Home > M marathi blog > #रमझान_स्पेशल

#रमझान_स्पेशल

#प्रेषित_मुहम्मद_सल्लम_यांचा_डायट_प्लान

#रमझान_स्पेशल
X

#रमझान_स्पेशल

#प्रेषित_मुहम्मद_सल्लम_यांचा_डायट_प्लान


✍एम.आय.शेख.

♦आपल्या हिताच्या गोष्टी आपल्याला माहित असूनही बर्‍याच वेळा आपण त्यावर अंमल करत नाही. त्यामुळे आपल्याला अनेकदा मोठ्या हानीला सामोरे जावे लागते.

♦अशीच एक गोष्ट आहे 'खाणे'. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, काय खावे? किती खावे? कधी खावे? परंतू त्याची अंमलबजावणी आपल्या कडून होत नाही. परिणामी अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

♦बरे! अनेकजण आजार झाल्याबरोबर तात्काळ खाण्यापिण्याच्या सवई बदलून चांगल्या सवई अंगीकारतात. मात्र बहुतेकांना हे जमत नाही व आजारी पडल्यावर ही ते आपल्या जुण्या सवई चालूच ठेवतात. म्हणून खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवईमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून विचार केला की रमजान जवळ येत आहे आणि ज्यांना स्वत:च्या प्रकृति ची काळजी आहे अशा वाचकांसाठी प्रेषित मुहम्मद मुस्तफा (सल्लम) यांनी दिलेल्या 'डायट प्लान'ची आठवण करून द्यावी. मला यात मुळीच आश्‍चर्य वाटणार नाही की, हा लेख वाचल्यानंतर अनेक बुद्धीमान वाचक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवई प्रेषित सल्ल. यांच्या डायट प्लान अनुरूप करून घेतील व एक आरोग्यदायी जीवन जगतील.

♦एकदा खैबरच्या विजयानंतर प्रेषित सल्ल. यांच्या साहबा (सोबती) रजि. यांनी त्या भागातील रूचकर फळे पोट भरून खाल्ली, त्यामुळे त्यांना अजीर्ण झाले, त्यांना ताप आला. त्यांनी ही गोष्ट प्रेषित सल्ल. यांना सांगितली, तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी आरोग्यदायी जेवणाचा जो मुलभूत नियम सांगितला तो खालील प्रमाणे-

♦हजरत मक्दाम बिन यकरब रजि. यांनी ग्वाही दिली की प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या समक्ष सांगितले की, "इब्ने आदम म्हणजे माणसाने पोटा पेक्षा अधिक वाईट भांडे दूसरे कोणते ही भरलेले नाही. त्यांच्यासाठी तर काही छोटे-छोटे घास पुरेसे आहेत, त्यांच्या माकणहाडाला सरळ ठेवण्यासाठी. कुणाला अधिक खाण्याची आवश्यकताच असेल तर त्याने एवढे तर नक्कीच करावे की एक तृतीयांश पोट अन्नाने भरावे, एक तृतीयांश पाण्याने आणि एक तृतीयांश हवेसाठी रिकामे सोडावे"

♦तिरमीजी हदीस संग्रहात संग्रहित केलेल्या या हदीसमध्ये जेवण्या संबंधीचा जो मुलभूत सिद्धांत सांगितलेला आहे तो इतका स्वयंस्पष्ट आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. या सिद्धातांच्या कसोटीवर वाचकांनी आपापला एहतेसाब (आढावा) घ्यावा. या अनुसार जेवण होत नसेल तर ते या नुसार होईल यासाठी प्रयत्न करावेत. "

♦पोट भरून जेवणे" ही गैर इस्लामी पद्धत आहे. एवढी मात्र नोंद किमान मुस्लिमांनी तरी घ्यावी.

♦लक्षात ठेवा मित्रानों! कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. खाण्याचा अतिरेक तर अधिक वाईट. जीभेचे चोचले पुरविण्यासाठी आपण काय काय आणि किती किती खातो? याचा आपल्याला स्वतःलाच अंदाज येत नाही. आपण या तीन इंचाच्या जीभेवर नियंत्रण ठेऊशकत नसू तर आपले अस्तित्वच व्यर्थ आहे. मग बाकीच्या स्वयंशिस्तीच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही.

♦वर नमूद हदीस किती महत्त्वाची आहे? याचा अंदाज इब्ने अबी मासविया या पारसी वैद्याच्या या उद्गारावरून येईल की,"मी जेंव्हा ही हदीस अबू खईस्माच्या पुस्तकात वाचली तेव्हा मला वाटले की जर लोकांनी या हदीसचे पालन करावयास सुरूवात केली तर रूग्णालये ओस पडतील व औषधालयांना टाळे लावावे लागेल."

