पुसद मधील हिंदुत्व मोर्चातील नाईक कुटुंबाचा सहभाग आश्चर्यकारक
या घटनेचा मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध करु ! जावेद अन्सारी
X
यवतमाळ -: लव्ह जिहाद, गोहत्या बंदीच्या नावाखाली जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या काही संघटना खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली देशात विष पेरण्याचे काम करत आहेत.या माध्यमातून बंधुभाव बिघडवण्याचे काम ते करत आहेत. मुस्लिम समाज हा लव्ह जिहादचे किंवा गोहत्येचे समर्थन करत नाही. राहिला विषय हिंदुत्वाचा तर खरा हिंदू धर्म फक्त मानवता, प्रेम, बंधुता आणि न्याय शिकवतो.मात्र काही कट्टरवादी संघटना आणि राजकीय पक्ष आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी देशातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नाईक कुटुंबाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घराण्यात महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्याचप्रमाणे नाईक कुटुंबाला बळ देण्याचे व त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम नेहमीच अल्पसंख्याक समाजाने केले आहे. मात्र आज लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने दि 22 जानेवारी रोजी पुसद येथे मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात नाईक कुटुंबाचा सक्रिय सहभाग आश्चर्यकारक आणि चिंतेचा विषय आहे.अल्पसंख्याक समाज नेहमीच नाईक कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला.पण आज तेच नाईक कुटुंब या मार्गाने अल्पसंख्याक समाजाविरुद्ध कट रचल्याचा तीव्र निषेध नोंदवत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक जावेद अन्सारी यांनी दिली.