Home > M marathi blog > आता येथील "भडवे" सारे!

आता येथील "भडवे" सारे!

Now all the "pimps" here!


-----------------------------------------

कवी.श्री तानाजी स.कांबळे

-----------------------------------------

श्री.कांबळे यांनी लिहिलेल्या स्व - आत्मचरित्र,

[जांभळी नदीकाठावरील"अस्वस्थ" मणे!]

या मधुन साभार!...

कवी,राज्य स्तरावरील "वरिष्ठ बातमीदार"

असून सध्या ते "मंत्रालय प्रतिनिधी" म्हणून

वेब पोर्टल वरती आघाडीच्या प्रथम

क्रमांकावरती असणाऱ्या ममराठी न्यूज नेटवर्क करीता

"मुख्य बातमीदार" म्हणून काम पाहत आहेत.

आमच्या बातम्या पाहण्यासाठी,

wwwmmarathi.com ला भेट द्या.

8080532937.

---------------------------------------------

आता येथील "भडवे" सारे!

नमस्कार आणि चमत्कार करायला येथील सारे!

असतात काही मणे चांगले,

नसतात येते सज्जन सारे!

असतात काही पक्ष,अपक्ष,विरोधी पक्ष सारे!

निवडून गेल्यावर घोळक्यात असतात

कंत्राटदारांच्या सारे!

विकास नावाचं "पिल्लू"दर पाच वर्षांनी जन्माला येते.

60/ 40 च्या "कमिशन फॉर्मुलावरती" भांडतात सारे!

आता कंत्राटदारांनी ठरवले आहे.

कशापायी वाटायचे,कमिशन आपले!

निवडून आल्यावरती आपलेच पैसे,

आपल्याच खिशात राहतील सारे!

बांधून बंगला,घेऊन जमनी,

घरातल्या भिंतीमध्ये

पैसा पुरून ठेवतात सारे!

ऊषत काळाची वाट पाहतात,

झोपडपट्टीतल्या हागणदारीतील,लेकरं सारे!

पाण्यासाठी निघतो येते घागर आणि मोर्चा,

प्रशासनावरती खापर फोडून नामानिराळे राहतात सारे!

लाख मोलाच्या गाडी मधूनी,

पांढऱ्या धोट खादी मधूनी,

नमस्कार-चमत्कार साठी गल्ली मधुनी,

डिजिटल वरच्या फोटो मधुनी" हात जोडून"

दिसणार सारे!

छाती फुगते येथे,"96 कुळ" वाडीची!

निवडणुका येताच "जात" बदलू नी

"ओबीसी" होतात सारे!

कलेक्टर ऑफिस च्या दारावरती,

कंपाऊंडच्या बाहेर असणाऱ्या,

हिरव्या झाडाखाली,नेहमीच वाहते

निळ्या रंगाचे वारे!

कधीही न सुटती प्रश्न तयांचे,

बा "भिमाची लेकर" ती,शोषित पीडित,

दलित कष्टकरी सारे!

पाच वर्षातून एकदा केलेला नमस्कार,

समग्र लोकशाहीचा" बाजार" ठरतो.

नेता ही तेच करतो सेवक सुद्धा तेच करतो.

नेताजी सरकारी" मोठा" भूखंड लाटतात,

तर सेवक "छोट्या भूखंडावर" चे आरक्षण उठवतात.

जबरदस्तीने कूळ काढणारे,खाजगी सावकारी करणारे,

तीन पत्याचा जुगारला क्लब म्हणून,आदर्श तरुण मंडळाचे नाव देणारे,नगरीतल्या पेठेतील

वेश्याव्यवसाय ला,थारा देणारे,

बेकारी वाढवणारे,

गरीबी निर्मूलन चा नारा देणारे,

महिलांना रोजगार देतो म्हणणारे,

सरकारी मोफत शिक्षणाचे खाजगीकरण करणारे,रस्त्यात खड्डा पाडून आपल्या घरी,काढलेला खड्डा पैशाने मुजवणारे,

पैशाला पैसा उभा करणारे,

माडीवर माडी दर मजल करीत बांधकाम करणारे,कोट्यावधी रुपयांची माया गोळा करणारे,"ढेरपोट्या" आडदांड पोलिसांसारखे!

आलिशान बंगला सोने,

हिरे,माणिक पाचू जडजवाहीर,

विम्यापासून ते शेअर मार्केट पर्यंत

करोडोची गुंतवणूक करणारे!

महिला आरक्षण पडल्यास

स्वतःच्याच बायकोला उभा करून

महिला सक्षमीकरणाचा नारा देणारे!

आता येतील "भडवे" सारे!

आता येतील "भडवे" सारे!

नमस्कार-चमत्कार करण्यासाठी

दारावरती "हात" जोडून उभे राहतील सारे!

----------------------------------------------------

Updated : 26 May 2022 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top