त्याच विहीरीत आढळला बालकासह वडीलाचाही मृतदेह
आत्महत्या की घातपात?पोलिस तपास सुरु


वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार जवळ असलेल्या शेंदूरजना मोरे गावच्या रस्त्यावर असलेल्या एका शेतातील विहिरीत एका 8 वर्षी बालकांचे मृत अवस्थेत काल दि.१३ फेब्रुवारी संध्याकाळी प्रेत सापडले होते.मृतक बालक महेश कालापाड असे त्याचे नाव असुन शेंदूरजना मोरे गावचे रहवाशी असल्याचे कळते. दि.१३ च्या संध्याकाळी पोलीस आणि बचाव पथक यांनी मृतदेह बाहेर काढल्या नंतर दुसर्याच दिवशी दि.१४ फेब्रुवारीला त्या बालकाच्या वडीलाचाही मृतदेह त्याच विहिरीत आढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वडिलाचे नाव महादेव कालापाड असल्याची माहिती मिळाली असून दोन दिवसा पूर्वी पती पत्नी मध्ये वाद झाल्या नंतर आपल्या 8 वर्षीय बालकाला घेवून घराबाहेर पडल्याचे समजते. नंतर परत न आल्याने शोधाशोध सुरू केल्या नंतर दोन मृतदेह सापडल्या ने आत्महत्या की घातपात?आता हे पोलीस तपासा नंतर समोर येणार असून मंगरुळपीर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206