Home > M marathi blog > "अखंड भारत" या अजेंड्यावर...2024 च्या निवडणुकीचा प्लॉट तयार झाला

"अखंड भारत" या अजेंड्यावर...2024 च्या निवडणुकीचा प्लॉट तयार झाला

On the agenda of "Undivided India" ... the plot of 2024 elections was prepared

अखंड भारत या अजेंड्यावर...2024 च्या निवडणुकीचा प्लॉट तयार झाला
X

जाकीर हुसेन - 94213026


लेख : म्हणजे संघ-भाजपला अजून किमान 15 वर्षे सत्तेत राहायचंय तर...

2024 च्या निवडणुकीचा प्लॉट तयार झाला "अखंड भारत" या अजेंड्यावर...

बरं मग ह्या दरम्यान कितीही महागाई होवो, बेरोजगारी वाढो,देशाची कितीही दुर्दशा होवो ह्यांच्याकडे त्यावर उत्तर तयार असेल "अखंड भारत"...

अंधभक्तांना हे दिव्यस्वप्न प्रेरित करीत राहील... पेट्रोल 200 रु लिटर झाले तरी त्याला फरक पडणार नाही..

असो,आहे त्या भारताची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललीय ...

अखंड भारतात आजूबाजूचे बेचिराख आणि दरिद्री देश आणून दुष्काळात तेरावा महिना करायची अवदसा तशीही भयंकर अतार्किक आणि बिनडोकपणाचीही आहे...

श्रीलंका दिवाळखोर झालाय...पाकिस्तान भिकेला लागलाय,अफगाणिस्तान तालिबानी राजवटीत बेचिराख झालाय...नेपाळ, म्यानमार, बांगलादेश हे कधीच संपन्न नव्हते...

मग ह्या दरिद्री आणि बेहाल देशांना अखंड भारतात आणून कोणती मोठी क्रांती होईल...

बरं त्यामुळे मुस्लिम लोकसंख्या वाढून हिंदू अल्पसंख्य होतील त्याचं काय?

अखंड भारताचा पंतप्रधान मुस्लिम झाला आणि त्याने संघावर बंदी आणली तर त्याला जबाबदार कोण राहील?

बरं पुढच्या 15 वर्षात ह्या देशांमधील लोकसंख्या प्रचंड वाढेल आणि भागवतजी ती जास्त प्रमाणात मुस्लिम असेल मग तुमचं हिंदुराष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होईल?

अर्थात तुम्ही हे सर्व मोदी सरकारचे सर्व पातळ्यांवरील अपयश झाकण्यासाठी बोलत असाल तर ठीक आहे

आणि तसे नसेल तर...

भागवतजी विचार करा...हे तद्दन तर्कहीन आणि अर्थहीन आहे

Updated : 2022-04-17T15:10:01+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top