Home > M marathi blog > त्या" लेखाबद्दल" मी कुणाची माफी मागणार नाही.

त्या" लेखाबद्दल" मी कुणाची माफी मागणार नाही.

I will not apologize to anyone for that "article".


------------------------------------------------------

लेखक . तानाजी कांबळे.

8080532937.

-------------------------------------------------------

काही दिवसापूर्वी लेखक श्री कांबळे यांनी,

जांभळी नदीकाठावरील अस्वस्थ मणे!

हा लेख प्रसिद्ध केला होता. भारतीय संविधानाने प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य दिले आहे.

वर्षानुवर्षे समाजामध्ये घडत असणाऱ्या चाली रूढी

प्रथा परंपरा,विविध लेखक कवी साहित्यिक,आपल्या परीने वास्तववादी परिस्थिती वरती लिखाण करत असतात.

डॉ.बी आर आंबेडकर,असे म्हणतात की,जो आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास घडवू शकत नाही.

शतकानुशतके इतिहासाच्या तक्ता वरती ज्या काही घडामोडी घडत आले आहेत गेल्या इसवीसन अडीच हजार वर्षापासून,त्याची विविध ठिकाणी नोंद झाल्याचे दिसून येते.

लेखन स्वातंत्र्य हा लोकशाहीचा चौथा खांब आहे.असणारे अठराविश्व दारिद्र्य,बेरोजगारी कुटुंब,अखंड कर्जात डुबलेला तो शेतकरी,शिक्षणाच्या पदव्या घेऊन घरातील खुंटीवर टांगून ठेवलेल्या,त्या बेरोजगार तरुणांच्या पदव्या,वाढलेली खाजगी सावकारी,

22 व्या शतकातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे तरुणांच्या मध्ये वाढलेली नैराश्य,या सर्वांच्यातून निर्माण झालेली असंतोषाची पोकळी अस्वस्थ मनाला वाट करून देणारी आहे.आई खायला देईना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था कुटुंबातील कुटुंबप्रमुखाची झाली आहे.

इतक्या विदारक वाईट सामाजिक विदारक परिस्थिती मध्ये,ज्येष्ठ लेखक कवी साहित्यिक दिवंगत नामदेव ढसाळ आपल्या गोलपीठा मधून त्यांच्या अस्वस्थ मनाला वाट मोकळी करून देतात.

गोलपीठा मधील त्यांच्या अस्वस्थ मनाची उदासीनता खालील ओळीतून दिसून येते.

" जिवाचे नाव "लवडा" ठेवून जगणार्‍यांनी,खुशाल जगावे....

मी तसा जगणार नाही "

"शेटसावकारांची आय झवून टाकावी

नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा

जेवणातून विष घालावे मूठ मारावी

रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

"मी तुला शिव्या देतो,

तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो,

तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो,

तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो

इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो

"बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात.

आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी

त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही.

जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात. जिथे दिवस रात्री सुरू होतो.

"मनगटावरच्या चमेली गजर्‍यात कवळया

कलेजीची शिकार उरकून

शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"

पदोपदी दिसतात.

जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.

जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.

"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो

म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून

भागत नाही रे इथे!

माणसालाच माणूस खात असतो.

आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

माझा भाऊ सरळ साध्या वाटेवरून एक मार्गी चालणारा माणूस.ना कुणाच्या अध्यात ना मध्यात,ना कुणाचा घेन कुणाचा देणेकरी, गावातील चित्र स्टोरी केल्यामुळे,त्याला धमकीवजा स्वरूपात विचारत आहेत.काही विघ्नसंतोषी सडक्या मेंदूची,रिकामटेकडी,जुगारी,

बाईल वेडी, गावातल्या भरचौकात देसाई यांच्याकडून बेदम मार खाणारे,पानपट्टी च्या आत मध्ये जुगार खेळणारी

काळू बाळु ची जोडी,अन त्यांच्या नादाला लागणारे अनेकजण जुगारी,

बाईल वेडी अशाने आम्हाला फोन करून विचारावे.योग्य भाषेत उत्तर देऊ.

माझा लहानपणापासूनचा स्वभाव

अशा विकृत मंडळींना माहित असल्याने,ते आमचं नाद करीत नाहीत.

आणि त्यांनी जरूर करावा.

