Home > M marathi blog > समृद्ध जीवनाची स्वप्ने...

समृद्ध जीवनाची स्वप्ने...

Dreams of a prosperous life ...

समृद्ध जीवनाची स्वप्ने...
X

संपादक - 9421302699पवित्र कुरआनमध्ये अलीकडच्या काळातील आधुनिक विज्ञानाने उलगडलेली सत्ये आधीच म्हणजे साधारणपणे साडेचौदाशे वर्षांपूर्वीच सांगितलेली आहेत. कुरआनमध्ये म्हटले आहे, "आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे व तिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या.' (सूरह अरद, १३:३)

"पृथ्वीचा तोल सांभाळण्यासाठी पर्वत उभारण्यात आले आहेत, त्याने (अल्लाहने) आकाशांना (आकाशातील ग्रह-ताऱ्यांना) दृश्य खांबाशिवाय उभारले आहे आणि पर्वतांची उभारणी केली आहे. अन्यथा पृथ्वी तुम्हाला घेऊन कलंडून गेली असती.' (सूरह लुकमान, ३१:१०) "आणि त्याने जमिनीवर पहाड कायम केले, जेणेकरून ती तुमच्यासवे डगमगू नये, त्याने नद्या प्रवाहित केल्या आणि मार्ग काढलेत यासाठी की तुम्हाला मार्ग सापडावा.' (सुरह अन नहल, १६:१५)

निसर्गातील या साऱ्या गोष्टी कुरआन मजिदमध्ये आलेल्या आहेत. आधुनिक विज्ञानानुसार पर्वत हे या पृथ्वीवर मेखासारखे रोवलेले आहेत. ज्यामुळे ही पृथ्वी कलंडत नाही. प्रत्येक पर्वताला खाली मूळ असते आणि त्याद्वारे पर्वत पृथ्वीत रोवलेले असतात. त्यामुळे पृथ्वी डगमगत नाही. अल्लाहने पृथ्वीवर अनेक नद्यांचे प्रवाह निर्माण केले. या प्रवाही नद्यांच्या पाण्याचा उपयोग कल्पकतेने करून मानवाचे जीवन समृद्ध करण्याचा मार्ग सुकर होतो. समृद्ध जीवनाची स्वप्ने पाहताना विविध नद्यांवर विविध ठिकाणी धरणे बांधून त्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होऊ शकतो. सुनियोजितपणे पाण्याचा वापर केल्यास दुहेरी पिके घेऊन मुबलक अन्नधान्य पिकवू शकतो.

कुरआनात म्हटले आहे, "आणि आम्ही जमिनीला पसरविले, तिच्यात पर्वत रोवले आणि तिच्यात प्रत्येक प्रकारच्या वस्तू योग्य प्रमाणात उगवल्या.' (सुरह अल हिज्र, १५:१९)

जमिनीतून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण होतात. भाजीपाला, अन्न-धान्य, फळे, सुके मेवे, कडधान्य, गळीत धान्ये अशी मानव जीवनोपयोगी गोष्टी निर्माण करण्याची आणि तीही योग्य प्रमाणात निर्मिती करण्याची व्यवस्था अल्लाहने केली आहे. त्यामुळे दरवर्षी योग्य प्रमाणात योग्य ते अन्नधान्य ही धरणी मानवांसाठी, पशु-पक्ष्यांसाठी पिकवते. ही सारी निर्मिती अल्लाह मानवासाठीच, त्याच्या कल्याणासाठीच, त्याच्या उपयोगासाठीच करतो. अल्लाहने कोणतीही गोष्ट व्यर्थ निर्माण केलेली नाही.

कुरआनात म्हटले आहे, "आणि प्रत्येक वस्तूच्या आम्ही जोड्या निर्माण केल्या. यासाठी की तुम्ही बोध ग्रहण करावा.' (सुरह जारियात, ५१:४९) तसेच "स्वच्छ, शुद्ध आहे तो ज्याने प्रत्येक प्रकारच्या जोड्या निर्माण केल्या, जमिनीवरील वनस्पतींपैकीही त्यांच्या स्वत:मधूनही आणि त्या गोष्टींमधूनही ज्यांना ते जाणत नाहीत.' (कुरआन)

आधुनिक विज्ञानानुसार प्रत्येक निर्मितीत धन आणि ऋण किंवा Positive किंवा Negative आहेत. ही निर्मितीची वैशिष्ट्ये आहे. अशाच प्रकारच्या जोड्या वनस्पतीतही अस्तित्वात आहेत. हे वरील आयतनुसार आधुनिक वनस्पतीशास्त्राने अधोरेखित केले आहेच. उदा. काही झाडे, काही वनस्पती फळे देणारी असतात तर काही वनस्पतींना वा झाडांना फळे येतच नाहीत. ही झाडे "नर' म्हटली जातात. ठळकपणे अशी झाडे पपईच्या झाडांमध्ये स्पष्ट दिसून येतात.

प्रत्येक झाडावर दोन्ही प्रकारची फुले येतात. त्यांच्यात फळधारणा झाल्याने फळे निर्माण होतात. काही फळे दोन भाग मिळून एकत्र असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. विविध प्रकारच्या डाळी, हरभरे, काजू, पिस्ता, शेंगदाणे यांचे दोन भाग सहज करता येतात. जी वेगवेगळ्या लिंगाची असतात. नर, मादी किंवा स्त्री-पुरुष अशाही अनंत जोड्या अल्लाहने निर्माण केल्या अाहेत. प्रत्येक वस्तूच्या विभाजनात सर्वात लहान घटक म्हणजे अणू. अशा प्रत्येक अणूमध्येही एक केंद्रक असते, ज्यात धन आणि ऋण भार असतो. हे सारे आता अलीकडच्या काळात उलगडले असले तरी हे कुरआनमध्ये आधीच आलेले आहे.

कुरआनात म्हटले अाहे, "मग प्रत्येक प्रकारच्या फळांचा रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याने अनुकूल केलेल्या मार्गावर चाल. तिच्या पोटातून विविध रंगाचे एक पेय बाहेर पडते ज्यात लोकांकरिता आरोग्य आहे. नि:संशय यात निशाणी आहे त्या लोकांकरिता जे विचार व चिंतन करतात.' (सुरह अल-नहल, ६९)

मधासंबंधी कुरआनमध्ये आलेल्या या आयतीत मध हे मानवी शरीरासाठी पोषक असल्याचे म्हटले आहे. त्यात आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपयुक्त द्रव्ये आहेत. संशोधकांनी सिद्ध केल्याप्रमाणे मधात दुधाप्रमाणे रोगजंतू नष्ट करण्याची क्षमता असते. शुद्ध मधात टाकलेले जंतू नष्ट होतात. मलेरियाचे जंतू, न्यूमोनियाचे, सेप्टिसिमिया, आतड्यात सूज आणणारे जंतू ९६ तासांत नष्ट होतात. माणसाच्या शरीरात निर्माण होणाऱ्या जंतूंचा संहार करण्याची प्रचंड शक्ती मधात असते. अशा अनेक आयती विज्ञानाशी सांगड घालताना कुरआन करीममधून आढळून येतात.साभार

साजीद पठाण यांच्या फेसबुक वॉल वरून...

Updated : 24 April 2022 8:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top