Home > M marathi blog > महात्मा जोतीराव फुलेंनी १५० वर्षापुर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या अनुषंगाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्य

महात्मा जोतीराव फुलेंनी १५० वर्षापुर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या अनुषंगाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्य

Mahatma Jotirao Phule founded Satya Shodhak Samaj 150 years ago. Accordingly, on the occasion of the centenary golden jubilee year

महात्मा जोतीराव फुलेंनी १५० वर्षापुर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या अनुषंगाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्य
X

महात्मा जोतीराव फुलेंनी १५० वर्षापुर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या अनुषंगाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्य

दरवर्षी प्रमाणे स्मृती पर्व २०२२ महात्मा जोतीबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व गेली १६ वर्षापासुन यवतमाळ नगरीत सुरू आहे. याचा कालावधी २८ नोव्हे. ते ६ डिसें. २०२२ असा आहे. उद्घाटीय समारंभ दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ सोमवार सायंकाळी ६.०० वाजता नियोजीत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्याधिकारी मा.दादाराव डोल्हारकर तथा प्रशासक न.प. यवतमाळ हे आहेत. क्रांतीजोती सावित्रीआई फुले समता परिसर, आझाद मैदान, यवतमाळ येथे हा विचारांचा महोत्सव नियोजीत आहे.

सोमवार दि. २८ नोव्हेंबर २०२२ सत्यशोधक स्टडी सर्कल, यवतमाळ अध्यक्ष मा.प्रा. काशीनाथ लाहोरे, संचालक म. फुले सत्यशोधक विद्यापीठ. विषय सत्यशोधक समाजाचा इतिहास व ओबीसीचे दायीत्व, वक्ते मा. प्रा. डॉ. अशोक चोपडे, अ.भा. सत्यशोधक समाज, वर्धा, विषय सत्यशोधक संस्कृती स्विकारल्याने बहुजन समाजाचा उध्दार शक्य आहे. वक्ते - मा.प्रा.सदाम चिंचाणे, वि. अध्यक्ष भा.पी. शो (ओबीसी) संघटन औरंगाबाद, मंगळवार दि. २९ नोव्हेंबर विमुक्त भटक्या जमाती, यवतमाळ विषय ७५ वर्षाच्या लोकशाहीत विमुक्त भटक्या जमातीची स्थीती, अध्यक्ष - मा.डॉ.टि.सी.राठोड, प्रसिध्द हृदरोग तज्ञ, यवतमाळ, वक्ते मा. गोवींद चव्हाण, मा. उपसंचालक नगर रचना विभाग, जमात इस्लामी (हिन्द) अध्यक्ष इंजि वाजीद कादरी, औरंगाबाद, विषय - भारत वर्ष की वर्तमान परिस्थीती तथा हमारा सामुहीक दायीत्व, वक्ते - मा. आ. अमोल मिटकरी, अकोला, बुधवार दि. ३० नोव्हेंबर मराठा सेवा संघ, विषय - परिवर्तनवादी चळवळीमध्ये आरक्षाणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांचे योगदान, अध्यक्ष - मा. प्रविण देशमुख, मा. अध्यक्ष, जि.प. यवतमाळ, वक्ते मा. बाळासाहेब गावडे, सुप्रसिध्द वक्ते, मानवतावादी संत गाडगेबाबा विचार मंच, अध्यक्ष - अनिल शिंदे, उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा, अकोला, विषय गाडगेबाबाचे सत्यशोधक विचार व आजचा सुशिक्षीत समाज, वक्ते मा. संतोष अरसोड, पत्रकार, लेखक नेर, गुरूवार दि. ०१ डिसेंबर २०२२ साहीत्य रत्न कला व सांस्कृतीक विकास फाऊंडेशन, अध्यक्ष मा. सागर कळणे, सामाजीक कायर्कर्ते, प्रमुख वक्ते - प्रा. डॉ. मोहन गोविंद लोंढे, सांगली, विषय शोषीतांचे स्वत्व, जागवत सामाजीक साहित्यिक, - परिवर्तनाच्या लढयातील अण्णाभाऊचे योगदान अखिल भारतीय आदिवासी संवैधानीक हक्क परिषद, अध्यक्ष मा. मंगलाताई माळवे, वरीष्ठ उद्घोषिका आकाशवाणी, यवतमाळ, विषय - आदिवासीचे राजकारण इतर राजकीय पक्षाची भुमिका, वक्ते मा. गित घोष, विचारवंत वणी, मा. सुवर्णा वरखडे, समाजसेविका पांढरकवडा, शुक्रवार दि. ०२ डिसें. २०२२ अध्यक्ष - रामदास राऊत, अध्यक्ष समता पर्व प्रतिष्ठाण, विषय धर्मनिर्पेक्षता भारतीय लोकशाहीचा आधार - वक्ते, मा. प्रा. मा. अॅड. डॉ. युगल रायलु, नागपुर, विषय- भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली न्याय व्यवस्था व वर्तमान परीस्थीती, वक्ते • प्रा. अॅड. फिरदोस मिर्झा, नागपुर शनिवार दि. ०३ डिसेंबर, अध्यक्ष - सुनिता विलास काळे, अध्यक्ष सत्यशोधक महिला विचारमंच, विषय बहुजन महिलांचा सांस्कृतीक संघर्ष, सामाजीक शैक्षणीक, आर्थिक, धार्मीक व राजकीय, वक्ते वंदना जिवणे, नागपुर, रविवार दि. ०४ डिसेंबर, अध्यक्ष - मा. एकनाथ डगवार, सामाजीक कायकर्ते, विषय - बुध्दी, बुध्यांक, बुध्दीमंता आणि भावना, वक्ते - मा. दिलीप सोळंके, सत्यशोधक विचारवंत, अमरावती सोमवार दि. ०५ डिसेंबर, साहित्य रत्न, मा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्मारक समिती, अध्यक्ष साहेबराव खडसे, सामाजीक कार्यकर्ते, विषय आद्यक्रांतीकारी गुरू, वस्ताद लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य काळातील योगदान व सद्याची सामाजीक, शैक्षणीक, राजकीय परिस्थीती वक्ते मा. लहुश्री विष्णुभाऊ कसबे, पुणे, गुरू रविदास विचारमंच, अध्यक्ष डॉ. प्रज्ञा किरण खंडारे विषय गुरू रविदासाची मुळ विचारधारा, वक्ते 1 मा.प्रकाश शमशेर, मुंबई, मंगळवार दि. ०६ डिसेंबर आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, अध्यक्ष मधुकर काठोळे, अध्यक्ष, जि.प. पंतसंस्था, विषय - भारतीय कल्याणाचे त्रिरत्न वृध्द, बाबासाहेब आणि संविधान, वक्ते मा. श्रावण गायकवाड, औरंगाबाद आहेत.

दि. २८ नोव्हेंबर सोमवारी सकाळी ८.३० मि. महात्मा फुले पुतळयाला मानवंदना करायला सर्वांनी उपस्थिीत राहवे व सायंकाळी ठिक ६.०० वा आझाद मैदान येथे उपस्थीत रहावे असे आवाहन कार्यकमाचे समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे प्रवक्ता, डॉ. बाळकृष्ण सरकटे, प्रसिध्दी प्रमुख काशीनाथ लोहोरे, काझी नझीम्मुद्दिन, विजय मालखेडे, राहुल वासनीक, सोशल मिडिया प्रमुख प्रफुल खेडकर, विद्याताई चिंचोरे, सहकार्य दिपक नगराळे, अंकुश वाकडे, रियाज सिध्दीकी, सुनिता काळे, मायाताई गोरे, सिंधुताई धवणे यांनी केले आहे. मुख्य आयोजक महात्मा जोतीबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबडेकर समता पर्व प्रतिष्ठाण, यवतमाळ हे आहेत.

Updated : 24 Nov 2022 12:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top