गोकुळ येथील डोंगरी योजनेतून केलेला पुलाचे काम थातूरमातूर..
Thatturmatur bridge work done under the mountain plan at Gokul.


म मराठी न्यूज नेटवर्क
माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे नलकांडी डोंगरी विकास योजनेतून या पुलाचे काम करण्यात आले. फुलाची एकूण अंदाजे किंमत 4 लक्ष 86 हजार 945 रुपये एवढी आहे. पुलाला जागोजागी तडे गेले असून दोन महिन्यातच या बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे. पुलाच्या कामात सिमेंटचा वापर कमी झाला असून मातीमिश्रीत वाळूचा समावेश असल्याने या कामाचा दर्जा घसरला आहे. अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून थातुरमातुर पद्धतीने पुलाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पुलाच्या दोन्हीही बाजूने मोठमोठे तडे पडल्या आहेत. 3 महिन्याच्या आत या पुलाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. उन्हाळ्याच्या काळातच ही बाब निदर्शनात आल्याने नव्याने पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात पुराने पूल वाहून जाण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा पूल बांधणी करावी व तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचा एकही बिल काढण्यात येऊ नये आणि संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून न्याय मिळवून द्यावा असले निवेदन राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजीक शेख यांनी दिनांक ६/३/२०२३ रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती. पण गटविकास अधिकारी यांनी आतापर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.