युवासेना -युवासेवा विद्यार्थ्याच्या मदतीला :- भद्रावती येथील खुटेमाटे आयटिआय संस्थेमधील अंतिम वर्षाच्या २६ परिक्षार्थी परीक्षा वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांची न्यायासाठी युवासेना कडे धाव
To help Yuvasena-Yuvasewa students: - 26 final year students of Khutemate ITI in Bhadravati run to Yuvasena for justice.


*युवासेनेच्या जिल्हाप्रमुखांची जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा.
चंद्रपुर विभागाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बुजाडे सर यांना दोन्ही *युवासेना जिल्हा प्रमुख *हर्षल शिंदे व *प्रा. निलेश बेलखेडे* यांनी विद्यार्थ्यांसह भेट घेऊन विषयाचे गांभीर्य लक्षात आणून चर्चा करण्यात आली व परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुनःश परिक्षा घेण्यात यावी यासाठी प्रयत्न करून त्यांचे वार्षिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करावा व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि मागणी करण्यात आली. चौकशी मध्ये जर सदर प्रकार संंस्थेच्या चुकीमुळे घडला असल्यास दोषीवर योग्य ती कारवाई करावी यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी भद्रावती तालुका अधिकारी *महेश जिवतोडे*,पोलीस पाटील जिल्हाप्रमुख *योगश मत्ते* यांची उपस्थिती होती.