भोकरजवळ वऱ्हाडाचा वाहनाला भीषण अपघात...
Terrible accident to the bride's vehicle near Bhokar
X
(भोकर प्रतिनिधी गजानन गाडेकर)
विवाह सोहळा उरकून नवरीला घेऊन जात असताना टाटा म्युझिक आणि टेम्पोची समोरासमोर भीषण अपघात झाला. यात टाटा म्युझिक गाडीमधील 5 जण जागीच ठार झाले आहेत.ही घटना आज सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे भोकर व हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. अपघाताचे भीषण पाहाता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारांसाठी भोकर येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहेत भोकर येथील नजीकच्या मौजे सोमठाणा जवळील साई ढाब्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील जारिकोट येथे दोन दिवसापूर्वी लग्न झालेला घरातील वर्हाडी मंडळी हे साखरा तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ येथे लग्नानंतरच्या आरतन परतन. या कार्यक्रमासाठी निघाले होते एका मॅक्झिमो गाडी क्रमांक MH-29AR-3219 या वाहनाने ते जात असताना हिमायत नगर कडून भोकर कडे वीट भरलेल्या टेम्पो क्रमांक MH04 -AZ-9955 या टेम्पोने वऱ्हाडाच्या वाहनाला समोरासमोर थडक दिली आणि धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात नवरी सह पाच जण जागीच ठार झाले आहे. नवरी पूजा नागेश कनेवाड वय 22 ,माधव सोपे दत्ता पातलवार वय 22 सुनील दिगंबर दोरे ड्रायव्हर आहे व इतर जखमींना नवरदेवा सह नागेश साहेबराव कनेवाड राहणार जारिकोट तालुका धर्माबाद हा गंभीर जखमी झाला आहे या मॅक्झिमो गाडी मध्ये 12 जण प्रवास करीत होते. या अपघातात जखमींना नांदेड येथे हलविण्यात शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी. गोपाळ रांजणकर आणि पोलिस निरीक्षक. विकास पाटील यांच्यासह साहेब पोलीस निरीक्षक रसूल तांबोली. व पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे व इतर कर्मचारी दाखल झाले आहे.