Home > M marathi blog > राजू शेट्टी यांची अस्वस्थता!

राजू शेट्टी यांची अस्वस्थता!

Raju Shetty's discomfort!


----------------------------------------------

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे

----------------------------------------------

माझा आजा भाऊमा कांबळे,मला लहानपणी चार दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगून जायचा.लेका,पोटभर जेव मस्तपैकी खेळ,गाव भर हिंडून ये!

आणि "माणसं" वाचायला शिक.त्याच माणसाच्या सोबती रहा ज्याच्या अंगात "पावर" असेल.पण मस्ती नसली पाहिजे अंगात,घोडा उधळल्या सारखी.

भाऊमाच लॉजिक या काळात,मला खूप काही

शिकवून गेलं.

समाजकारण राजकारण राजकारणातून सत्ता व सत्तेतून महत्वकांक्षा,वाढतच चालल्याने,आज-काल अनेकांच्या महत्वकांक्षा अतिशय वाढू लागले आहेत.राजकारणाचा शेवटचा टप्पा म्हणून मंत्रालयाकडे बघितले जाते.

काल,ज्यांच्या भोवती राजकारणाचा घोळका होता,

त्यांचा आज लाल दिव्याच्या गाडीचा कार्यकर्त्यांचा ताफा देखील मागचा गायब झालेला मी बघितला आहे.

महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्री यांच्या पीए च्या भोवती पडणारे आमदारांची गर्दी,आणि मग आज नाही,उद्या परवा बघू,आणि मोजक्याच व्हीआयपी यांची अपॉइंटमेंट पटापटा टाकताना,पीए आपल्या कामात गुंग होऊन जायचा.अप्रत्यक्ष पडद्या पाठीमागचा मुख्यमंत्री असल्याचे तोऱ्यात.आज तोच पीए,मंत्रालयाच्या पहिला माळा पासून ते सहाव्या मळा पर्यंत एकटाच फिरताना दिसतो.कधीमधी आम्ही दुरून लांबून दिसलो तर,

कांबळे साहेब,नमस्कार लक्ष असू द्या!

आमच्याकडे!असे म्हणत एक स्मित हास्य चा

कटाक्ष टाकून,चहा पिण्याची ऑफर देऊन निघून जातो.

पश्चिम महाराष्ट्रातून साखर पट्ट्यात,कोल्हापूर,उस क्षेत्राचा हिरवागार,साखर पट्टा म्हणून ओळखला जातो.इथल्या सहकारी तत्त्वावर च्या साखरेच्या काही चिमण्या,व खाजगी तत्त्वावर च्या साखरेचे काही,कारखाने गाळप हंगामात उच्चांकी

साखर गाळप करणारे व सर्वाधिक उतारा देणारे ठरतात.

मला आजही आठवतंय,आमच्या शेतातील ऊस त्या

वेळी,अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड सातारा,येथे जात होता प्रतिटन सातशे रुपये या दराने.

आमची आई त्या वेळी अजिक्यतारा अजिक्यतारा असं सारखं म्हणत होती.उसाचे उत्पादन आणि त्याचा हमीभाव किती असावा याविषयी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला काही माहिती त्या काळात नव्हती.

ऊसाच्या शेतात सकाळपासून साज पर्यंत राबराब राबायचे रात्रीचे पाणी पाजायचं,सोसायटीचे वारेमाप

कर्ज फेडायचे. घेतलेले नसलेले कर्ज आणि व्याज,

गावागावातील संस्था सचिव आताच सेक्रेटरीला,

दिला जाणारा मान-मरातब,हिरव्यागार ऊस मळ्याच्या साखर पट्ट्यातील,शेतकऱ्यांच्या साठी,अल्पशा समाधानाचे नक्कीच होते.तो काळ होता,तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा.

ऊस दराचे संदर्भात,विविध शेतकरी संघटना यांचे वतीने आंदोलन जोरात सुरू होती.तत्कालीन आरोग्यमंत्रीदिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या बंगल्या वरती मोर्चा काढण्याचे नियोजन झाले होते.तत्कालीन दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे आरोग्यविषयक काम खूप चांगले होते.आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी,राज्यातील जिल्हा स्तरावरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याची शासन स्तरावर ती मंजुरी दिल्याने,

राज्यातील विविध शिक्षण सम्राटांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली.शिक्षण सम्राटांची दुकानदारी करोडो रुपये

मध्ये बुडण्याचे कारणाने,बऱ्याच शिक्षण सम्राटणि

एकत्र येऊन,कोल्हापुरातून करवीर विधानसभा मतदार संघासाठी,सध्याचे महाराष्ट्र विकास आघाडीचे

कोल्हापूरचे पालकमंत्री तथा मालक मंत्री,म्हणून चर्चेत असलेले,विधान परिषदेचे सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांना,सगळ्यणि पाठिंबा देण्याचे ठरवले.

