Home > M marathi blog > प्रेमाचा फाटा!

प्रेमाचा फाटा!

Fork of love!


लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

शहर, उपनगर,गाव गाडा,याला जोडला गेलेला रस्ता हा, विविध ठिकाणच्या थांबण्याचा,फाटा म्हणून ओळखला जातो.असाच एक फाटा, कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गात जोडला गेलेला "साळवण"तालुका गगनबावडा येथील "साळवण"चा

फाटा तालुकाभर प्रसिद्ध आहे.

या फाट्याच्या थांब्या वरती,शाळा महाविद्यालयाच्या मुलांचा, थांबा असल्याकारणाने,अशाच एका "प्रेमविराचा" हा फाटा, "प्रेमाचा फाटा" बनला होता.घरातून फाट्यावरती त्याची सतत रेंगाळणारी पावले,

आपल्या उद्याच्या प्रेमाला "मान्यता" मिळेल अशी त्याने ठेवलेली अपेक्षा तब्बल तेरा वर्षे,तहयात त्याच्या बरोबरच स्वर्गात गेली.

तिच्यावरती त्याचं असलेलं निस्सीम प्रेम,

तिच्या विवाहानंतर देखील तिला पाहण्याचं,वाढू लागलेलं निस्सीम प्रेम

फाट्यावर च्या बाळा पाटलाच्या चहा गाडीच्या थकबाकी प्रमाण वाढतच वाढतच चाललं होतं.

मात्र,त्यांच्या आकस्मित झालेल्या निधनान तो प्रेमाचा फाटा

ओस पडला.

चहा गाडीवरच्या बाळा पाटलाचं,

चहा पिणार कायमचं गिराईक

काळानं अनपेक्षितपणे ओढून नेलं.

एवढ होऊन देखील,त्याच्या निश्चित प्रेमाला प्रतिसाद म्हणून,लग्न झालेली त्याच्या मनातली ती त्याची प्रेयसी, आपल्यासाठी तासन्तास घुटमळणारा

एक चेहरा,दिसावा म्हणून सतत,

माहेरवाशीण म्हणून आल्यावर,

आत बाहेर आत बाहेर करत होती.

मात्र,नियतीने हिरावून नेलंल त्याचं ते

प्रेम एका निस्सीम प्रेमाची आर्त आरोळी ठोकून देत जात होत.

साळवण फाट्यापासून दहा किलोमीटर,वर आडवाटेला शेवटच्या टोकाला, दीड टीएमसी इतका पाणीसाठा असलेला लघू पाटबंधारे तलाव कोदे बुद्रुक म्हणून प्रसिद्ध आहे.

या कोदे खोरी कडे जाणाऱ्या आडवाटेच्या एका रस्त्याशेजारी,

या प्रेमवीराची तब्बल 30 एकर बागायत जमीन नदीकाठ लागून आहे.

हिरवागार उसाचा शेतमळा पाहून मन अगदी सुखावल्या सारखे वाटते.

घराला एकुलता एक कुलदैवत असलेला हा "नायक" नित्यनियमाने त्या फाट्यावरती मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात, चहा नाश्त्याची ऑर्डर देताना,

मला कायमचा दिसायचा.

1995 च्या दरम्यान चा तो काळ

माझी परिस्थिती खूप बेताची व गरिबीची असल्याने शाळेला मी सतत चालत यायचो.व घरी चालत जायचो.

साळवण फाट्यावरील येणाऱ्या हॉटेलातून खमंग भजी,वडा यांचा तळताना सुटलेला वास घेत

घरचा रस्त्याकडे परतायचो.

नेहमी मी चालत जाताना तो मला रस्त्यावर मोटरसायकलवरून जाताना दिसायचा.कुणातरी श्रीमंताचं पोरगा असेल म्हणून मी फारसं कधी त्याकडे लक्ष द्यायचं नाही.

