Home > Lifestyle > गरोदर मातांनी सदैव सकस आहाराचे सेवन करावे- तहसीलदार राजेश लांडगे

गरोदर मातांनी सदैव सकस आहाराचे सेवन करावे- तहसीलदार राजेश लांडगे

Pregnant mothers should always consume healthy food - Tehsildar Rajesh Landge

गरोदर मातांनी सदैव सकस आहाराचे सेवन करावे- तहसीलदार राजेश लांडगे

--‐------------------------------------------------------

*मोघाळी सर्कल प्रतिनिधी :विनायक गायकवाड* 9545910206 गरोदर मातांनी व महिलांनी नियमित व सदैव सकस व पौष्टिक आहाराचे सेवन करावे तरच भविष्यात जन्माला येणारी बालके कुपोषित जन्माला येणार नाहीत असे मत भोकर तहसीलचे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे यांनी बोलताना व्यक्त केले. ते तालुक्यातील हरी तांडा येथे प्राथमिक शाळेत अंगणवाडी व वर्ल्ड व्हिजन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय पोषण महा शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वंदना राजेश्वर करपे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अमित राठोड, गटशिक्षणाधिकारी वाघमारे, वर्ल्ड व्हिजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापु आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आपला भारत देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तरीपण मेळघाट सारख्या आदिवासी भागात आजही दीड- दीडशे मुले कुपोषणामुळे मरतात ही फार मोठी शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल. याचे मुख्य कारण आजही ग्रामीण भागात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात निरक्षर आहे तसेच त्यांच्यात म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. पुरुषापेक्षाही जास्त महिला काबाडकष्ट करतात पण जेवण मात्र उरलेले, शेळेपाते व निकृष्ट दर्जाचे सेवन करतात. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो व त्यांच्यापासून निर्माण होणारी संतती ही कुपोषित जन्माला येते. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील जाणकारांनी आपल्या घरच्या सर्व महिलांना ताजे सात्विक आहार वेळेच्या वेळी खाण्यासाठी द्यावा. तरच आपल्या घरात भावी येणारी पिढी सुदृढ जन्मास येईल असे सांगितले.

आपल्या तालुक्यात सध्या जनावरांना लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैल व गाय वर्गीय जनावरांचे त्वरित लसीकरण करून घ्यावे व या आजारापासून आपले पशुधन वाचवावे असे सांगून पंतप्रधान सन्माननिधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी त्वरित ई केवायसी करून घ्यावी व आपला येणारा निधी चालू ठेवावा असे सांगितले. तसेच प्रत्येक मतदारांनी आपले मतदान कार्ड आधार कार्डासी लिंक करून घ्यावे असे उपस्थित गावकऱ्यांना आवाहन केले

या कार्यक्रमात गटविकास अधिकारी अमित राठोड, वर्ल्ड व्हिजनचे प्रकल्प अधिकारी श्याम बाबु पट्टापु आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल शिवशट्टे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.पंडित मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला भोकर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर व आशा वर्कर, शिक्षक वृंद, पत्रकार बांधव व गावकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध सकस आहाराचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Updated : 23 Sep 2022 4:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top