♦प्रसिद्ध अरबी डॉक्टर हारिस बिन कलीदा म्हणतात, "माणसाला मृत्यू आणणारी सर्वात मोठी सवय म्हणजे एक जेवण पचण्या अगोदर दूसरे जेवण करणे किंवा सतत काही ना काही खात राहणे"

♦शिवाय, एक अज्ञात अरबी शेख यांचे उद्गार अरबी वैद्यकीय साहित्यात प्रसिद्ध आहे. ते म्हणतात की, " कुठल्याही कबरस्तानात झोपलेल्या लोकांना बोलता आले असते आणि त्यांना विचारले गेले असते की, तुमच्या मृत्यूचे कारण काय? तर त्यातील बहुतेकांनी उत्तर दिले असते ओवर ईटिंग अर्थात अधिक खाणे."

♦कमी खाण्याने अनेक फायदे इस्लामी वैद्यकीय साहित्यात नमूद आहेत. त्यापैकी काहीचा उल्लेख या ठिकाणी करणे गरजेचे आहे. कमी खाल्यामुळे पचनसंस्थेवर भार येत नाही. म्हणून ती सुरळीत आणि वर्षानुवर्षे बिना तक्रार काम करू शकते. हृदय सुदृढ आणि मेंदू प्रफुल्लित राहतो, राग कमी होतो, अवास्तव लैंगिक भावना उत्पन्न होत नाहीत, माणूस तरतरीत व सदैव आनंदी राहतो, चांगले विचार मनामध्ये येतात. अनेक मानसीक आजार उत्पन्नच होत नाहीत. रात्री झोप चांगली लागते, वाईट स्वप्ने पडत नाहीत.

♦हजरत अब्दुल्लाह बिन उमर रजि.कडे एक वैद्य आला आणि त्याने एक चूर्ण त्यांना दाखवून सांगितले की, "आपण हे खरेदी करा यामुळे अन्न पचन होते" तेव्हा त्यांनी त्या वैद्याला सांगितले की, " मला याची गरज नाही ज्या दिवसापासून मी इस्लामचा स्विकार केलेला आहे त्या दिवसापासून पोटभर जेवण केलेले नाही."

♦ एवढेच नव्हे तर एक महान साहबी हजरत अबु उबैदा बिन खवास रजि. यांचा प्रसिद्ध कौल आहे की,"तुमचा विनाष अधिक खाण्यामुळे होतो तर तुमचे रक्षण कमी खाण्यामुळे होते."

♦अरबी साहित्यामध्ये असे ही म्हंटलेले आहे की, तुमच्या मूळ आई-वडिलांना म्हणजे हजरत आदम आणि हव्वा अलै. हे खाण्यामुळे संकटात सापडले होते आणि प्रलयापर्यंत त्यांच्या औलादीं (म्हणजे आपण सर्वां) समोर खाण्याचीच परीक्षा राहणार आहे."

♦असे ही म्हटले जाते की, ज्याने आपल्या जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर नियंत्रण मिळविते. कुठल्याही क्षेत्रात नेकी (पुण्या) ने यशस्वी झालेल्या लोकांच्या दिनचर्येचा आढावा घेतला तर दोन गोष्टी ठळकपणे दिसून येतात की अशा व्यक्तींचे खाणे आणि झोपणे कमी असतेे.

♦जास्त खाण्यामुळे माणूस सुस्त पडतो व त्याची झोप पण वाढते. थोडक्यात ज्यांना आरोग्यदायी जीवन हवे असेल त्यांनी खाणे कमी करावे. याच संदर्भात हजरत बशर बिन हारिस रहे. यांचे म्हणणे प्रसिद्ध आहे, ते म्हणतात," मी गेल्या पन्नास वर्षापासून कधीच पोट भरून खाल्लेले नाही. हलाल अन्न ही पोट भरून गृहण करणे योग्य नाही. ज्याला हलाल पोट भरून खाण्याची सवय लागली तर हलाल कमी पडत असेल तेव्हा तो हराम ही खाल्याशिवाय राहणार नाही."

#रोजा_आणि_कँसर

♦कमी जेवण्याचे अनेक वैद्यकीय फायदे सुद्धा आहेत. त्यातील एक फायदा असा की माणसाचे वजन नियंत्रणात राहते त्यामुळे तो अनेक व्याधींपासून आपोआपच दूर राहतो. अशा लोकांना 'लाईफ स्टाईल डिसीजेस' (जीवनशैलीचे आजार) होत नाहीत. एवढेच नव्हे तर कमी खाण्याने आपणास कर्करोगासारख्या 'लाईलाज बिमारी' पासून दूर राहता येते. ही बाब फिजीयॉलॉजी अर्थात शरीर शास्त्राचे 2016 चे नोबेल पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक डॉ. योशीनोरी ओशूमा यांनी त्यांच्या 'ऑटोफॅगी' या संशोधनातून सिद्ध केलेले आहे.

