Home > Latest news > केंद्रीय मंत्री हरदिप एस पुरी 22 ते 24 सप्टेंबर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर भाजपा जिल्ह्यध्यक्ष देवराव भोंगळे यांचे जिल्ह्यतील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

केंद्रीय मंत्री हरदिप एस पुरी 22 ते 24 सप्टेंबर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर भाजपा जिल्ह्यध्यक्ष देवराव भोंगळे यांचे जिल्ह्यतील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Union Minister Hardeep S Puri on a visit to Chandrapur district from 22nd to 24th September BJP District President Devrao Bhongle's appeal to the workers in the district to attend

केंद्रीय मंत्री हरदिप एस पुरी 22 ते 24 सप्टेंबर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर    भाजपा जिल्ह्यध्यक्ष देवराव भोंगळे यांचे जिल्ह्यतील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
Xविश्वगौरव,पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनात व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जगतप्रसादजी नड्डा यांच्या सूचनेनुसार लोकसभा प्रवास दौरा कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय आवास शहरी कार्य, पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री मा.ना. हरदीप एस पुरी पुरीजी आपल्या सोबत विविध विषयांवर संवाद साधण्यासाठी चंद्रपूर दौऱ्यावर 22 ते 24 सप्टेंबर येणार आहे. दिनांक 22 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजता modi@20 या कार्यक्रमाला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे मा.केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहे.

या बैठकीला प्रामुख्याने मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री,वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य तसेच माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर हे केंद्रीय मंत्री ना.हरदिपसिंह एस. पुरी सोबत जिल्ह्यातील दौऱ्यात उपस्थित राहणार आहे.

श्री.राजेश बकाने लोकसभा प्रभारी व श्री.देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी केंद्रीय मंत्री महोदयांच्या दौऱ्यातील होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यतील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Updated : 21 Sep 2022 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top