Home > M marathi blog > महागाई चा वणवा, अनागोंदी कारभाराचे चटके अन सत्ताधारी व विरोधकांची सोईस्कर चुप्पी

महागाई चा वणवा, अनागोंदी कारभाराचे चटके अन सत्ताधारी व विरोधकांची सोईस्कर चुप्पी

Inflation, chaos and convenient silence of the ruling party and the opposition.

महागाई चा वणवा, अनागोंदी कारभाराचे चटके अन सत्ताधारी व विरोधकांची सोईस्कर चुप्पी
X

महागाई चा वणवा, अनागोंदी कारभाराचे चटके अन सत्ताधारी व विरोधकांची सोईस्कर चुप्पी

_सौ.संतोषी वर्मा_

_राळेगाव / प्रतिनिधि_

कोरोना संक्रमनोत्तर काळात झालेल्या एकमेव नगर पंचायत निवडणुक निकालाने काँग्रेस चा वेलू गगनावरी गेल्याचे दिसलें. मात्र हे उत्साहाचे वातावरण उत्तर प्रदेश सह चार राज्याच्या निकालाने पुन्हा जमिनीवर आले. वास्तविक इतर राज्याच्या निकालाचा एव्हडा धसका काँग्रेस ने घ्यायला नको होता. तसाच भाजपनेही नगर पंचायत मध्ये झालेला पराभव इतका जिव्हारी लावून घ्यायची देखील गरज नव्हती. विजयी होऊनही काँग्रेस च्या खेम्यात यहाँ पे सब शांती -शांती है, असे चित्र दिसते तर भाजपच्या वर्तुळातही यहाँ इतना संन्न|टा क्यों है भाई, सबका साथ (सबका विकास ) है कहां, म्हन्याची पाळी कार्यकर्त्यांवर आली आहे. . एक -एक सोसायटी मानकर गटांच्या पारड्यात जात असतांना काहीच ण करता येण्याची हतबलता राजकीय धुरीणाना अस्वस्थ तर करते पण मार्ग दाखवत नाही. आणि लगेच आगामी आकर्षण आहे प्रति विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे.

गेल्या दशकभरात काँग्रेसने राळेगाव विधानसभा मतदार संघात खूप काही गमावले. काँग्रेस चा परंपरागत मतदार संघ ही एकेकाळची ओळख विस्वास बसू नये इतकी पूसट झाली. दरम्यान भाजपने प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेत मतदार संघात कमळ फुलविले. पण नोटबंदी, पंधरा लाखांचे आस्वासन, तजविज ण करता केलेले लोकडाऊन, आणि प्रचंड महागाई या मुद्यावर जनमत भाजपा पासून वेगाने दूर जात असल्याचे दिसलें. चार राज्यातील निकालात मात्र पुन्हा भाजपाचा करिष्मा दिसला आणि पुन्हा काँग्रेस मध्ये मरगळ दाटुन आली. पण या विजयाने भाजपातही आत्मविश्वास निर्माण झाला असे नाही. निदान राळेगाव विधानसभा मतदार संघात नगर पंचायत निकाला नंतर भाजपाचा उत्साह जो लयास गेला. तो गेलाच.

सध्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक कधीही लागू शकते. ग्रा. वि. का. च्या निवडणुका काही निवडणुका आटोपल्या काही सुरु आहेत. या सर्व राजकीय करामती वर यंदा सावट आहे ते महागाई चे बेरोजगारी व बेलगाम खोट्या आस्वासनाने जनमत त्रस्त आहे. राळेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या, रेती तस्करी, विजेचा लपंडाव, महागाई व त्या मुळे ओस पडलेली बाजारपेठ हे भकास चित्र राळेगाव शहरातही दिसते व वडकी सह इतर गावातही स्थिती अशीच निदर्शनास येते आहे.


राळेगाव नगर पंचायत ने या वेळी अतिक्रमणाचा प्रश्न हाती घेतला. प्रभारी का असेना पण माधुरी मडावी सारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या आणि हा प्रश्न निकाली निघणार अशी आशा निर्माण झाली. अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला अन यात दोन तीन मुख्य गट पडले. अतिक्रमण काढलेच पाहिजे, दंड थोटवून ते नियमित केले पाहिजे, धनदांडग्यांचे अतिक्रमण ठेवणार व गोरगरिबांच्या पोटावर नांगर फिरणार अस्या विचारांचे हे गट आहे. यात काही जणांचे हितसमंध आहे हे नाकारता येतं नाहीच. नवीन पदाधिकारी यांना काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायची घाई झाल्याची चर्चा आहे . अतिक्रमणाचे कोलीत त्यांच्या हाती लागलेच.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. शुद्ध पाणी मिळणे अजूनही शक्य झालेले नाही. गाळे हस्तांतरण ला मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. तो कधी निघणार कळण्यास मार्ग नाही. घरकुल पट्टे हा विषय राजकीय होऊ नये ही अपेक्षा. तो सध्या ऐरणीवर मात्र आलाय. कोट्यवधीचे रस्ते निकृष्ट झाल्याची तक्रार होऊन झाली. हातोडा मारण्याने रोड फुटला असे अभिनव उत्तर बांधकाम शि समंधित एका अधिकाऱ्याने दिल्याची खमंग चर्चा तालुक्यात आहे.

दुसरीकडे तालुक्यातील झाडगाव परिसरात आयपीऐल स ठ्य| वर ऐलसीबी ने धाड टाकून मुद्देमाल जप्त केला. राळेगाव तालुक्यात आयपीऐल सट्टा खेळल्या जातो याची कल्पना पोलिसांना नसणे हे एक नवलच. प्रशासनाच्या या सोईस्कर दुर्लक्षाची लागण राळेगाव तालुक्यात महसूल, आरोग्य, कृषी, वीज वितरण सह सर्वच विभागाला झाल्याचे दिसते. स्थानिक आमदारांनी आढावा बैठकीत कार्यप्रवण व्हा असे निर्देश नुकतेच दिले. पण प्रशासनाचा गाडा ढिम्म तो ढिम्म. यांच्या मुळाशी आहे. सत्ताधारी व विरोधक यांचे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांचे इम्प्रेशन राहिले नाही व विरोधकांना घेणे देणे नाही अशा कात्रीत कासव गतीने कामं सुरु आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय त्याचे काय याचे उत्तर कुणाकडेच नाही.

Updated : 24 April 2022 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top