Home > M marathi blog > मूर्तीला रंग रूप आकार देऊन देव घडवणारा "पत्रकार" अवलिया!

मूर्तीला रंग रूप आकार देऊन देव घडवणारा "पत्रकार" अवलिया!

Avaliya, the "journalist" who makes God by shaping the idol!

मूर्तीला रंग रूप आकार देऊन देव घडवणारा पत्रकार अवलिया!
X

मूर्तीला रंग रूप आकार देऊन

देव घडवणारा "पत्रकार" अवलिया!

शशिकांत शामराव कुंभार.

मुक्काम पोस्ट कुंभारवाडी,

कसबा तारळे,तालुका राधानगरी,

जिल्हा कोल्हापूर.

सध्या राहणार बापट कॅम्प कोल्हापूर.

लेखिका कुमारी,समीक्षा तानाजी कांबळे.

कोल्हापुर,ममराठी न्यूज नेटवर्क.

www mmarathi.com

8080532937.

कोल्हापूर येथील गंगावेश,पापाच्या तिकटी खाली

असणारी कुंभार गल्ली,शाहूपुरी,व बापट कॅम्प

कोल्हापूर येथील असणारे कुंभार वसाहत,

मूर्ती कारागिरी साठी जगभर प्रसिद्ध आहे.

इथल्या कारागिरांच्या हातून घडणारे मूर्ती,विविध तयार झालेल्या देवांना नमस्कार चमत्कार करणारी ठरते.

अशा विविध मूर्तीना रंग रूप आकार देऊन,मूर्तीचे रूपांतर देवात करणारा" पत्रकार"अवलिया म्हणून आपली वेगळी ओळख,दाखवणारे मितभाषी संयमी शांत,राधानगरी तालुक्यातील कुंभार वाडी येथील कसबा तारळे गावातील,सुपुत्र श्री.शशिकांत शामराव कुंभार, सध्या राहणार कोल्हापूर बापट कॅम्प वसाहत,

यांच्याशी गुढीपाडव्यानिमित्त,होणाऱ्या नवीन वर्षाचे सणाचे निमित्तयांचे औचित्य साधून,म मराठी न्यूज, नेटवर्क च्या कोल्हापूर प्रतिनिधी,

कुमारी समीक्षा तानाजी कांबळे यांनी त्यांच्याशी

केलेल्या "बातचीतिचा" आढावा आज आपण घेणार आहोत.


कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर संस्थांचे

अधिष्ठान पती श्रीमंत छत्रपती शाहू जी महाराज,

यांच्या दूर दृष्टिकोनातून,राधानगरी येथील तयार

झालेला फेजिवडे गावाच्या उशा वरील असणारा

लक्ष्मी डॅम अर्थातच राधानगरी धरण,ज्या धरणाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला स्वयंचलितउघडणारे

दरवाजे अशी आहे.या राधानगरी तालुक्याला,

अनेक लहान थोरामोठ्यांची विकास कामांमध्ये

योगदान झालेले आहे.त्यापैकी शेतकरी कामगार

पक्षाचे माजी आमदार,दिवंगत शंकर धोंडी पाटील,गोविंदरावजी कलिकते,दादासाहेब पाटील कौलवकर भोगावती कारखान्याचे संस्थापक यांच्यासारखे अधिक कसदार लोकप्रतिनिधी यांनी,राधानगरी सारख्या दुर्गम डोंगराळ मागासलेल्या भागाचे प्रतिनिधित्व करीत विकासाभिमुख लोकप्रतिनिधीत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार साखर कारखानदारीच्या जडणघडणीमध्ये योगदान दिली आहे.

राधानगरी तालुका हा खूप मोठा,विविध दर्या डोंगर खोऱ्यामध्ये विभागलेला आहे.राधानगरी तालुक्याच्या पूर्व दिशेला पन्हाळा तालुक्याचे हद्द आहे.दर दक्षिण दिशेला गगनबावडा तालुक्याची हद्द आहे.पश्चिमेला कागल तालुक्याची हद्द आहे तर,उत्तरेला भुदरगड तालुक्याचे हद्द आहे.आशिया खंडात नावाजलेला कधीकाळी भोगावती सहकारी साखर कारखाना हा याच तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो.राधानगरी तालुक्याची आणखीन एक जगभर पसरलेली ओळख आहे ते म्हणजे इथली जंगल सफारी,राधानगरी अभयारण्यहे होय.

