Home > M marathi blog > अनेकांना फुशारक्या मारायची सवय फार असते.

अनेकांना फुशारक्या मारायची सवय फार असते.

Many have a habit of bragging.

वाघाचा कलभुत दिसे वाघा ऐसा !

परी नाही दशा साच अंगी !!

बाहेरील रंग निवडी कसोटी !

संघष्टणें भेटी आपोआप !!

शिकविले तैसे नाचावे माकडे !

न चले त्या पुढे युक्ती काही !!

तुका म्हणे करी लटिक्याचा साठा !

फजीत तो खोटा शिघ्र होय !!

.............................................

अनेकांना फुशारक्या मारायची सवय फार असते.

आपल्या कडे किती ज्ञान आहे हे बळेबळेच लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात.काही जन तर चार हात लाकडाची नऊ हात धिपली काढत असतात.

अशा प्रकारची शेखी मिरवणारी,खोटा आभिमान बाळगणारी,लटका आव आणनारी माणसे तुकारामांच्या काळातही होती आणि आजही आहेत.अशा प्रवृत्तीच्या लोकांवर तुकाराम महाराज सदरील अभंगातुन भाष्य करतांना दिसतात.तुकाराम महाराज म्हणतात की,

वाघाचे कातडे,वाघाचा वेष जर एखादयाने परीधान केला तर तो वाघासारखा दिसेल परंतु वाघ होणार नाही किंवा त्याच्यामध्ये वाघाचे गुण येणार नाहीत.आजकाल बाहेरील रंगावर कसोटी ठरवली जात आहे.

परंतु प्रत्यक्षात त्याचा भेद वेगळा आहे.

हा भेद आपोआप लक्षात येतो.मदारी आपले माकड घेऊन माकडाचा खेळ करत असतो.ते माकड नाना

प्रकारे कला करून दाखवत असते.

परंतु त्या कला त्याला शिकविलेल्या असतात.

त्याची स्वत:ची अशी एखादी कला,युक्ती तो माकड दाखवत नाही तर मदारयाने शिकवले तेवढेच तो करतो.

शेवटच्या कडव्यात तुकाराम महाराज म्हनतात की,

या कातडे पांघरलेल्या वाघा प्रमाणे,शिकवलेल्या

माकडा प्रमाणे जो लटका आव आणतो,त्याचा लटका आव,त्याचा खोटारडे पणा एक दिवस ऊघडा पडतोच.कितीही खोटा आव आणला तरीही त्याची एक दिवस फजीती होतेच.थोडक्यात संत तुकारामांनी सदरील अभंगातुन मोठेपणाचा,खोटया प्रतिष्ठेचा,दांभिकतेचा आव आणनारयांवर टिका केली आहे आणि सांगीतले की हा खोटारडेपणा एकना एक दिवस ऊघडा पडून माणसाची फजीती होतेच.

------------------------------------------------------------------------------------

पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी!

--------------------------------------------------------------

राज्यसभा निवडणूक विश्लेषण.

विशेष वृत्त वाचा ममराठी न्यूज नेटवर्क मुंबई.

Updated : 11 Jun 2022 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top