे त्याचे खूप मोठे उपकार आहे . असं होऊ शकते की पुढचा रमजा़न आपल्यातील काही लोकांना मिळणारसुद्धा नाही त्यामुळे या मिळालेल्या संधीचा उपयोग करून याच महिन्यात पवित्र कुरआन आपल्या भाषेत वाचण्याचा निश्चय करा.आणि या महिन्यातच आपल्या मराठी भाषेत कुरआन वाचा जर मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेत कुरआन वाचण्याची ईच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मोफ़त घरपोच कुरआन पोहोचवु त्यासाठी खालील नंबरवर आपल्या व्हाट्स ने नाव व पित्यासह एक मॅसेज करावा किंवा कॉल करावा ,धन्यवाद....!


प्रा.सलमान सय्यद, पुसद. ✍️

9158949409

Updated : 10 April 2022 7:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top