अशा दुर्गम डोंगराळ मागासलेल्या व विविध वैशिष्ट्य यास नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या बारामाही पाणी असलेल्या राधानगरी तालुक्यातून,श्री.शशिकांत शामराव कुंभार सध्या राहणार कोल्हापूर बापट कॅम्प यांनी मूर्ती कारागीर म्हणून आपली वेगळी ओळख कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उमटवली आहे.

याचबरोबर श्री. कुंभार,त्यांच्या पत्नी व मुलगा आई सोबत,खूप हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढत काढत,गणपतीच्या मूर्ती कारागिरीची कामे करत करत,त्यांनी स्वतःची वेगळी ओळख,एक पत्रकार ते,फ्रन्टलाइन न्यूज नेटवर्क वेबपोर्टल चे संपादक,

अशी निर्माण केली आहे.सामाजिक चळवळी मध्ये ते नेहमी अग्रेसर असतात.सामाजिक चळवळीत काम करत करत असताना आरोग्यविषयक अधिक लोकांना त्यांनी जास्तीची मदत केलेली आहे.प्रचंड असा राजकीय जनसंपर्क,सामाजिक पातळीवर ती विविध घटकांशी त्यांचे असलेले जोरदार संबंध,मूर्त्यांची कारागीर करत करत,मूर्तीला पाडल्या जाणाऱ्या अष्टपैलु,गुणी व्यक्तीमत्वा सारखे,त्यांचे व्यक्तिमत्व,सध्या सामाजिक पातळीवर ती चर्चिले जात आहे.

राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील

कुंभारवाडी गावातून,बेताच्या परिस्थितीतून वरती आलेले श्री.शशिकांत शामराव कुंभार,यांचे शिक्षण नववी पर्यंत पूर्ण झाले आहे.घरची गरिबीची परिस्थिती,वडिलांचे अकाली निधन,गावाकडची अल्पभूधारक अशी शेती,शेता कडची रोजंदारी करण्याशिवाय पर्याय नसलेल्या श्री.कुंभार यांनी लहानपणी,कोल्हापूर येथील बापट कॅम्प येथे झोपडी बांधून,कुंभार वसाहतीमध्ये,आपल्या मूर्ती कारागिरी ला व्यवसाय करण्याचा प्रारंभ केला.

हे सर्व करत असताना,श्री.कुंभार यांनी रिक्षा

चालवण्याचा व्यवसाय देखील काही काळ केला होता.त्याचबरोबर गवंडी काम करणे, सुतार काम करणे सुरक्षारक्षक म्हणून काही काळ त्यांनी काम केले होते.

मीत भाषिक स्वभावाने मृदू व संयमी शांत असलेले

श्री. कुंभार यांचे कोल्हापूर येथील बापट कॅम्प पाहिजे आज स्वतःचे घर असून,वर्षाकाठी त्यांच्या मूर्ती कारागीर करण्याच्या कारखान्यातून गणपतीच्या सह विविध मुर्त्या सुमारे दोन ते तीन हजार वर्षाकाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक शेजारी मध्ये देखील विविध गावांमध्ये जात आहेत.या सार्‍या मूर्ती कारागिरीचा कारखान्यामध्ये,त्यांची दोन मुले त्यांची आई व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचादेखील सर्वाधिक भाग असल्याचे श्री.

कुंभार सांगतात.केंद्र सरकारने माती उत्खनननाव वरती आणलेल्या बंदीमुळे,मूर्ती कारागिरांचा व्यवसाय अडचणीत आल्याचे श्री.कुंभार सांगतात.

त्यातल्या त्यात अलीकडे कोरणा मुळे,कुंभार व्यवसायिकांच्या वरती फार मोठी संक्रात कोसळलेली आहे.कुंभार बांधवही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले असून ते विविध ठिकाणी कर्जाच्या विळख्यात सापडलेली आहेत.

राज्य सरकारकडून त्यांना अपेक्षित असणारे अर्थसाह्य वा कर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने,कुंभार व्यावसायिकांच्या विविध समस्या वाढताना दिसून येत आहेत.देव घडवणारा वर्षाकाठी चा कारागीर,गेल्या तीन वर्षापासून सण-उत्सव साजरे झाले नसल्यामुळे,आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याचे श्री.कुंभार सांगतात.

