Home > M marathi blog > जागतिक संग्रहालय दिन सप्ताहानिमित्य लेखक-गीतकार मिलिंद कंधारे यांचे व्याख्यान...!!!

जागतिक संग्रहालय दिन सप्ताहानिमित्य लेखक-गीतकार मिलिंद कंधारे यांचे व्याख्यान...!!!

Lecture by writer-lyricist Milind Kandhare on the occasion of World Museum Day Weekly ... !!!

माहूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

मोईन खान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहाने करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त व जागतिक संग्रहालय दिन सप्ताहाचे औचित्य साधून पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय मुंबई,महाराष्ट्र शासन मध्यवर्ती संग्रहालय नागपूर अंतर्गत शासकीय वस्तूसंग्रहालय माहूर येथे विविध कार्यक्रम आयोजित

आले.

दि.23/05/22 रोजी.माहूर संग्रहालया मार्फत दि.18/5/22 ते 24/05/2022 या कालावधीत जागतिक संग्रहालय सप्ताह निमित्ताने

फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.माहूर गडाला लाभलेले ऐतिहासिक वैभव या विषयावर कवी,गीतकार,संगीतकार तथा लेखक हृदयाक्षर म्हणजेच मिलिंद कंधारे यांनी व्याख्यान केले.त्यावेळी त्यांनी माहूरगडचा ऐतिहासिक मागोवा आपल्या शब्दांतून व्यक्त केला.

यामध्ये माहूरगडाचे ऐतिहासिक रेणुका माता मंदिर,श्री दत्त प्रभूंचे जन्मस्थान तसेच पांडव लेणी(लिंगन भुयारी), पुरातन वस्तू संग्रहालय, मातृतीर्थ तलाव, सोनापिर दर्गा,शेख फरीद धबधबा व अनेक ऐतिहासिक वास्तूंवर आपल्या शैलीत प्रकाश टाकला.

माहूर ला असलेला रामगढ किल्ल्याबाबत उपयूक्त माहीती जसे किल्ल्यावर बृहस्पती सुलतानाच्या सत्तेपासून ते निजाम सत्तेपर्यंत महत्वपूर्ण माहिती तसेच गोंडराज्यांबद्दल माहिती सांगितली.

यावेळी माहूर येथील प्रसिद्ध चित्रकार रणजित वर्मा यांनी प्रास्ताविक व आभार मानले त्याचबरोबर माहूर शासकीय संग्रहालयाचे खजिनदार सय्यद आजम यांनी संग्रहालयाच्या वतीने व्याख्याते आणि मान्यवरांचे आभार मानले तसेच व्याख्यात्यांचा लघुचित्रशैलीचे ऐतिहासिक चित्र देत सत्कार केला. व संग्रहालय समिती च्या वतीने व्याख्यात्यांना भेट दिली.

Updated : 29 May 2022 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top