करंजी परिसरात वीजचोरीचं थैमान, महावितरण झोपेत
खांबावर आखूडे टाकून होते वीजचोरी, मागील 1 वर्षापासून वीजचोरी मात्र, महावितरण गप्प.


करंजी रोड... पांढरकवडा तालुक्यातील करंजी व परिसरातील वाढत्या वीजचोरीचं प्रमाण बघून तोंडात बोटे टाकाल !! कारण करंजी रोड गावात मागील 1 वर्षपासून सर्रास वीजचोरी सुरू आहे मात्र पांढरकवडा, उमरी येथील वरिस्ट अधिकारी मुंग गिळून गप्प बसली आहे. वाढत्या वीजचोरी वर लगाम तर सोडा साधी कार्यवाही पण महावितरण कडून होत नाही आहे.
करंजी रोड व परिसरात वीजचोरी काही नवीन प्रकार नाही मात्र वाढत्या वीजचोरी वर स्वतः महावितरण प्रशासन चोरी कळवा असं आव्हाने करतात. पण प्रत्यक्ष वीजचोरीत महावितरण कडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा प्रकार करंजी गावात उजेडात येत आहे. करंजी मध्ये दिवसाढवळ्या व सायंकाळी सरसकट विद्यूत खांबावर आखूडे टाकून वीजचोरी होत आहे मात्र झोपेत असलेले महावितरण कर्मचारी ,अधिकारी यावर आवर घालण्यास असमर्थ असून जणू करंजी व परिसरातील वीजचोरी ला महावितरण ची मुकसंमती असल्याचे जाणवते. रात्रीला वीजचोरी पकडत नाही हा गैरसमज मनात पकडुन करंजी मध्ये वीजचोरी सुरू आहे परिणामी सुरळीत वीजबिल भरणारे विजग्राहक हे सुद्धा अश्या प्रकारच्या वीजचोरी केल्याने काहीच होत नाही असा गैरसमज यातून सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहचत असून यवतमाळ , अमरावती येथील वरीष्ठ अधिकारी तरी वाढत्या वीजचोरी कडे लक्ष देतील का असा प्रश्न नागरिक करीत आहे.