कुंभार व्यवसायिकांच्या मुलांच्या शिक्षणाचे,भवितव्य वाढलेली महागाई,फिटत नसलेली डोक्यावरची कर्जे,अडचणीत साधले सापडलेला वाडा वडलांचे वडिलोपार्जित कुंभार व्यवसाय,त्यातच माती

उत्खननावर ती आणलेली बंदी,

इत्यादी सह विविध कारणांची मुळे,सामाजिक पातळीवर ती कुंभार समाजातील विविध व्यावसायिक व गरीब घटक अडचणीत आला आहे.यातून शासनस्तरावर ती मार्ग काढण्यासाठी,श्री.कुंभार यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजय चव्हाण,कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील

विविध अधिकारी,विविध तालुक्यातील प्रांत व तहसीलदार,यांच्या भेटीगाठी घेऊन,कुंभार समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी,त्यांच्या न्यायिक मागण्याचे निवेदन देताना श्री.कुंभार.सातत्याने प्रयत्नशील राहिलेले दिसून येतात.कुंभार समाजातील विविध व्यावसायिक अडचणी आलेल्या या संदर्भात,विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार

श्री.पी.एन.पाटील यांनी,विचारलेल्या प्रश्नोत्तराचे दरम्यान,कुंभार व्यवसाय का नाम शासनाकडून मदत घेण्याचे आश्वासन,सरकारकडून घेतल्याबाबत,

श्री.कुंभार यांनी कुंभार व्यावसायिक संघटना समाज

यांचे वतीने आभार मांडले आहेत.कुंभार समाजातील विविध घटक हे,बलुतेदारी च्या पारंपारिक पद्धती च्या,मूर्ती कारागिरी मध्ये,कारागिरी करण्यात,वडिलोपार्जित असल्याने,अनेक कुटुंब प्रमुख,

हे कुंभार समाजातील अल्पभूधारक कमी शेती असलेले आहेत.शासनाने त्यांना वन हक्क जमीन कायदा याप्रमाणे,कसण्यासाठी पाच एकर जमीन,कुंभार समाजाला द्यावी,समाजातील विविध व्यवसायिक घटकांचा विमा शासनाने उतरवावा,तसेच पूरग्रस्त परिस्थिती च्या काळामध्ये झालेल्या नुकसान भरपाई चे संदर्भात,उतरलेल्या विम्याची रक्कम,त्यांना विनाविलंब मिळावी,तसेच तुटपुंजी रक्कम मदत म्हणून न देता,शासनाने अशा,नुकसानग्रस्तांना दिलेली मदत ही जास्तीची रक्कम असावी अशी श्री.कुंभार यांची मागणी आहे.शासनाने कुंभार व्यवसायिकांच्या कारागिरी ला लागणारी शाडूची माती,ग्रामीण भागातील दर्या डोंगर खोऱ्यामध्ये उपलब्ध होत असले कारणाने,तसेच त्या मातीचे विघटन पाण्यामध्ये लवकर होत असल्याच्या कारणाने,आशा कारागिरी कारागिरी साठी माती उत्खननाची परवानगी द्यावी,अन्यथा मूर्तीमध्ये

प्लास्टर ऑफ पॅरिस हे प्रमाण जास्तीचे झाले असल्याचे कारणाने,वाढलेल्या प्रदूषणाला,मूर्ती कारागिरांना जबाबदार धरू नये असे श्री.कुंभार यांचे म्हणणे आहे.

श्री.कुंभार यांचा लहानपणीचा प्रवास,गरीब व कष्टकरी वेदनादायी परिस्थितीतून झालेला आहे.आज त्यांची ओळख कि मूर्ती कारागीर अशी झालेली आहे.तसेच ते कुंभार समाजातील विविध शिकलेल्या नोकरी केलेल्या तरूणांना वधु वर सुचक केंद्रा साठी मदत व मार्गदर्शन करतात.तसेच त्यांनी विविध तरुण-तरुणी यांची लग्ने लावून देऊन त्यांचा संसार सुखाने आज रोजी सुरू आहे.

Updated : 1 April 2022 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top