Home > M marathi blog > उद्धारली कोटी कुळे ! भिमा तुझ्या जन्मामुळे.

उद्धारली कोटी कुळे ! भिमा तुझ्या जन्मामुळे.

Millions of families saved! Bhima because of your birth.


दिनांक 14 एप्रिल दोन हजार बावीस.

---------------------------------------------------------------

विनम्र अभिवादन!

श्रीमती.सावित्री सखाराम कांबळे.

श्री.तुकाराम सखाराम कांबळे.

सौ. सुनिता तुकाराम कांबळे.

सौ. प्रियांका एकनाथ पाटील

श्री.एकनाथ राजाराम पाटील,कोल्हापूर

श्री.विष्णू बाळू कांबळे पळसंबेकर..

Bcom,mcom,GDC.कोल्हापूर.

श्रीमती ताराबाई बळवंत कांबळे.केळोशीकर.

श्री.धर्मा गणपती कांबळे.माजी सैनिक कोल्हापूर.

श्री.दिलीप बाबुराव कांबळे आंबर्डेकर,[BSc.agri]

श्री.तानाजी सखाराम कांबळे.

कवी,लेखक,बातमीदार.

कुमारी.समीक्षा तानाजी कांबळे.

कुमारी प्रतिक्षा तानाजी कांबळे.

-------------------------------------------------------------

लेखक.श्री तानाजी सखाराम कांबळे.

8080532937.

email id-- TanajiKamble33@ gmail.com.

फेसबूक अकाउंट Tanaji Sakharam Kamble.

---------------------------------------------------------------

लेखक हे राज्यस्तरावरील वरिष्ठ बातमीदार असून,महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर ती असणाऱ्या लोकप्रिय म.मराठी या वेब पोर्टल चॅनल करता,

मंत्रालय मुंबई,मुख्य प्रतिनिधी म्हणून,

ते काम पाहत आहेत.

----------------------------------------------------

म.मराठी वृत्तसेवा मुंबई,

दिनांक -- 14 एप्रिल दोन हजार 22

updated --- 5: 58 am last.

--------------------------------------------------

ती माणसं होती मेलेल्या जनावराची

माऊंस खाणारे,केवळ भुकेपोटी.

त्या अठराविश्व दारिद्र्य च्या वेदना

आसमंतात घुमत होत्या चिरकाळ

टाहो फोडणारे!

स्पृश्य अस्पृश्यतेच्या त्या भिंती उभारल्या होत्या!

जनावरा पेक्षाही माणसाला हीन वागणूक देणारे!

दिस दिस बर राबणाऱ्या त्या हाताला,

हिरव्यागार शेताची मळे फुलवणाऱ्या बागायतदारांच्या कडून,जेव्हा दांडा फुटलेल्या कपातून दिला जात होता चहा आण केळीच्या पानावरती वाढले जात होती जेवण!

त्याच्या जगण्याच्या हक्कावरती,

जेव्हा,जानवेतील शेंडी वाल्यांनी गदा आणली होती,

अन त्याच्या कमरेला बांधला गेलेला सातत्याने तो खराटा,

रस्ता साफ करण्यासाठीचा!

त्याच्या सावलीचा देखील विटाळ मानला जात होता.

अंगावरच्या मुठभर कपड्यानिशी,

शिळा भाकर तुकडा निशी,सांज सकाळी खाऊन शेतमजुरी ला जाणारा तो,

गाव कुसाच्या वरचा, म्हारूडा!

त्याच्या जातीच्या नावाने शिव्या दिल्या

जात होत्या,नदी पाणवठ्यावर ती जनावरांना

पाणी पाजण्यासाठी गेले असता,

त्यांच्या तोंडातून शिवी निघत असे,

तुला घातलं म्हाराच्या गाडग्यात अन

शिजवुन खाल्लं म्हाराच्या माणसाने!

उपाशीतापाशी भर उन्हा तानात राबणार

रमणारे तुझं ते गरिबीत पोट,

जेव्हा अनेक श्रीमंत बागायतदारांच्या शेती

मळ्यात राब राब राबत होतं,

वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी!

