Home > Latest news > बोगस ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा..आप घुग्घुस

बोगस ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा..आप घुग्घुस

Take strict action against bogus contractor and public works officer..Aap Ghugghusघुग्घुस स्थित तीलकनगर मध्ये सार्वजनिक बालोद्यान बनलेले आहे ज्याचे काम वर्ष २०१८ मध्ये सुरू झाले ज्याची किंमत अंदाजे ५७ लक्ष आहे. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे उपकरणे लावलेली आहेत व एक शेड सुध्दा बनविण्यात आलेले आहे ज्यामध्ये नागरिकांना व मुलांना बसण्याची सोय उपलब्ध आहे पण ते शेड दिनांक १६ मार्च २०२३ ला पूर्णपणे तुटून खाली कोसळलेले आहे.जर का या खाली कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली असती तर याची जबाबदारी सर्वस्वी हे उद्यान बांधकाम करणारे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम अभियंता असेल ज्यांच्या मार्गदर्शनात हे काम पूर्ण करण्यात आलेले होते.

मागील वर्षात ऑक्टोबर महिन्यात रामनगर येथील अयोध्या पार्क इथे सुद्धा असाच प्रकार घडला होता,ज्यामधे कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु हे सर्व पाहता असे लक्षात येते की उद्यानाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे व यात खूप मोठा भ्रष्टाचार कंत्राटदार एम. एस. भांडारकर व पि. डब्लू. डी. अभियंता यांनी केलेला आहे.

त्यामुळे या पार्कचे काम करणाऱ्या कंत्राटदार व कामाला मंजुरी देनाऱ्या अभियंता यांनी कुठेना कुठे हे बोगस काम जाणीवपूर्वक केलेले आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टी घुग्घुस रामनगर अयोध्या पार्क मध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करून कंत्राटदार व अभियंता वर कारवाई करा.... आम आदमी पार्टी घूग्घुस

घुग्घुस स्थित रामनगर प्रभाग क्रमांक ०१ मध्ये अयोध्या इको पार्क बनलेले आहे ज्याचे काम वर्ष २०१८ मध्ये सुरू झाले ज्याची किंमत ९५.२० लक्ष आहे.या पार्क मध्ये नागरिकांना बसण्याकरिता बनविण्यात आलेले शेड पूर्णपणे तुटून खाली कोसळलेले आहे.ज्यामधे कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु हे सर्व पाहता असे लक्षात येते की कुठे ना कुठे बोगस काम झालेले आहे व खूप मोठा भ्रष्टाचार कंत्राटदार एम. एस. भांडारकर व पि. डब्लू. डी. अभियंता यांनी केलेला आहे.

त्यामुळे या पार्कचे काम करणाऱ्या कंत्राटदार व कामाला मंजुरी देनाऱ्या अभियंता यांनी कुठेना कुठे हे बोगस काम केलेले आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी घुग्घुस तर्फे आपणास या निवेदन स्वरूपात करण्यात येत आहे जेणेकरून यापुढे असल्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा बसेल.मागील प्रकरणात आम आदमी पार्टी घुग्घुस तर्फे निवेदन देण्यात आलेले होते पण त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आता आपण या प्रकरणाला गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, सचिव संदीप पथाडे, उपाध्यक्ष विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 18 March 2023 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top