Home > LIVE TV > चक्क सरपंच यांनी पाडले स्वतःचे घर

चक्क सरपंच यांनी पाडले स्वतःचे घर

#अतिक्रमणाच्या कार्यवाही पासून सुटण्यासाठी सरपंचाची धडपड.मारोती बारसागडे

मो नं ८३९००७८३६७

तालुका विषेश प्रतिनिधी चामोर्शी

अतिक्रमण करून सरपंच होण्यापूर्वी बांधलेल्या घराला चक्क सरपंचांनी सरपंचपदासाठी पाडले. मुधोली चक नं.२ येथील या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकाच चर्चेला उधाण आले.

चामोर्शी तालुक्यात असलेल्या मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते.

अज्ञात इसमाने त्यांच्या अतिक्रमण विरुद्ध ग्रामपंचायत मध्ये नमुना आठ ची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवक यांनी सरपंच यांना कळवताच आज दिनांक ३१ जुलै रोजी सरपंच पद कायम राहावे यासाठी सरपंचांनी आपले घर पाडले ,

त्यामुळे आजच्या काळात लोकांना सरपंच पद किती प्रिय आहे हे यातून पाहायला मिळते.

राज्य निवडणूक आयोगाने अतिक्रमणधारकांना सर्व ग्रामपंचायत सदस्य होण्यापासून परावृत्त करण्यासाठी अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते,

त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांची पदर रिक्त झाली त्याच भीतीने येथील सरपंच यांनी देखील आपले घर पाडले.

Updated : 31 July 2021 8:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top