Home > M marathi blog > या 'फादर्स डे' निमित्त वडलांना द्या खास शुभेच्छा!

या 'फादर्स डे' निमित्त वडलांना द्या खास शुभेच्छा!

Happy Father's Day!

या 'फादर्स डे' निमित्त वडलांना द्या खास शुभेच्छा!

म मराठी❗स्पेशल

यंदा फादर्स डे १९ जून रोजी साजरा केला जाणार आहे.

वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात,

ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात.

वडीलही सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या भावना कोणाशीही शेअर करत नाहीत. वडिलांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो.

फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा विशेष दिवस १९ जून रोजी साजरा केला जाणार आहे. या खास दिनी आपल्याला वडलांना द्या खास शुभेच्छा.

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,

माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वडिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यंदा हा दिवस अजून खास करण्यासाठी वडिलांना शुभेच्छा द्या...

बाबा तुम्ही चांगले वडिल

असण्यासोबतच माझे चांगले मित्र आहात...

'फादर्स डे'च्या शुभेच्छा बाबा!

माझे वडील माझ्याबरोबर नसेल तरीही

मला खात्री आहे की, त्यांचा आशिर्वाद

कायमच माझ्याबरोबर आहे.

बोट धरून चालायला शिकवले आम्हास

आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास

अश्रू पुसून आपले हसवले आम्हास

परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांना

हॅप्पी 'फादर्स डे' बाबा!

जर आई धरणी आहे तर वडील गगन

आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी

वडिलांना 'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,

माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही...

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा...

बाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन

मुलांसाठी झटणारं अंतःकरण...

आयुष्यात सर्वात मोठं सुख

म्हणजे बाबा असणं आणि

तुम्ही माझे वडील आहात हे

माझं सर्वात मोठं भाग्य आहे...

तुम्हीही कितीही

मोठे झालात

तरी असा एकमेव माणूस आहे

ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि

तो म्हणजे तुमचा बाबा...

Updated : 19 Jun 2022 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top