गावकुसावरच्या शेताच्या बांधावरती उघडी-नागडी

खेळत होती त्याची लेकर बाळ,भटकत होती शिक्षणा विना आडदांड वाटेने!

मनामनात उभारल्या होत्या अस्पृश्यतेच्या जातीच्या भिंती जेव्हा,उषत काळाची वाट पाहत होते सारेजण तेव्हा!

आणि तू जन्माला आलास!

----------------------------------------------------------------

एक अद्वैतीक,शक्ती ताकद रंग-रूप आणि

बुद्धीच ज्ञान घेऊन,तुझं बालपण शाळा शिकता शिकता तुला खूप काही सांगून गेलं.

गाव कुसा वरच्या तुझ्या जात भाईंनी भोगलेले चटके,

तू जसा जसा मोठा होत गेलास अगदी तसाच तुझ्या ज्ञानाचा प्रकांड,सागर सूर्यासारखा सर्वत्र तळपू लागला.

तुझ्या बुद्धीच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा कस,

हळूहळू तुझ्या गाव गाड्या वरून जगभरात पोहचला.

मात्र तरीही तू थांबला नाहीस.अखंड ध्येयाने त्या लोकांचे साठी तुला काहीतरी करायचे होते.

म्हणून तू प्रकांड पंडित झालास.

थोर कायदेपंडित झालास,

भारतीय संविधानाचे शिल्पकार झालास तू!

हळूहळू आमच्या गळ्यातील,

लोटके आन कमरेचा खराटा,

कायमचा तोडून टाकला तू!

जातीपातीच्या उभारलेल्या

भिंती कायमचे नष्ट केल्यास तू!

गावकुसाबाहेरच्या झोपडीतून,

हक्कदार माणसांच्या वस्तीत,आणलस तू!

आज म्हारूड्याच्या घरातील गाडग्यात शिजवल जातय,

गुरा ढोरा ऐवजी,किलोन मटण बकर्‍याचं,

अन कोंबडीच्या चिकनच!

ठिगळ लावून शिवलेली चड्डी,

घालवलीस तू!

नवीन कपडे घालून माणसात

राहण्यासाठी माणूस बनवलस तू!

आज तुझी लेकरं तुझ्याच विचारावर चालत आहेत.

मात्र,तुझ्या तिल काही विषमतावादी लेकरं,

त्यांना गटातटाच्या वाटेवरती परतवून नेत आहेत.

तुझ्या त्यांनी वाटण्या केले आहेत.

विविध पक्ष्यांच्या पुढाऱ्यांकडून त्यांनी

देणग्या घेतल्या आहेत.

तुझ्याकडुन मिळालेल्या,या साऱ्या संपत्ती पुढे,

त्यांना इतरांच्या देणग्या मोठ्या वाटू लागले आहेत.

तरी देखील,अशा फुटकळ विचारांच्या अवलादीचा,

तू कधी बाप होणार नाहीस!

तुझ्या विचाराच्या वाटेने जाणाऱ्या,

बुद्धत्व स्वीकारणाऱ्या,

पंचशीला प्रमाणे आपले सार्वजनिक

जीवनात वर्तणूक ठेवणाऱ्या,

बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील 22 प्रतिज्ञा

याचे पालन करणारा,

तो प्रत्येक जण आज तुझा पुत्र म्हणून जिवंत आहे!

कोण झोपडीत आहे,तर कोण सिमेंटच्या जंगलाच्या माळरानातील,बंगल्यात आहे!

तर कोण सरकारी बंगल्यात आहे!

इतक सार बदल हे फक्त तुझ्या,

जन्मामुळे फक्त तुझ्या जन्मामुळे!

------------------------------------------------------------------

डोळ्यातुन अश्रुंचे थेंब टपकत

आहेत.लिहिणारे शब्द थरथर कापत आहेत.

इतका तू मोठा आहेस!

बुद्धितेजा,ज्ञानराजा,महामानवा,

तुझ्या जयंती दिनी,

या लेकरा कडून मानाची वंदना!

--------------------------------------------------------------------

Updated : 14 April 2022 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top