Home > M marathi blog > ( आज विठ्ठल एकनाथास विचारात तर नसेल ? )

( आज विठ्ठल एकनाथास विचारात तर नसेल ? )

सांग एकनाथा.......

( आज विठ्ठल एकनाथास विचारात तर नसेल ? )
X

( आज विठ्ठल एकनाथास विचारात तर नसेल ? )

सांग एकनाथा.......

वारी मध्ये भक्तांच्या

ही का चर्चा उठे,

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे ?

महामारीच्या संकटी

तो कर्ता म्हणून आला,

महाराष्ट्राला अवघ्या

सावरता तो झाला ,

दिल्लीश्वर झुकला जिथे

वैरी आपुला तू का उठे ?

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे ?

जो उरी समावला

त्याने वार पाठी केला,

विश्वासला डोळे मिटुनी

तिथे भ्रम दूर झाला,

मृगणक्षत्राचे तोंडी

त्याची 'वर्षा' कशी सुटे ?

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे ?

सांग मला तू खरे

तुला काय कमी दिले?

विश्वासाने देतांना त्याने

काय कमी केले?

आनंदी तू जिथे

अवघा महाराष्ट्र रुठे,

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे ?

तू दर्शनासी आला इथे

पण माझे आशीर्वाद तिथे,

घात विश्वासाचे करे

त्याचे भांडे नेहमी रिते,

आपुले लढे अपुल्यांशी

हर्ष परकीय मनी लुटे,

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे ?

खरे सांग एकनाथा

माझा उद्धव आहे कुठे ?

*******************

शब्द रचना

पराग पिंगळे

जिल्हा प्रमुख

यवतमाळ

Updated : 10 July 2022 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top