Home > Latest news > जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नाही

जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नाही

There is no statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Maharashtra.

जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नाही
Xचंद्रपूर शहरामध्ये युवा स्वाभिमान पक्षाने केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी


आज दिनांक:- १९/०२/२०२२ ला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराज ज्यांची जगात जाणता राजा म्हणून ओळख आहे, यांची आज जयंती आहे. परंतु जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या चंद्रपूर शहरांमध्ये महाराजांचा एकही पुतळा नाही. ही संपूर्ण शहराकरिता अशोभनीय बाब आहे. ही बाब युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी चंद्रपूर शहरामध्ये महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा शहरामध्ये एकही पुतळा नसल्याने चंद्रपूर शहरातील सावरकर चौक तथा इतर सुशोभित ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी युवा स्वाभिमान पक्ष जिल्हा चंद्रपूर तर्फे मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी वित्तमंत्री, वनमंत्री तथा पालक मंत्री व महानगरपालिका चंद्रपूर यांच्याकडे तमाम शिवभक्तांन करिता आज शिवजयंतीच्या पर्वावर निवेदन देत मागणी करण्यात आली.

Updated : 20 Feb 2022 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top