या दरम्यानच्या काळात,शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते कार्यकर्ते यांची आंदोलन तापले होते.

तत्कालीन परिस्थितीमध्ये राजू शेट्टी यांना,

करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील उसाची शेती मळ्यामध्ये,बेदम मारहाण करून टाकले होते.

या पाठीमागे तत्कालीन दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर,यांचा हात होता अशी चर्चा सुरू झाली.

अर्थातच या पाठीमागे दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांना पाडण्याच षड्यंत्र होते.

मात्र, राजू शेट्टी यांनी मार खाल्लेली परिस्थिती

वस्तुस्थिती खरी होती.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री,नामदार

सतेज उर्फ बंटी डी पाटील यांना,राजकारणात आणण्यासाठी,तत्कालीन विधान परिषदेचे सदस्य तथा त्यावेळचे जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक हेच कारणीभूत होते.शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हि महाडिक यांची राजनीति,आज घडीला महाडिक घराणे यांची,राजकीय कारकीर्द संपवाय कारणीभूत ठरलेली आहे.मात्र,झालेल्या मारहाण मध्ये राजू शेट्टी यांना,

सहानुभूतीची लाट इतक्या प्रचंड प्रमाणात मिळाली की,

जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले राजू शेट्टी हे,शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले.

तद्नंतर उसाला दोन हजार रुपये दर मिळाला,

अचानक मिळालेल्या अडीच पट दराने शेतकरी सुखावला.राजू शेट्टी आमदार झाले.

तद्नंतर ते दोन वेळा खासदार झाले.

शेतकरी संघटनेचे नेते,तथा शेतकऱ्यांचे कैवारी,शेतकरी चळवळीतील थोर अभ्यासू व्यक्तिमत्व,वरिष्ठ स्वेच्छा सेवानिवृत्ती सनदी अधिकारी,दिवंगत शरद जोशी यांच्याशी फारकत घेऊन, श्री.राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना याची स्थापना केली.

शिवार ते संसद असा आपला प्रवास चरित्रात्मक लिहिणारे,माजी खासदार राजू शेट्टी संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांची एकूणच कारकीर्द पाहता,माजी खासदार शेट्टी यांची लपून राहिलेली,राजकीय महत्वकांक्षा,सत्तेत न मिळणारे स्थान,मिळालेच संघटनेतील अनेकांना द्यावे लागेल,

व कदाचित ते आपल्यापेक्षा मोठी होतील ही,

श्री.शेट्टी यांना सतावणारी अनेक वर्षांची भूमिका शेट्टी यांची स्वतः मोठे होण्याची महत्वकांक्षा,देश पातळीवरील विविध शेतकरी संघटनांचे नेतृत्व करण्याची अति महत्वकांक्षा,गरज नसताना काश्मीरमधील सफरचंदाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती उत्पादित मालाला हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन करणार असल्याचे वक्तव्य,प्रत्यक्ष काश्मीर या ठिकाणी जाऊन,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील विविध काम

करणाऱ्या चांगल्या,कार्यकर्त्यांची स्वाभिमानी शेतकरी

संघटनेकडून राजू शेट्टी यांनी केलेली हकालपट्टी,

श्री.शेट्टी यांच्या अतिमहत्त्वाकांक्षी पाई अनेकजणांनी

राजू शेट्टी यांच्या घरचा दरवाजा सोडलेला आहे.

आज राजू शेट्टी विविध कारणाने त्रस्त आहेत अस्वस्थ आहेत.या पाठीमागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठेवलेल्या मोठ्या महत्त्वकांक्षी पाई,त्यांच्यापासून अनेक मोठे शेतकरी संघटना या चळवळीतील नेते विभक्त झाले आहेत.किंबहुना ते मोठे होऊ नये यासाठी श्री शेट्टी यांनी प्रयत्न केलेले आहेत.

अशी कोणती माणसे आहेत की जी स्वाभिमानी

शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून होतीत,

आणि ज्यांना,स्वाभिमानीचे नेते श्री.शेट्टी यांनी वेळोवेळी बाजूला काढली आहे.श्री शेट्टी यांना त्यांचे एकमेव नेतृत्व मोठे व्हावे असे का वाटते.व इतरांना संधी मिळताच ते नेहमी,अनेकांची पक्षातून हकालपट्टी का करतात?

याचाच आढावा आपण दुसऱ्या भागात घेणार आहोत.

क्रमशः भाग एक.

लेखक. श्री. तानाजी सखाराम कांबळे.

लेखक,राज्यस्तरावरील वरिष्ठ बातमीदार असून,

सध्या ते विविध वृत्तपत्र,वेबपोर्टल यांचे साठी

मंत्रालय मुख्य प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.

लेखक श्री.कांबळे यांनी आत्तापर्यंत 22 वर्षाची

पत्रकारिता मध्ये योगदान दिलेआहे.

Updated : 7 April 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top