Home > M marathi blog > 26 जून जयंती- 'कुरआनचे मराठी भाषांतर करणारे राजषीँ छत्रपती शाहू महाराज

26 जून जयंती- 'कुरआनचे मराठी भाषांतर करणारे राजषीँ छत्रपती शाहू महाराज

26th June Jayanti- 'Rajshin Chhatrapati Shahu Maharaj translating the Quran into Marathi

26 जून जयंती- कुरआनचे मराठी भाषांतर करणारे राजषीँ छत्रपती शाहू महाराज
X

ज़ाकिर हुसैन 9421302699

---------------///----------------

शिवछत्रपती प्रमाणेच शाहू महाराजांनी मुस्लिम लोकांचा कधी तिरस्कार केला नाही , उलट त्यांच्या धर्माविषयी नेहमीच आदर बाळगला,याची अनेक उदाहरणे शाहू चरित्रात विखुरलेली आहेत . मुस्लिम समाजातील शिक्षणेच्छु विद्यार्थ्यांना कोल्हापूरातील व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन संस्थानातील मुस्लिमांची शिक्षणाची सुरवात केली .त्या मधील दहा मुलापैकी एक अथनी गावचा विद्यार्थी शेख मुहम्मद युनूस अब्दुल्लाह राजाराम कॉलेजातून ग्रँज्युएट झाल्यावर महाराजांनी त्याला आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले .शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डिंग बनविले व मुस्लिम समाजातील मुलांनी शिकावे म्हणून महाराजांनी अक्षरश: भरभरून मदत केली . शाहूपुरीत मशिदीस जागा दिली शिवाय बांधकामास मदत केली.

कुरआन हा धर्मग्रंथ अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्यांना समजत नव्हता .कुरआनातील धर्मतत्वांचा अर्थबोध सामन्यांसही झाला पाहिजे , अशी इच्छा महाराजांनी बाळगून त्याचे मराठीत भाषांतर करण्याचे कामही सुरू केले होते.त्यासाठी कोल्हापूर दरबाराची २५हजार रुपयांची मोठी रक्कमही खर्ची घातली होती . दुर्दैवाने महाराजांच्या अकाली निधनाने हे काम पूर्ण झाले नाही .

संदभँ :- राजषीँ छत्रपती शाहू महाराज स्मारक ग्रंथ, (पान क्र . 190) लेखक : डॉ .जयसिंगराव पवार

-----------------/////----------------

-----/-/ संकलन अताउल्ला पठाण सर टूनकी संग्रामपुर बुलढाणा महाराष्ट्र

9423338726

Updated : 26 Jun 2022 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top