Home > M marathi blog > इन आखो की मस्ती में,अफसाने हजारो होते है!

इन आखो की मस्ती में,अफसाने हजारो होते है!

In the fun of these eyes, there are thousands of rumors!

इन आखो की मस्ती में,अफसाने हजारो होते है!
X


-------------------------------------------------------------

लेखक : श्री.तानाजी सखाराम कांबळे.

-------------------------------------------------------------

जागतिक" दृष्टी दिन" नुकताच साजरा झाला यानिमित्त.

-------------------------------------------------------------

मानवी आयुष्यातील मानवाच्या सृष्टीतील

महत्त्वाचा भाग म्हणून"डोळा" पाहिला जातो!

खरं तर याच डोळ्याने अनेक सावज

बेसावधपणे टिपली जातात.

तालुक्याच्या फौजदाराचा वाड्यावर तथा

गाव गाड्यावरचा [मानधन पाटील] सावज

टिपणारा डोळा म्हणून ओळखला जातो.

लोकशाहीमध्ये वावरणाऱ्या सार्वजनिक

जीवनामध्ये "वापरल्या" जाणाऱ्या केवळ

[युज अँड थ्रो ] वापरा आणि फेकून द्या असे

राजकारणी लोकांचे चमचे,कार्यकर्ते यांना

सावज टिपणारा"डावा डोळा" म्हणून

बघितले जातात.

रस्त्यावरच्या ट्रॅफिक पोलिसाला शेजारील पानाच्या टपरीवाला त्याचे पैसे गोळा करून देताना

सावज टिपणारा"डावा डोळा" म्हणून बघितले जाते.

मंत्रीमहोदयांच्या कानात सततची कुजबुज

करनाऱ्या त्याच्या "पी.ए.ला" त्याचा सावज

टिपणारा "डावा डोळा" म्हणून ओळखले जाते!

शहरातल्या मोठ्या दवाखान्यात गाव

गाड्यावरचे छोटाले डॉक्टर जेव्हा

"कमिशनसाठी "एखादा रुग्ण पाठवून देतात

तेव्हा त्यांना ग्रामीण भागातला

मोठ्या डॉक्टरांचा सावज टिपणारा

[डावा डोळा] म्हणून ओळखले जाते.

वर्षानुवर्षे न्याय प्रलंबित ठेवणाऱ्या

'काळा कोटातील"वकील साहेबांचा पक्षकारांच्या

दृष्टीने " सावज टिपणारा वकील साहेब

डावा डोळा असतो.

नुकतच जन्मलेलं तान्हुल 'बाळ '

आपल्या आईचं दूध पिताना मिच मिच!

मिच मिच!करणारा त्याचा तो सावज

टिपताना चा "डावा डोळा"खूपच निरागस असतो.

तसेच "बाई वाड्यावर या म्हणत,

रस्त्याकडेच्या आडवाटेला,शेतवाडी वरती

बाईला "अंगभर न्याहाळणारा" पृथ्वीतलावरील,

अनेकांचा सावज टिपणारा"डावा डोळा"

सतत वर्तमान काळात जगत असतो!

बँकेच्या कॅशियरचा"पैशावर"असलेला

सावज टिपणारा डावा डोळा!

कुलूपबंद घरातील पैशावर असलेला,

सावज टिपणारा "चोराचा"डावा डोळा!

सहकारी विकास सेवा सहकारी संस्थेमध्ये

सभासद जिवंत असू दे वा मयत कागदाला

कागद जोडून गैरव्यवहार करणाऱ्या

[सचिवाचा] सावज टिपणारा,कार्यक्षम डावा डोळा!

सहकारी दूध संस्थेमध्ये डेअरीत दूध घेताना

मापा पेक्षा जास्त दूध मुद्दाम" टेस्ट "च्या

नावाखाली लुटत सावज टिपणारा त्यांचा डावा डोळा!

शाळा महाविद्यालय होस्टेल,दवाखाने मेडिकल कॉलेज,शिक्षण संस्थांच्या नावाखाली "सरकारी जमिनीवर "असलेला अनेक राजकारणी,

समाजकारणी लोकांचा सावज टिपणारा डावा डोळा !

बायकोचा नवऱ्याच्या पाकिटावर सतत असलेला,

सावज टिपणारा डावा डोळा!

जावई माझा भला म्हणत "सासरवाडीला

ठेवून घेणाऱ्या सासू-सासऱ्यांचा सावज

टिपणारा "लेकी वरचा"डावा डोळा!

लेकीला,सारख माहेरी बोलूवन बोलूवन

तिला कायमचे माहेर वाशिन करणाऱ्या

"आईचा सावज टिपणारा डावा डोळा !

असे,सावज टिपणारे कैक डोळे उदंड झालेत!

या,सावज टिपणाऱ्या डोळ्यांना नसते कुणाची तमा,

नसते कुणाची फिकीर,

नसते कुणाची झालंर!

एखाद्या वरती बलात्कार करताना,

एखाद्याला मारताना,

एखाद्याचा खून करताना!

या सावज टिपणाऱ्या नजरा भिरभिरत असतात सतत,

आजूबाजूला,रस्त्यावरती एसटीच्या फलाटावरती,

रेल्वेच्या टेशन वरती,काम करणाऱ्या

कार्यालयाच्या टेबल वरती,

रस्त्यावरच्या आडवाटेच्या शेतमळ्यातील,

" सेकंड" घराकडे चालणारी झपाझप पावले,

चालत असतात सावज टिपण्याचे

ओढीने,सूर्यास्ताचे साक्षीने!

-------------------------------------------------------------

Updated : 12 Jun 2022 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top