Home > Latest news > द्रुतगती मार्गावर ट्रकचा भीषण अपघात;शेतकरी व दोन बैल जागीच ठार

द्रुतगती मार्गावर ट्रकचा भीषण अपघात;शेतकरी व दोन बैल जागीच ठार

Tragic truck accident on expressway; farmer and two oxen killed on the spot

द्रुतगती मार्गावर ट्रकचा भीषण अपघात;शेतकरी व दोन बैल जागीच ठार
X

फुलचंद भगत

वाशिम:-नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर अपघाताची मालिका सुरुच असुन दि.१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघाताच शेतकर्‍याला आणी बैलाला प्राण गमवावा लागला.औरंगाबाद नागपूर द्रुतगती मार्गावर पेडगाव शेत शिवारामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये शेतकरी व दोन बैल जागीच ठार झाले आहे.


औरंगाबाद कडून नागपूर कडे माल घेऊन जाणाऱ्या एम. एच. 42 ए.क्यु. 3364 हा कंटेनर पेडगाव जवळ वाहणाला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये कंटेनर चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे कंटेनर पलटी झाला असल्याचे कळते व त्याखाली महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या शेतकरी विजय सुभाष देशमुख वय २६ व दोन बैलाचा जागीच अंत झाला व कंटेनर किनर सुरजीत मदन सरकार वय ४९ वर्ष जुना मोरगाव, बारामती पुणे किरकोळ जखमी झाला. तर कंटेनर चालक घटनास्थळा वरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी व वनोजा येथिल श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर च्या खाली अडकून पडलेल्या किनर ला अथक प्रयत्ना नंतर दोन जेसीबी व डोजर च्या सहाय्याने कंटेनर उचलून बाहेर काढून रुग्णालयात नेले.यावेळी मंगरुळपिर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. तुषार जाधव मंजुषा मोरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


अपघातामुळे वाहतुक विष्कळीत आणी पोलीसांची कर्तव्यतत्परता

औरंगाबाद नागपूर द्रुतगती मार्गावर या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती तिला वळण देण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले तसेच अपघातग्रस्तांच्या नातेवाईकात व अधिकाऱ्यांमध्ये थोड्यावेळासाठी मयताचे शव उचलणे यावरून वाद निर्माण झाला होता यावेळी सुज्ञ ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अपघातातील मयताला पुढील कार्यासाठी तात्काळ काढून देण्यात आली तसेच वाहन हटवण्यात व कंटेनर खाली दबलेल्या बैलाला बाहेर काढण्याकरिता पी.एन.सि. कंपनीच्या जे.सी.बी. बुलडोजर उपलब्ध करून दिले या कंपनीचे मयूर ठाकरे यांनीही सहकार्य केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 15 Feb 2022 5:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top