टिपू सुलतान भारताचे सुपुत्र त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही.:- डॉ. राजन माकणीकर
Tipu Sultan, son of India, his notoriety will not be tolerated.: - Dr. Rajan Makanikar
X
*मुंबई टिपू सुलतान हे देशभक्त असून हिंदू विरोधी मुळीच नव्हते, विशेष म्हणजे टिपू सुलतान हे भारताचे सुपुत्र आहेत त्यामुळे त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचीव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.*
जातीवादी विघातक संघटन केवळ जातीवादातून हजरत टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करत असून नवीन राजकीय परिस्थितीत टिपू सुलतान यांच्या देशाचे नायक या प्रतिमेवर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या नायकांच्या प्रतिमांची निर्मिती करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. खऱ्या राष्ट्रीय नायकांना खाली खेचण्याचा हा प्रयत्न आहे. असेही पँथर राजन माकणीकर म्हणाले.
पुढे डॉ. माकणीकर म्हणाले की, टिपू सुलतान यांनी सर्व धर्मासाठी कार्य केले असून त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माची लोक मोठं मोठ्या पदावर होती, ते हिंदूविरोधी मुळीच नव्हते मंदिरांच्या निर्मितीस त्यांचा मोलाचा हातभार आहे. त्यांनी इंग्रजी राजवटीला सळो की पळो करून सोडले होते. टिपू सुलतान हे भारतमाते चे सुपुत्र असून देशभक्त होते.
17व्या शतकातील देशभक्त टिपू सुलतान यांच्या विरोधात गरळ ओकनार्यांनी इतिहासाची पाने चाळावीत आणि पाने चाळतांनाही मणी भेद नसावा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) हजरत टिपू सुलताण यांच्या नावाला सैदैव समर्थन देईल व विरोध करणाऱ्या जात्यंध शक्तीचा कायम निषेध करेल असा इशाराही विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला.