Home > M marathi blog > झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊ‼️

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊ‼️

On the occasion of the death anniversary of Queen Lakshmibai of Jhansi, let us know about her

ZakirHussain - 9421302699

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे फार मोठे योगदान आहे. राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या शौर्याच्या आणि धैर्याच्या बळावर बलाढ्य इंग्रज सत्तेला तोंड दिले होते. या शूर राणीला पुण्यतिथीला संपूर्ण देशात अभिवादन दिले जाते. राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे त्यांना 'क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता' असे संबोधले जात होते.

लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८२८ रोजी झाला होता. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई अवध्या ३० वर्षांच्या असताना 18 जून 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याशी लढताना धारातिर्थी पडल्या.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या शौर्याच्या आणि धैर्याच्या बळावर बलाढ्य इंग्रज सत्तेला तोंड दिले होते. या शूर राणीला पुण्यतिथीला संपूर्ण देशात अभिवादन दिले जाते.

युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. इ.स. 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. सासरी आल्यानंतर मणिकर्णिकेचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. गंगाधरराव यांच्या निधनानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वत: झाशीची जबाबदारी स्वीकारली. राणी लक्ष्मीबाई यांचे कार्य लक्षात घेता ब्रिटिशांनी त्यांचा उल्लेख 'हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला.

Updated : 7 Jun 2022 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top