Home > Latest news > मनपाच्या झोन कार्यालयात भरता येणार पाणीपट्टी कर

मनपाच्या झोन कार्यालयात भरता येणार पाणीपट्टी कर

Water strip tax can be paid at the zonal office of the corporation

मनपाच्या झोन कार्यालयात भरता येणार पाणीपट्टी कर
X





चंद्रपूर । मालमत्ता कर भरण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने राबविलेल्या शास्ती माफी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता पाणीपट्टी कर वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी झोन कार्यालयातही पाणीपट्टी कर भरता येणार आहे.

सध्या पाणीपट्टीचा भरणा पाण्याची टाकी, प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालयात होत आहे. झोन कार्यालयातदेखील एक डेस्क सुरु करण्यात आले असून, पाणीकराचा भरणा करता येईल. प्रभाग कार्यालय क्रमांक 1 संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, प्रभाग कार्यालय क्रमांक दोन कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, प्रभाग कार्यालय क्रमांक तीन देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे पाणीपट्टी भरता येईल. येत्या काही दिवसांत ऑनलाईन पद्धतीने भरणा करण्यासाठी व्यवस्था सुरु होणार आहे. शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

Updated : 31 Jan 2022 3:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top