Home > Latest news > मदर नेचर क्लिनीकच्या वतीने वाडे यांचा सत्कार

मदर नेचर क्लिनीकच्या वतीने वाडे यांचा सत्कार

Wade felicitated on behalf of Mother Nature Clinic

मदर नेचर क्लिनीकच्या वतीने वाडे यांचा सत्कार
X

फुलचंद भगत

वाशीम : येथील मनिप्रभा रोड वरील आयुर्वेद तज्ञ डॉ. सुजित सोमाणी व डॉ. सुविधा सोमाणी यांच्या मदर नेचर क्लिनीकला शिवसेना संपर्क प्रमुख तथा मनपा नगरसेवक संजु आधार वाडे यांनी भेट देवून आयुर्वेदा बद्दल माहिती जावून घेतली. सोमाणी दाम्पत्यांनी कोरोना कार्यकाळात हजारो आयुर्वेद किटचे मोफत वितरण करून सामाजिक बांधीलकी जोपासली. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हजारो रूग्णांना बरे केले. त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी डॉ. सोमाणी दाम्पत्यांनी संजु वाडे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. सोबतच त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात केलेल्या वेगवेगळया प्रयोगाची माहिती देत कोरोना कार्यकाळात तयार केलेली किटही यावेळी भेट दिली.

Updated : 19 Feb 2022 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top