Home > Latest news > आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

Administration's neglect of illegal parking in Arni city.

आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
X

झाकीर हुसैन - 9421302699

आर्णी : दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. अपघात झाला की मोहिम सुरू करून वाहनांवर कारवाई करायची, त्यानंतर वर्षभर मात्र त्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही. या वृत्तीमुळेच तालुक्यात अवैध पार्किंगला उधाण आले आहे.


काळी-पिवळी, ऑटो, टू व्हीलर गाड्या, हात गाड्या आणि अवैध प्रवासी वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड होऊ लागली आहे. शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांची दळणवळणासाठी गैरसोय होऊ नये.


प्रत्यक्षात रस्त्यावरून अधिक वाहने धावत आहेत ती बाब मात्र वेगळी आहे. बऱ्याच वाहन सर्रासपणे धावत आहेत. ही बाब पोलिस वाहतुक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांनासुध्दा माहितआहे. मात्र यानंतरही कोणीही या कडे लक्ष देत नाहीत.

Updated : 2022-08-09T14:52:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top