खूप झाली परीक्षा,आता विलीनीकरण करा....डॉ मंगेश गुलवाडे एसटी कर्मचाऱ्यांसाठी भाजपाचे पत्र भेजो अभियान
The exam is over, now merge .... Dr. Mangesh Gulwade Send BJP's letter campaign for ST employees


किमान 4 दशकापासून पासून लालपरीवर(एसटी परिवहनावर)नागरिकांचा विश्वास दृढ आहे.सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून राज्य शासनाच्या या यंत्रणेकडे बघितले जाते.परंतू ही व्यवस्था मागील 100 दिवसांपासून कोलमडली आहे.कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलनिकरण व्हावे म्हणून आंदोलन चालविले आहे.त्यांची ही मागणी रास्त आहे.या कर्मचाऱ्यांची खूप परीक्षा झाली,आता विलीनीकरण करा अशी विनंतीवजा मागणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी,आंदोलकांच्या मंडपाला भेट देऊन भाजपा तर्फे पुन्हा एकदा आंदोलनाला समर्थन देत पत्र भेजो अभियान चा शुभारंभ करतांना सॊमवार(21 फेब्रुवारी)ला केली आहे.
यावेळी भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो नेते विशाल निंबाळकर,डॉ दीपक भट्टाचार्य,धनराज कोवे,रवी लोणकर,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,बंडू गौरकर,रवींद्र नंदुरकर यांची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले,भाजपा एसटी कामगारांच्या पाठीशी आहे.म्हणूनच लोकनेते आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण एसटी कर्मचाऱ्यांना यापूर्वी करण्यात येऊन समर्थन देण्यात आले.ही लढाई अजूनही सुरूच आहे.अनेक कर्मचारी शहिद झाले,पण शासनाची परीक्षा संपली नाही.विलीनीकरण झाले नाही.राज्यपालांनी राज्य सरकारला विलीनीकरण करण्याची परवानगी दिली असतांना परीवहन महामंडळाने दुर्लक्ष केले आहे.शासनाला जाग आणण्यासाठी भाजपा पत्र भेजो अभियान छेडत आहे,अशी घोषणा त्यांनी केली.एसटी कर्मचाऱ्यांना भेट दिल्यानंतर प्रथम चरणी 1000 पोस्ट कार्ड मुख्यमंत्री व परिवाहनमंत्र्याना पाठविण्यात आले.तत्पूर्वी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत,कार्यकर्त्यानी शासनाचा निषेध केला.