♦ऑटोफॅगी हा ग्रीक भाषेचा शब्द आहे. ज्याचा अर्थ 'स्वतः स्वतःला खाणे' असा आहे 'ऑटो' म्हणजे स्वतः 'फागेन'चा अर्थ खाऊन टाकणे. डॉ. ओशूमीचे संशोधन व्यापक आणि क्लीष्ट असून त्यातील मतितार्थ एवढाच की, सतत अर्धउपाशी राहिल्याने माणसाच्या पेशी ह्या माणसालाच खातात. त्यात मग कँसर शरिरात निर्माणच होऊ शकत नाही. झाला तरी कमी खात राहण्याच्या सवईमुळे शरिरात निर्माण होणारे गुलूकोगॉन नावाचे आम्ल त्या पेशींना खाऊन टाकते.

♦रमजानच्या रोजामध्ये ठीक हीच प्रक्रिया वापरण्यात आलेली आहे. सतत चौदा ते साडे चौदा तास ते ही 30 दिवस उपाशी राहिल्याने शरिरातील, अतिरिक्त चर्बी, रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल व अवास्तव पेशी नष्ट होतात.

♦प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी आयुष्यात पोटभरून जेवण केलेले नव्हते. प्रेषित सल्ल. यांच्या याच 'डायट प्लान'चे जर का आपण अनुसरन केले तर आपणही अनेक महाभयंकर आजारापासून दूर राहू शकतो आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

♦प्रेषित सल्ल. यांच्या डायट प्लान बद्दल सांगावयाचे झाल्यास त्यांचे जेवण साधेे होते. त्यात प्रामुख्याने खजूर, लौकी, जौ, फळे, दूध, उंट आणि बकर्‍याचे मांस यांचा प्रामुख्याने समावेश होता. दूसरे वैशीष्ट्ये म्हणजे ते हलाल कमाईने कमावलेले होते. तीसरे वैशिष्ट्ये म्हणजे ते कमी जेवण करीत होते. ही आहार योजना सोपी आणि सरळ आहे.

♦पण आजच्या काळात जेथे काहीही खा, कितीही खा, प्रसंगी कर्ज काढून खा, चायनीज सारखे पदार्थ जे की कृत्रीम सॉसेस पासून बनवलेले असतात ते खा, 40 दिवसात अडीच किलो वजनाचे होणारे कृत्रिम चीकन खा, पिझ्झा, बर्गर सारखे मैदा आणि चीज भरलेल्या गोष्टी खा, आईसक्रीम सारखी संचित चर्बी असलेले पदार्थ खा, वरून पेस्टीसाईड (कृमीनाष्क विष) मिसळलेली पूर्णपणे अनैसर्गिक कोल्डड्रिंक्स प्या, दारू- बीयर प्या, फुल्ल एंजॉय करा. अशा या तत्वज्ञानात रममाण असणार्‍यांना प्रेषित सल्ल. यांची आहार योजना कदाचित आकर्षक वाटणार नाही परंतू, आधुनिक आहार योजनेची तुलना प्रेषित सल्ल. यांच्या आहार योजनेशी केल्यास कोणती योजना गुणवत्तापूर्ण व आरोग्यदायी आहे हे कळण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.

♦मित्रानों! आधुनिक जीवनशैलीचा शाप असा आहे की, माणसं तारूण्यात आरोग्य हातात असतांना अधिक पैसा कमाविण्याच्या नादात आरोग्य घालवून बसतात आणि कमविलेल्या पैशांनी गेलेले आरोग्य परत मिळविण्याचा खुळा प्रयत्न करतात. या काळात जेव्हा टी.व्ही. आणि इंटरनेट ने माणसाला नैसर्गिक जिवनशैलीपासून पूर्णपणे दूर केले आहे.

🌹म्हणुन वाटलं चला! प्रेषित सल्ल. यांचा डायट प्लान आपल्याशी शेअर करावा, जे खरोखर बुद्धीमान असतील ते जरूर याला फॉलो करतील. शेवटी कुरआनने सांगितलेलेच आहे ना की,

"उपदेशापासून तेच लोक बोध घेतात जे विवेकशील आहेत"

(सुरे बकरा आयत नं. 269).

🤲शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना प्रेषितांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या जीवनात उतरविण्याची समज द्यावी. (आमीन.)

Updated : 22 March 2022 4:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top