Home > Latest news > चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

Tribute to Bharat Ratna Swarsamrajni Lata Mangeshkar in Chandrapur City Corporation






चंद्रपूर, ता. ८ फेब्रु : भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार, दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मुख्य प्रशासकीय कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले तसेच उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपिन पालीवाल यांनीही पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली.

दिदीचा जादुई आवाज आणि देशाच्या संगीत क्षेत्रासाठी दिलेले बहुमुल्य योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शोकभावना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांच्यासह मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Updated : 9 Feb 2022 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top