बाबुपेठ येथे कर चुकवेगिरी करणाऱ्याचे दुकान गाळे केले सील
Tax evader's shop in Babupeth sealed


आरती आगलावे
चंद्रपुर तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर, ता. २१ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. दि. २१ फेब्रुवारीला मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाने बाबुपेठ भागात मालमत्ता कर व अन्य करांची थकबाकी असलेल्या आणि कर भरण्यास नकार देणाऱ्या मालमत्ता धारकाच्या दुकानास टाळे ठोकले.
झोन क्र.३ बाबुपेठ येथील मालमत्ता क्र.३i/३३४१ व्यावसायिक दुकानाचा मालमत्ता कर, इतर कर भरण्यास टाळाटाळ करीत असून, आज दिनांक २१/२/२२ ला जप्ती पथकाद्वारे २०१५ ते २०२२ या वर्षीपासून मालमत्ता कर व इतर कर थकीत असून, आज जप्ती कार्यवाही करण्यात आली. सदर कारवाई सहायक आयुक्त राहूल पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत श्री. भसारकर, झोन अभियंता श्री. बोधलकर, करलिपिक, तसेच शिपाई यांनी केली.