Home > Latest news > छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले होते ह्या विचारांची अंमलबजावणी जन सामान्य लोकांमध्ये झाली पाहिजे - मधुसूदन कोवे

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले होते ह्या विचारांची अंमलबजावणी जन सामान्य लोकांमध्ये झाली पाहिजे - मधुसूदन कोवे

The idea that Chhatrapati Shivaji Maharaj created Swarajya for the welfare of the ryots should be implemented among the common people - Madhusudan Cove

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारधी बांधवांच्या उपस्थितीत शिवजयंती उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोकराव कपिले जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ हे होते मुख्य मार्गदर्शक मा.दिवाकरजी भोयर आणि मा.गोविंद चव्हाण मुख्य सचिव स्वतंत्र लोक सोसायटी उपस्थित होते.

पारधी बांधवांच्या वतीने आयोजित शिवजयंती उद्बोधन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचार मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज हे कष्टकरी शेतकरी रयतेच्या कल्याणासाठी कार्य केले शोषित समाजाच्या उन्नतीसाठी गुलामगिरीतून मुक्तता व्हावी.आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वाभिमानी विचार प्रास्ताविकेत मांडला होता.

शिवजयंती उद्बोधन कार्यक्रम आयोजित करताना ग्रामिण भागातील वस्तिवर,पोडावर, आणि बेड्यावर उद्बोधन कार्यक्रम झाले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली पाहिजे असे विचार मार्गदर्शक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच च्या वतिने मा.मधुसुदन कोवे गुरुजी, प्रल्हाद काळे,मा कृष्णा जी भोंगाडे इश्यु माळवे, प्रविण पवार, नितीन ठाकरे पपिता माळवे ज्योती माळवे आम्ही साऱ्या सावित्री वस्तिगृहातील विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पपिता माळवे यांनी केले होते.

Updated : 20 Feb 2022 8:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top