मला गावातील एका स्थानिक प्रतिष्ठित लोकप्रतिनिधींचा फोन आला होता.

लेखन चांगले आहे मात्र गावातील काही तथाकथित मंडळींची अब्रू जाते त्यांचे म्हणणे आहे असे त्यांनी मला सांगितले.

आमच्यात समजुतीच्या दोन गोष्टी बोलणी झाली,मात्र मी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार देऊन,स्थानिक पोलिस स्टेशन अथवा न्यायालयात जाण्याचा त्यांना मी सल्ला दिला.गावात एकोपा असावा.

गाव चांगला असावं,गावात बंधुभाव निर्माण व्हावा,रामायणातील राम लक्ष्मणाच्या जोडी सारखा बंधुभाव असावा,मात्र तो बंधूभाव कैकयीच्यापोटी जन्माला आलेल्या अवलादी असल्यासारखा नसावा .

नाण्याच्या दोन बाजू असतात वास्तववादी परिस्थितीवर ती लिहिणं लेखन करणं हे सत्ताधारी पक्ष, प्रशासकीय अधिकारी प्रशासन यांच्या विरोधात,विरोधी पक्ष सारखी भूमिका प्रसारमाध्यमांना मांडावी लागते.वेळप्रसंगी चांगल्या बाबी निदर्शनास आल्यानंतर त्यांचं कौतुक देखील करावे लागते.

लिखाणातील साहित्य एक मर्म असते.वाचनाची आवड असणाऱ्या माणसाला त्यातील मर्म नेमका येत लक्षात येतो.माझी ओळख मी माझ्या लिखाणातून केली आहे.मंत्रालय सारख्या ठिकाणी बातमीदार म्हणून काम करून सुद्धा आम्ही कधी कुणासोबत फोटो काढत नाही आणि काढले तर ते जगासमोर आणत नाही.सामाजिक पातळीवर ती स्वतःची बरीवाईट ओळख असावी.प्रसिद्धीला आलेल्या नावारूपास असलेल्या मोठ्या माणसांच्या सोबत फोटो काढून आपण मोठे होत नाही.

तर उलट पक्षी आपण लहानच ठरत असतो.

लेखन स्वातंत्र्य हा त्याचाच एक भाग आहे.लेखन स्वातंत्र्य हा

वैचारिक पातळीवर ती विचाराची समीक्षा करणारा समीक्षक म्हणून ठरत असतो.समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना घडामोडी यांच्याविषयी तो राजकीय, सामाजिक, विश्लेषक म्हणून काम करत असतो.

वेळप्रसंगी स्वतःवरती अनेक आलेल्या उद्भवलेल्या संकटाशी विषयी सुद्धा देखील तो स्वतःचे देखील समीक्षण

सत्य बाजूने करीत असतो.सार्वजनिक जीवनात जगत असताना स्वतःकडून झालेल्या अनेक चूक भूल देखील तो स्वतःच्या समीकरणांमध्ये स्वतःविषयी मांडत असतो.

या पत्रकारितेतून किती तरी लोकांच्या जिवे मारण्याच्या धमक्या आल्या,जीवघेणे हल्ले झाले,तरीआम्ही आज काय डगमगलो नाही.आम्ही त्यांच्यासाठी लढतो आहोत जे शोषित आहेत पीडित आहेत कष्टकरी आहेत सावकाराला बळी पडलेले आहेत.

मात्र रामायणातील कैकयीच्या वाईट

विचाराच्या प्रवृत्तीच्या काही अवलादी,

मुह मे "राम " बगलमे छुरी घेऊन वावरत आहेत.

संत तुकाराम यांच्या भाषेत त्यांना सांगायचं म्हटलं तर,

तुका म्हणे ऐशा नरा,

मोजूनी मारव्या पैजारा!

आणि ती त्याच लायकीचे आहेत.

भरचौकात पळसाच्या झाडाखाली असणाऱ्या देसायांच्या कडून

" मार" खाणाऱ्या अवलादी.

उन्हाळा पावसाळा हिवाळा भरऋतू मध्ये!

तुका म्हणे असावे जातीचे,

नाही येरागबाळ्याचे काम ते!

अशा येरागबाळ्याचे यांनी आमच्याकडून माफीची अपेक्षा ठेवू नये एवढीच प्रांजळ अपेक्षा.

--------------------------------------------------------------------

Updated : 18 Jun 2022 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top