पण,एक दिवस त्याची मोटरसायकल

मी चालत जात असताना,वेसर्डेच्या माळरानावरच्या कोपऱ्यावर रस्त्यालगत त्याची दुचाकी गाडी थांबली.

अनपेक्षितपणे मला येणारा का अस विचारता क्षणी मला धक्का बसला.

त्याची श्रीमंती त्याच्या साधेपणा वरून दिसून येत नव्हते.

मात्र दिलदार मनाचा तो कदाचित

माणूस असावा असा एक माझा अंदाज होता.आणि त्याच्या हाकेला प्रतिसाद देत मी माझ्या गावा पर्यंत त्याच्या मोटर सायकल वरून आलो.त्याच्या मैत्रीच्या एका पर्वाची सुरुवात त्यावेळी माझ्याबरोबर झाली होती.

कोदे खोरी कडे जाणाऱ्या आडवाटेवरच्या शेतमळ्यावर रस्त्यावरच्या शेतातच त्याचं घर होतं.पावना,मेव्हणा,रावळ असाच सुमारे तीस एक लोकांचा दिवसाला त्याच्या घरात राबता होता.

आई,वडील,देवासारखे स्वच्छ

निर्मळ आणि चांगले होते.

सात आठ महिन्याच्या आमच्या मैत्री नंतर,मी त्या कुटुंबापैकी एक असा काहीसा झालो होतो.

मी अनेक वेळा,या त्याच्या प्रेमाच्या फाट्या विषयीविचारणार होतो.

मात्र कदाचित तो नाराज होईल या भीतीपोटी मी परत कधीही विचारलं नाही. त्याच्या त्या फाट्यावर च्या प्रेमाची,

साठा सफळ संपूर्ण कहाणीचा साक्षीदार मी स्वतः होतो.

फाट्यावर त्याची ती अबोल प्रेमाची बहरतरत गेलेली कहानी,

खूपच मनोरंजक आणि लक्षवेधी

ठरणार होती.तिला पाहण्याच्या नादात त्याने,तब्बल दोन वर्षे एकाच वर्गात नापास होऊन काढलेली होती.

त्याच्या नजरेचा तीर तिच्यापर्यंत पोहोचला नाही.मात्र नजरेला नजर 100% भिडत होती,या गोष्टीचा मी एकमेव साक्षीदार होतो.अगदी माहेरवाशीण म्हणून आल्यावर

ती सुद्धा!

त्याची ती थबक नारी पावले,घराकडे जाण्याच्या वेळी मात्र जड अंतकरणाने जात होती.त्याच्या एका बाजूच्या प्रेमाची, ती भागीदार जरी नसली तरी,तिला पण आता एक सवय होऊन गेली होती त्याला बाहेर येऊन एकटक न्याहाळत बसायची, तासंतास.आज तो नाही आहे.

नाहीतरी अशा फाट्यावरती अनेक महाभाग,प्रेम भंगी,नसलेल्या कामाचे निमित्त कडून काढून फाट्यावरती घुटमळत फिरत असलेली,

अनेक लोक मी पाहिलेले आहेत.

बारा गावच्या बारा भानगडी अशा फाट्यावरती नेहमीच चर्चेला,स्थानिक दुकानदाराकडून ठेवल्या जातात.

मात्र माझ्या संवेदनशील मनाच्या मित्राच्या बाबतीत,इतके भयानक प्रसंग येऊन गेले,की ते सोडवता सोडवता अक्षरशा,या त्याच्या फाट्यावरच प्रेमावरती पुस्तक लिहून झाल असत.

अशा संवेदनशील प्रेमावरती अनेक कथा-कादंबरी चित्रपट निघालेले आहेत सुप्रसिद्ध झालेले आहेत, त्याच्या या लव्ह स्टोरी ची सुरुवात मध्यंतर आणि शेवट, मी खास करून येथे नमूद करणार आहे. "प्रेमाचा फाटा" म्हणून भाग दोन मध्ये.

Updated : 7 July 2022 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top