Home > Latest news > राज्य पुन्हा एकदा अनलॉक होणार❓ दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता‼️

राज्य पुन्हा एकदा अनलॉक होणार❓ दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता‼️

The state will be unlocked once again. A decision is likely to be taken in two days


MMarathi ❗ Trending

राज्यभरात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने राज्य पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अनेक निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहेत. यावर आता लवकरच मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.

'हे' निर्बंध शिथिल होण्याची शक्यता‼️ :

चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. यात शिथिलता मिळण्याची शक्यता.

रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक केले आहेत. त्यामध्येही शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील ब्युटी सलून आणि केश कर्तनालय पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी द्यायची शक्यता.

मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी देण्याची शक्यता.

सध्या नाट्यगृह चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत, तेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शक्यता.

हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृह यांनाही पूर्ण क्षमतेने आणि नियमित वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता.

दरम्यान, ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश देण्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले आहे. त्यानंतर आता राज्य सरकार तातडीने यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Updated : 22 Feb 2022 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top